Breaking News

शेतकऱ्यांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहोचविण्याकरिता ‘नोगा’ ब्रँड मुल्यसाखळी विकसित करण्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी उत्पादक गटांचा भाजीपाला, फळे थेट ग्राहकांपर्यत पोहचविण्याकरता ‘नोगा’ ब्रँडखाली मुल्यसाखळी विकसित करण्यावर भर द्यावा. शहरी भागातील रहदारीच्या ठिकाणी व महामंडळाची मालकी असलेल्या जागेवर  ‘नोगा’  उत्पादनांची  विक्री स्थळे उभारावीत, असे निर्देश कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत महाराष्ट्र राज्य कृषि उद्योग महामंडळाची आढावा बैठक कृषी मंत्री भुसे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कृषि उद्योग महामंडळाने ‘विकेल ते पिकेल’ या उपक्रमात सक्रीय सहभाग घेऊन लोकाभिमुख व्हावे, कृषीमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी महामंडळाच्या तांत्रिक व लेखा विषयक बाबींचा घेतानाच पारंपरिक रासायनिक खते, किटकनाशके व कृषि अवजरांसोबतच नाविन्यपूर्ण उत्पादने, ट्रायकोडर्मा, फेरोमन सापळे यांचे उत्पादन करून महामंडळाचे उत्पन्न वाढवण्यावर भर दयावा, अशी सूचनाही भुसे यांनी केली. यावेळी त्यांनी महामंडळाची मालकी असलेल्या राज्यभरातील स्थावर जंगम मालमत्तेबाबत सविस्तर आढावा घेतला.

Check Also

कृषी उडान योजनेअंतर्गत राज्यातील या विमानतळांचा समावेश

शेतकऱ्यांच्या शेतमालाला देश व विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करुन देण्याकरिता केंद्र शासनाने सकारात्मक पाऊल उचलले असून, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *