Breaking News

Tag Archives: shinde-Fadnavis government

बाळासाहेब थोरात यांचा आरोप, शिंदे-फडणवीस सरकार कर्नाटकपेक्षा भ्रष्ट… लोकांचे ज्वलंत प्रश्न दुर्लक्षित करुन शिंदे सरकार इव्हेंटमध्ये मग्न

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळला असून मंत्रालय हे भ्रष्टाचाराचा अड्डा बनले आहे. कर्नाटकातील भाजपा सरकार ४० टक्के कमिशनवाले सरकार होते, राज्यातील शिंदे सरकारमध्ये त्यापेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे. सरकार जनतेच्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत आहे, केवळ मोठ मोठे इव्हेंट करुन प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, अशी घणाघाती टीका विधिमंडळ …

Read More »

राज्य सरकारने केल्या २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याः नव्या गृहसचिव सुजाता सौनिक तर तुकाराम मुंडे मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी

मागील काही दिवस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने सर्वच राजकिय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य सरकारने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली असून आज राज्यात एकाचवेळी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मागील तीनवर्षाहून अधिक काळ सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य …

Read More »

इम्तियाज जलील यांचा आरोप, ते सरकार ४० टक्के तर हे २० टक्के… कामं पाहिजे तर मंत्रालयात पैसे द्यावे लागतात

नुकत्याच झालेल्या कर्नाटकातील विधानसभा निवडणूकीत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या सरकारमधील मंत्री ४० टक्के कमिशन घेतात हा प्रमुख मुद्दा प्रचारात बनला होता. तसेच या आरोपामुळे बोम्मई सरकार चांगलेच बदनामही झाले. आता त्याच धर्तीवर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी आता राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री २० टक्के कमिशन घेत असल्याचा खळबळजनक आरोप केला. …

Read More »

ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना शिंदे सरकारच्या समितीतून वगळले जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रविंद्र वायकर यांनी पशु व दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पाठविले पत्र

आरेच्या सर्वांकष विकासाबरोबर आरेतील आदिवासी व बिगर आदिवासी रहिवाशांना मुलभूत सुविधा देण्यासाठी सातत्याने दिवस-रात्र प्रयत्न करणारे तसेच वेळोवेळी लोकशाहीच्या विविध आयुधांचा वापर करुन विधानसभेत आरेतील विविध प्रश्‍न मांडणारे ठाकरे गटाचे आमदार रविंद्र वायकर यांना राज्य शासनाने गठीत केलेल्या समितीतून वगळण्यात आल्याने विधानसभा क्षेत्रातआश्‍चर्य व्यक्त करण्यात येत असून आरेतील रहिवाशांमध्ये असंतोष …

Read More »

मुंबई महापालिकेबाबत घेतलेला शिंदे-फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णय न्यायालयाने केला मान्य पालिकेच्या हद्दीत २२७ सच वार्ड

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबईतील वार्ड संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र त्यानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस यांचे भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निर्णयात बदल करत मुंबई महापालिकेच्या वार्ड संख्येत केलेली वाढ पुन्हा रद्दबादल करत २३६ वरून २२७ इतकी करण्यात आली. या …

Read More »

शेतकरी-कष्टकऱ्यांचे लाल वादळ मुंबईच्या दिशेनेः विधानभवनाला घालणार घेराव नाशिक ते मुंबई लॉग मार्च, मंत्री दादाजी भुसे भेटणार मोर्चाच्या प्रतिनिधींना

मागील काही दिवसांपासून राज्यातील शेतकऱ्यांना त्यांनी कष्टातून पिकविलेल्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तसेच थकित वीजबीलामुळे शेतकऱ्यांची वीज जोडणी तोडण्यात येत आहे, त्यातच अवकाळी पाऊसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला. या सगळ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर शिंदे-फडणवीस सरकारने तात्काळ मदत जाहिर करणे अपेक्षित असताना आणि विरोधकांनी राज्य सरकारला धारेवर धरले …

Read More »

भरसभेतच अजित पवार म्हणाले, … तर कशाला खोके सरकार आलं असतं अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसान भरपाईबाबत जाब विचारणार

सध्या चालू असलेलं अर्थसंकल्पीय अधिवेशन, त्यातील मुद्दे यामुळे राजकीय वातावरण तापलेलं असताना त्या मुद्द्यांवरून अजित पवारांनी राज्य सरकावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. आज भाषणातही अजित पवारांनी सरकारवर विविध मुद्द्यांच्या आधारे हल्लाबोल केला. तसेच अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसान भरपाईबद्दल उद्या सभागृहात मुद्दा उपस्थित करणार असल्याचे सांगितले. आज पाथर्डीमध्ये …

Read More »

नाना पटोलेंची टीका, ‘खोके’ सरकारकडे उधळपट्टीसाठी पैसे पण एसटी कर्मचाऱ्यांच्यासाठी नाही… मविआ सरकारवेळी एस. टी. विलिनीकरणाचा आग्रह धरणारे आता गप्प कसे?

शिंदे-फडणवीस सरकार एसटी महामंडळाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा पगार वेळेवर करू शकत नाही. पगार होत नसल्याने सांगली जिल्ह्यातील एसटी कर्मचारी भिमराव सुर्यवंशी यांना आत्महत्या करावी लागली ही सरकारसाठी लाजीरवाणी बाब आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष खंबीरपणे उभा असून अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचे प्रश्न लावून धरू, कर्मचाऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, असे …

Read More »

बच्चू कडू यांचा शिंदे-फडणवीस सरकारला सवाल, मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? मला मंत्रिपद द्या असे म्हणणार नाही पण विस्तार करा

राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर साधारणतः ३ महिन्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार करण्यात आला. त्यानंतर उर्वरित मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची चर्चा सातत्याने सुरु होती. अखेर राज्य सरकारला ६ महिने पूर्ण झाल्यानंतर याबाबत मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सुरुवातीला दिवाळीनंतर असे जाहिर केले त्यानंतर हिवाळी …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचा सवाल, निमंत्रण पत्र नाही तर शिंदे-फडणवीस सरकार कसे स्थापन झाले ? शपथविधी कसा झाला याचा फडणवीस यांनी नव्हे तर राज्यपालांनी खुलासा करावा - महेश तपासे

सत्ता स्थापनेसाठी लेखी निमंत्रण दिलेले नाही हे माहिती अधिकारात उघड झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा करण्याऐवजी राज्यपालांनी खुलासा करायला हवा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना सत्ता स्थापनेसाठी निमंत्रणच दिले नसल्याचे समोर आल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »