Breaking News

१९ जुलैपर्यंत ठाण्यात लॉकडाऊन वाढविला ठाणे महापालिका आयुक्तांचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी
ठाणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या प्रसाराला आळा घालण्यासाठी २ ते १२ तारखेपर्यंत लॉकडाऊन जारी करण्यात आला होता. मात्र या कालावधीतही कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा १२ तारखेपासून १९ जुलैपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढविण्याचा निर्णय ठाणे महापालिका आयुक्तांनी घेतला असून यासंदर्भातील आज आदेशही जारी केले.
मागील काही दिवसांपासून ठाणे महापालिका हद्दीत कोरोनाबाधितांची संख्या ४०० ते ५५० या दरम्यान वाढत होती. तसेच मृतकांची संख्याही सातत्याने वाढत आहे. यापार्श्वभूमीवर लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला.

Check Also

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, हेमंत करकरे यांची हत्या कसाबने नव्हे तर आरएसएसच्या…

२६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे (ATS) माजी प्रमुख हेमंत करकरे यांची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *