Breaking News

Tag Archives: sanjay raut

शरद पवार म्हणाले, मी कशाला काँमेंट करू… संजय राऊत यांच्या दाव्यावर शरद पवारांनी बोलण्याचे टाळले

भविष्यात पुन्हा एकदा महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं तरी आश्चर्य वाटण्याची गरज नाही असं भाकीत शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊतांनी वर्तवलं आहे. याच वक्तव्यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना नाशिकमधील पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नावर उत्तर देताना शरद पवार यांनी संजय राऊत यांच्या नावाचा उल्लेख केला मात्र थेट …

Read More »

संजय राऊत म्हणाले, त्यांच्याकडून निष्ठेच्या चार गोष्टी शिका लीलाधर डाके, मनोहर जोशी यांच्या भेटीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला टोला

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात बंडाचे निशाण फडकावित सेनेच्या ४० आमदारांना सोबत घेवून भाजपाच्या पाठिंब्यावर राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी शिवसेनेचे ज्येष्ठ नेते लीलाधर डाके आणि माजी लोकसभाध्यक्ष मनोहर जोशी यांची भेट घेतली. या सदिच्छा भेटी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. एकनाथ शिंदेंच्या …

Read More »

आणि उध्दव ठाकरे यांनी सांगितली शस्त्रक्रियेनंतरची स्वत:च्या तब्येतीची अवस्था… संपूर्ण शरीराची हालचाल थांबली होती

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनना पक्षात बंडखोरी झाल्यानंतर याआधीही शिवसेनेतील बंडाबाबतही चर्चा होतेय. तसेच शिवसेनेच्या स्थापनेनंतर अनेकदा शिवसेनेत बंडखोरी का होते असाही प्रश्न विचारला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी या प्रश्नाचं उत्तर दिलंय. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. तसेच यावेळी शस्त्रक्रियेनंतर स्वत:ची काय परिस्थिती …

Read More »

उध्दव ठाकरे म्हणाले, आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांना असामान्य बनविण्याची… शिवसेना कोणाची याचे पुरावे देण्याची गरज नसून मतदारच निवडणूकीच्या रिंगणात दाखवून देतील

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदार आणि १२ खासदारांनी बंडाचे निशाण फडकाविले. त्यानंतर शिवसेनेची नेमकी भूमिका काय? उध्दव ठाकरे यांची भविष्यातील पुढील वाटचाल काय याबाबत राज्यातील जनतेमध्ये एकप्रकारची उत्सुकता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांची सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी …

Read More »

संजय राऊत म्हणाले, आमच्या लाऊडस्पीकरसमोर तुमच्या पिपाण्या टीकणार नाहीत.. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर

राज्यात शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार उलथवून टाकत बंडखोर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असे भाजपाचे सरकार स्थापन झाले. त्यानंतर भाजपाची पहिलीच प्रदेश कार्यकारणीची बैठक पनवेल येथे पार पडली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलताना म्हणाले की, त्यांचे आणि राष्ट्रवादीचे आधीच ठरले …

Read More »

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, उध्दव ठाकरे यांना सांगून शिवसेना सोडली… राष्ट्रवादीशी काडीमोड घ्या म्हणून सांगितले परंतु त्यांनी ऐकले नाही

नुकतेच शिवसेनेतील १२ खासदारांनीही शिंदे गटात प्रवेश केला. त्यानंतर या १२ पैकी एकजण असलेले खासदार श्रीरंग बारणे यांचाही समावेश आहे. शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच पुण्यात आल्यानंतर श्रीरंग बारणे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसशी काडीमोड घ्यावा आणि शिवसेनेने भाजपासोबतच युती करावी, ही आम्हा खासदारांची ठाम भूमिका आहे. त्यादृष्टीने आम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात …

Read More »

संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा, त्यांच्या उठावातील ‘उठा’ म्हणजे ‘उध्दव ठाकरे’… बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेवर पुरावा पुरावे सादर करण्याची वेळ आणता, माफ करणार नाही

मागील काही दिवसांपूर्वी शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यात संवादाचा मार्ग सुरु होईल म्हणून आस्ते कदम घेतलेल्या प्रवक्ते संजय राऊत यांनी आज एकनाथ शिंदे समर्थक बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी बोलताना संजय राऊत  म्हणाले की, ‘हे बंड नसून उठाव आहे’ या बंडखोरांकडून केल्या जाणाऱ्या दाव्यावरुन टीका …

Read More »

राष्ट्रवादीचा आरोप, …हा तर विरोधकांचा आवाज दाबण्याचा एक कुटील प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांचा आरोप

महागाई, बेरोजगारी यांसारखे गंभीर विषय हाताळण्यात अपयशी ठरलेल्या मोदी सरकार विरोधात आवाज उचलला जातो, तेव्हा त्या विरोधकांना केंद्रीय यंत्रणांद्वारा समन्स देऊन त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न आज होत असताना दिसत आहे असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ता महेश तपासे यांनी भाजपा सरकारवर केला. २०१९ मध्ये सुद्धा देशाचे नेते शरदचंद्रजी …

Read More »

संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने बजावले नवे समन्स २७ तारखेला चौकशीसाठी हजर होण्याचे आदेश

सध्या संसदेचे अधिवेशन सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर २० तारखेला ईडी चौकशीसाठी येता नसल्याचे कारण देत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी ७ ऑगस्ट नंतरची तारीख देण्यात यावी अशी मागणी केली. मात्र ईडीने संजय राऊत यांची मागणी अर्धमान्य करत ईडीने त्यांना सुधारीत तारीख दिली मात्र ७ ऑगस्टनंतरची तारीख देण्याऐवजी त्यांना याच महिन्यातील २७ …

Read More »

संजय राऊत ट्विट करत म्हणाले, पीठ से निकले खंजरों को गिना जब… बंडखोर खासदारांवर टीका करत फुटीरावर शायरीतून निशाणा

राज्यात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारांनंतर आता १२ खासदारही शिंदे यांच्या गटात सहभागी झाले. तत्पूर्वी रामदास कदम यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडत शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. या साऱ्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले, ते माझे सहकारी होते. त्यांनी …

Read More »