Breaking News

Tag Archives: supreme court

सर्वोच्च न्यायालयः अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रशासकिय अधिकार, पण फक्त तीन गोष्टींचे अधिकार नायब राज्यपालांकडे

दिल्लीतील नोकरशाहीवर कोणाचे नियंत्रण असावे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून याच विषयावर दिल्लीचे सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात वाद चालला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय खंडपीठाने दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीटी) सर्व नोकरशाहांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असेल, असे कोर्टाने म्हटले …

Read More »

निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे यांचे प्रत्युत्तर, प्रतारणा करणाऱ्या संधीसाधू नेत्यांना चपराक घटनाबाह्य सरकार म्हणणारेच कालबाह्य

महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घडलेल्या विविध घटनांवर न्यायालयाने भाष्य केलं आहे. यावेळी न्यायालयाने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे सर्व निर्णय बेकायदेशीर आणि चुकीचे होते, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं. त्याचबरोबर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांची नियुक्ती बेकायदेशीर असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला नसता तर आजची राजकीय स्थिती …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचा सवाल, तेव्हा नैतिकता कुठल्या डब्यात बंद करुन ठेवली होती? विनाकारण नैतिकतेचा मुलामा चढवण्याचा प्रयत्न करा नका

महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला आहे. या निकालात अनेक ताशेरे शिंदे गटावर ओढण्यात आले आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याने आम्ही जैसे थे परिस्थिती करत सुई मागे आणू शकत नाही असंही कोर्टाने म्हटलं आहे. एवढंच नाही तर आमदारांना अपात्र ठरवायचं का नाही? याचे पूर्ण अधिकार हे विधानसभा अध्यक्षांना दिले …

Read More »

नाना पटोले यांची टीका, भाजपा… सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध शिंदे-भाजपा सरकार असंवैधानिक, बेकायदेशीर असल्याचे सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामार्तब

महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सर्वोच्च न्यायालयाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सर्वोच्च न्यायालयानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक …

Read More »

जयंत पाटील न्यायालयाच्या निर्णयावर म्हणाले, शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार शिंदे सरकार जरी वाचले तरी सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही

शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राज्यातील सत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केले. जयंत पाटील म्हणाले, राज्यपालांनी घेतलेले सर्व निर्णय कसे चुकीचे आहेत हे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले. भरत गोगावले यांचा व्हीप अमान्य केला …

Read More »

संजय राऊत यांचा खोचक टोला, सरकार वाचलं असं समजून खाजवत बसू नये… देशाला आणि लोकशाहीला दिशा देणारा निकाल

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावरील निकाल सुनावला आहे. महाराष्ट्रात सत्तांतर घडत असताना घेतलेल्या विविध निर्णयांवर न्यायालयाने आपलं निरीक्षण नोंदवलं आहे. न्यायालयाने शिंदे गटाला मोठे धक्के दिले आहेत. तसेच राज्यपालांचे सर्व निर्णय चुकीचे असल्याचंही न्यायालयाने सांगितलं. दुसरीकडे, १६ आमदारांच्या अपात्रतेचं प्रकरण न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे पाठवलं आहे. त्यांनी लवकरात लवकर यावर …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, होय मी नैतिकतेला धरून दिला राजीनामा, मग आता तुम्ही… सर्वोच्च न्यायालयाने सरकारच घटनाबाह्य ठरविले असताना मिंधे गटाने आणि फडणवीसांनी राजीनामा द्यावा

राज्यात शिवसेनेतील बंडाळी आणि त्यानंतर निर्माण झालेला सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार घटनाबाह्य असल्याचा निकाल देत जर उध्दव ठाकरे यांनी जर राजीनामा दिला नसता तर घडाळ्याचे काटे आम्ही उलटे फिरवले असते असे स्पष्ट मत व्यक्त केले. या निर्णयानंतर शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उध्दव ठाकरे यांनी मातोश्री या आपल्या निवासस्थानी …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः …तर घडाळ्याचे काटे उलटे फिरवले असते… सध्याचे सरकार बेकायदेशीर राज्यपालांचे निर्णय बेकायदेशीर, प्रतोद नियुक्तीचा अधिकार राजकिय पक्षाचा

महाराष्ट्रातील जनतेने निवडूण दिलेले महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकण्यासाठी राज्यपालांनी एका विशिष्ट पक्षाच्या बाजूने कल दाखवित त्या पक्षाला सत्ता स्थापन करण्यासाठी एकप्रकारे मदत केली अशा कडक शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ताशेरे ओढत राज्यापालांनी राज्य घटनेच्या बाहेर जाऊन वर्तन केले जे अपेक्षितच नव्हते. तसेच प्रतोद अर्थात व्हीप नियुक्तीचा अधिकार हा राजकिय पक्षाचा …

Read More »

विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ म्हणाले,…निर्णय मान्य केला जाईल तर निर्णय माझ्याकडेच येईल

महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल गुरुवारी लागणार आहे. भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनीच यासंबंधीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्राचे सरकार कोसळणार की राहणार या कळीच्या प्रश्नाचं उत्तरही गुरुवारी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. या सगळ्याबद्दल विधीमंडळाचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनीही सविस्तर प्रतिक्रिया दिली …

Read More »

संजय राऊत यांची स्पष्टोक्ती, कोणी सांगत असेल… तर काहीतरी गडबड… उद्याचा फैसला सर्वोच्च न्यायालाचा अत्यंत महत्वाचा

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवलेला निकाल उद्या गुरुवारी जाहीर होणार आहे. सरन्यायाधीश डी.वाय चंद्रचूड यांनी एका प्रकरणात सुनावणी करताना याप्रकरणी माहिती दिली. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लक्ष लागून राहिलेल्या निकालासाठी अवघे काही तास उरले आहेत. यावरून ठाकरे गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. संजय राऊत म्हणाले, …

Read More »