Breaking News

Tag Archives: rutuja latke

भाजपाच्या निर्णयावर संजय राऊत म्हणाले, ते पत्र स्क्रिप्टचा भाग… राज ठाकरेंच्या पत्रावर साधला भाजपावर निशाणा

अंधेरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल अचानक मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी पत्र पाठवित निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केले. त्यापाठोपाठ शरद पवार यांनीही आवाहन केले. त्यास २४ तासांचा अवधी लोटत नाही तोच आज सकाळपासूनच भाजपाच्या गोटात वेगवाग हालचाली सुरु असल्याचे दिसून आले. अखेर भाजपाने या निवडणुकीतून माघार घेत असल्याचे …

Read More »

उमेदवारी माघारी घेतल्यानंतर मुरजी पटेल म्हणाले, मी दबावामुळे अर्ज मागे…

अंधेरी पोटनिवडणुकीवरून राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके आणि भाजपाचे उमेदवार मुरजी पटेल यांच्यात ही लढत होणार होती. भाजपा आणि शिंदे गटाकडून मोठ्या थाटा-माटात मुरजी पटेल यांना उमेदवारी जाहिर करत त्यांचा उमेदवारीही भरला. परंतु त्यास दोनच दिवसाचा अवधी लोटत नाही तोच भाजपाने या निवडणुकीतून …

Read More »

उध्दव ठाकरे गटाच्या आरोपामुळे भाजपा उमेदवार मुरजी पटेल अडचणीत भाजपा काय उत्तर देणार याकडे लक्ष

राज्यातील उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार भाजपाच्या पाठिंब्याने शिवसेनेचेच मंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने उलथून टाकले. त्यानंतर अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या निमित्ताने उध्दव ठाकरे विरूध्द शिंदे गट-भाजपा दरम्यान पहिली लिटमस टेस्ट होत आहे. या निवडणूकीसाठी ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने ऋतुजा लटके यांनी उमेदवारी अर्ज भरला तर भाजपा-शिंदे गटाच्यावतीने मुरजी पटेल यांनी …

Read More »

अंधेरी निवडणुक: उध्दव सेनेकडून ऋतुजा लटके तर भाजपाकडून पटेल यांचा अर्ज दाखल उध्दव सेना आणि भाजपाकडून शक्तीप्रदर्शन

राजीनामा स्विकारण्यावरून मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला फटके लगावल्यानंतर अखेर आज सकाळी मुंबी महापालिकेने ऋतुजा लटके यांचा राजीनामा स्विकारला असल्याचे जाहीर केले. त्यानंतर सकाळी ऋतुजा लटके यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांसोबत गुंदवली येथील शाळेत अंधेरी पूर्व विधानसभा निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्यावतीने अर्ज भरला. तर भाजपाने माजी अपात्र नगरसेवक मुरजी पटेल …

Read More »

शिंदे-फडणवीसांच्या मनसुब्यावर पाणीच पाणी, राजीनामा मंजूर करण्याचे आदेश

अंधेरी विधानसभा पोट निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेने उमेदवारी जाहिर केली. मात्र त्यांचा राजीनामा मुंबई महापालिकेने महिना उलटून गेला तरी मंजूर केला नाही. त्या विरोधात आज मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. त्यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर उच्च …

Read More »

ऋतुजा लटके यांनी आयुक्तांची भेट घेत केली विचारणा, शिवसेना न्यायालयात

राज्यात शिवसेनेतील बंडाळीमुळे राजकारणात मोठी उलथापालथ घडत आहे. त्यातच शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेकरीता पोट निवडणूक जाहिर झाली. मात्र या निवडणूकीसाठी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या संभावित उमेदवार ऋुतुजा लटके यांनी एक महिन्यापूर्वी मुंबई महारपालिकेतील नोकरीचा राजीनामा देऊनही त्यांचा राजीनामा अद्याप मंजूर न करण्यात …

Read More »

ऋतुजा लटके यांच्या राजीनाम्यावरून तर्क-वितर्काला उधान

अंधेरी विधानसभेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकतीच निवड प्रक्रिया जाहिर केली. त्यातच शिवसेनेत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाविरोधात एकनाथ शिंदे यांनी बंड करत ४० आमदारांना सोबत घेत वेगळी चुल मांडली. त्यातच रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना आपल्या गटात खेचण्यासाठी शिंदे गटाकडून …

Read More »

दिपक केसरकर म्हणाले, भाजपा आमच्यासाठी मोठं पद सोडू शकते तर आम्ही का नाही?

शिवसेनेतील फुटीनंतर मुंबईतील अंधेरी विधानसभेच्या रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. या निवडणूकीच्या निमित्ताने एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील पहिली लिटमस टेस्ट होणार असल्याची चर्चा रंगली होती. तसेच अंधेरीचा जागा शिवसेनेची असल्याने त्यावर शिंदे गटाकडूनही दावा केला जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत असतानाच ही निवडणूक शिंदे गटाकडून …

Read More »