Breaking News

Tag Archives: shivsena

सुषमा अंधारे यांचा सवाल, बापू सूतगिरणी, दुधसंघ, क्रेडिट सोसायटी स्थापन केलेली कुठेय? सोलापूरच्या दौऱ्यात सुषमा अंधारे यांचा घणाघात

महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या सध्या बंडखोर शिंदे गटातील आमदारांच्या मतदारसंघाबरोबरच भाजपा आमदारांच्या मतदारसंघात ही जाहिर सभा घेत आहेत. या अनुषंगाने सुषमा अंधारे या आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. तसेच आयोजित जाहिर सभेत बोलताना सुषमा अंधारे म्हणाले, वसंतदादा पाटील यांच्या नावाने सूतगिरणी काढली, सरकारकडून जमिन मिळवली, …

Read More »

चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची पूर्तता हवी मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत माहिती

नाशिक- औरंगाबाद मार्गावर खाजगी ट्रॅव्हल्स बसचा अपघात हा क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी असल्यामुळे झाला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून यापुढे चारचाकी वाहनांची नोंदणी करताना सर्व नियमांची काटेकोर पूर्तता असल्याची खात्री उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी करावी, असे निर्देश देण्यात येत असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत सांगितले. सदस्य सचिन अहिर यांनी …

Read More »

विरोधकांना बोलण्याची संधी नाकारल्याने जयंत पाटील म्हणाले, तुम्ही तरी निर्लज्जपणा करू नका… अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील निलंबित

आज विधानसभेत फोन टॅपिंगच्या मुद्यावरून विरोधकांनी गदारोळ केल्यानंतर त्यास प्रत्युत्तर म्हणून सत्ताधाऱ्यांकडून दिशा सालियन आत्महत्या प्रकरण पुढे आणण्यात आले. त्यानंतर कामकाज सुरळीत झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्याची मागणी केली. मात्र अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी भास्कर जाधव यांना बोलू देण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे विरोधक आपल्याच …

Read More »

दिशा सालियनप्रकरणी फडणवीसांच्या घोषणेनंतर अजित पवार म्हणाले, तीच्या आईवडीलांची तरी… सीबीआयला त्यात काही आढळून आले नाही

विरोधकांच्या फोन टॅपिंगच्या मुद्याला प्रत्युत्तर म्हणून शिंदे गट आणि भाजपाने पध्दतशीरपणे विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी दिशा सालियन आत्महत्या प्रकरण बाहेर काढले. तसेच सत्ताधारी आमदारांच्या मागणीनुसार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एसआयटी मार्फत करण्याची घोषणाही विधानसभेत केली. मात्र फडणवीसांच्या या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सालियनच्या आई-वडीलांनी केलेल्या आवाहनाची …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांची घोषणा, दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी सत्ताधारी भाजपा आमदारांची मागणी फडणवीस यांच्याकडून मान्य

बॉलीवूड अभिनेता स्व.सुशांतसिंग राजपूत याची व्यवस्थापिका असलेल्या दिशा सालियन हीच्या आत्महत्या प्रकरणी शिवसेनेवर शेकविण्यासाठी भाजपाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र आज फोन टॅपिंगप्रकरण उचलून धरल्याने त्यास प्रत्युत्तर म्हणून भाजपाकडून दिशा सालियन प्रकरण अचानक काढत आत्महत्या प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी लावून धरत गोंधळही घातला. त्यामुळे अखेर याप्रकरणी राज्याचे …

Read More »

फोन टॅपिंगच्या मुद्याला शिंदे-फडणवीसांकडून दिक्षा सालियन प्रकरणाचे प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी मुद्दा उपस्थित केल्याने सभागृहात गोंधळ

शिंदे-फडणवीस सरकारने फोन टॅपिंगच्या मुद्यावरून आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना अभय दिल्याप्रकरणी विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेत आज विधानसभेत सभात्याग करत आपला विरोध दर्शविला. मात्र विरोधकांच्या या आक्रमक पवित्र्याला प्रत्युत्तर म्हणून स्व.अभिनेता सुशांत सिंह रजपूत याची व्यवस्थापक दिशा सालियन हिच्या आत्महत्येचे प्रकरण शिंदे गटाचे प्रतोद आणि आमदार भरत गोगावले आणि भाजपाचे …

Read More »

देवेंद्र फडणवीसांची माहिती, शाळा, महाविद्यालयातील लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखणार विधान परिषदेत दिली माहिती

शाळा, महाविद्यालयातील किशोरवयीन मुलांमध्ये अश्लील व्हिडिओ व तत्सम चित्रिकरण यांच्या प्रभावामुळे विकृत दृष्टीकोन निर्माण होणे व त्यातून लैंगिक अत्याचार/ हिंसेच्या घटना घडू नयेत यासाठी राज्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. मुंबईतील माटुंगा येथील महानगरपालिकेच्या शाळेतील तेरा वर्षीय विद्यार्थिनीवरील लैंगिक अत्याचाराच्या घटनेबाबत …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी महाविकास आघाडी आक्रमक विधानभवनाच्या पायर्‍यांवर उतरत जोरदार घोषणाबाजी...

घेतले खोके भूखंड ओके… भ्रष्टाचारी सरकारचा निषेध असो… खोके सरकार हाय हाय… खोके घेऊन भूखंडाचा श्रीखंड खाणार्‍या मुख्यमंत्र्यांचा धिक्कार असो … भूखंड गैरव्यवहार प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा… ‘मित्रा’ चे लाड करणार्‍या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…मुख्यमंत्र्यांचा कारनामा द्यावाच लागेल राजीनामा…या सरकारचं करायच काय, खाली डोकं वर पाय… मुख्यमंत्र्यांची खोलली पोल हल्लाबोल हल्लाबोल…छत्रपती …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, हस्तक्षेप असेल तर मुख्यमंत्री पदावर राहणे योग्य नाही उपमुख्यमंत्री म्हणतात तसे सोपे असेल तर न्यायालयात प्रलंबित का

मागील दोन दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर सुधार न्यायाच्या भूखंड प्रकरणावरून विविध प्रसार माध्यमातून वृत्त प्रकाशित होत आहे. त्यातच तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या त्या निर्णयावरून न्यायालयाने ताशेरे ओढले. या प्रकरणाचे पडसाद विधान परिषदेत तीव्र उमटले असून त्याचा परिणाम सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करावे लागले. या पार्श्वभूमीवर सध्या …

Read More »

विधान भवनातील शिवसेना कार्यालयातून शिंदे गटाने ठाकरे गटाला बाहेर काढले नागपूरमधील हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानभवनात शिंदे गटाच्या आमदारांची दांडगाई

शिवसेना नेमकी कोणाची याचा वाद जरी सध्या सर्वोच्च न्यायालयात आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जरी अद्याप प्रलंबित असला तरी नागपूरातील गारठलेल्या वातावरणात शिवसेनेतील शिंदे गटात आणि ठाकरे गटात चांगलीच जुंपल्याने थंडीच्या वातावरणातही विधानभवनातील वातावरण चांगलेच तापल्याचे चित्र पाह्यला मिळाले. त्याचे झाले असेल की, आज हिवाळी अधिवेशनाचा पहिलाच दिवस असल्याने जरा जास्तच …

Read More »