Breaking News

Tag Archives: ramesh bais

भाग-२ः राज्यपालांची इच्छा, या १८ जणांचा खर्च राज्याच्या तिजोरीतून करा प्रति गणगोत-मित्रांवर ५० हजार रूपये खर्च करा

महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी रमेश बैस (Governor Ramesh Bais) यांची निवड १२ फेब्रुवारी २०२३ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister NarendraModi) यांच्या शिफारसीनुसार राष्ट्रपती भवनाकडून निवड करण्यात आली. त्यानंतर १८ फेब्रुवारी रोजी रमेश बैस (Ramesh Bais) यांचा मुंबईतील राजभवनावर मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी (Chief Justice of Bombay High Court) पद …

Read More »

भाग-१ः मी राज्यपाल, माझ्या घरचे-गणगोत-मित्रांना राज्य अतिथींचा दर्जा द्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांचे मम, नियमांना पायदळी तुडवित नव्या सुमार पध्दतीच्या कारभाराचा प्रारंभ

काही महिन्यापूर्वी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल (Governor) भगतसिंग कोश्यारी (BhagatSingh Koshyari) यांच्या नियमबाह्य वागणूकीमुळे निर्माण झालेल्या राजकिय पेच प्रसंगावरून सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) चांगलीच खरडपट्टी काढली. मात्र कदाचित त्याचा अंदाज कोश्यारी यांना असावा त्यामुळे त्यांनी केंद्र सरकारच्या मागे लागून राज्यपाल पदावरून पदमुक्त करून घेतले. त्यांच्या ठिकाणी राज्याच्या राज्यपाल (Governor ) पदी …

Read More »

जी-२० प्रतिनिधी, राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांकडून जुहू समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जी-२० परिषदेच्या पर्यावरण आणि हवामान शाश्वतता कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीला ‘जी-२० समुद्र किनारा स्वच्छता’ मोहिमेने सुरुवात करण्यात आली. राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समुद्राचे किनारा स्वच्छ ठेवण्याची तसेच प्रदूषण व कचऱ्यापासून समुद्राचे रक्षण करण्याची शपथ देवून स्वत: जी-२० परिषदेतील सदस्य राष्ट्रांच्या प्रतिनिधींसमवेत स्वच्छता केली. स्वच्छता अभियानामध्ये लोकचळवळीची आवश्यकता …

Read More »

नाना पटोले यांचा इशारा, विधिमंडळाचे विशेष अधिवेशन नाही बोलावले तर… मविआच्या वज्रमूठ सभा रद्द केल्या नाहीत, नैसर्गिक संकटामुळे सभांचे फेरनियोजन करु

राज्यासमोरील प्रश्नांसदर्भात राज्यपाल रमेश बैस यांची काँग्रेस शिष्टमंळाने भेट घेऊन दोन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्याचे निर्देश राज्य सरकारला द्यावेत अशी विनंती करण्यात आलेली आहे. राज्याच्या हितासाठी राज्यपाल काँग्रेसच्या मागणीचा सहानुभूतीने विचार करतील अशी अपेक्षा आहे. विशेष अधिवेशन बोलावले नाही तर काँग्रेस जनतेच्या प्रश्नांसाठी राज्यभर रस्त्यावर उतरुन तीव्र आंदोलन करेल, असा …

Read More »

अजित पवार यांची मागणी, सत्य येणे आवश्यक; निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशीचे आदेश द्या राज्यपाल रमेश बैस यांना पत्र ;सरकारचे प्रमुख म्हणून सरकारला निर्देश द्या...

खारघर येथील ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्यात घडलेल्या दुर्दैवी घटनेची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल रमेश बैस यांना दिलेल्या पत्रात केली आहे. यावेळी अजित पवार यांनी पत्रात म्हटले की, ज्येष्ठ निरुपणकार अप्पासाहेब धर्माधिकारी यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान १४ …

Read More »

मुंबईच्या धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर ‘टुरिझम सर्किट’साठी बस सेवा सुरु करा इंदू मिल येथील स्मारक जागतिकस्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल - राज्यपाल रमेश बैस

इंदू मिल दादर येथे तयार होणारे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देशासाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर सर्वांना प्रेरणा देणारे ठरेल असे मत राज्यपाल रमेश बैस यांनी व्यक्त केले. दादरस्थित चैत्यभूमी येथील आंबेडकर स्मारकाच्या ठिकाणी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केल्यानंतर आयोजित मुख्य कार्यक्रमात राज्यपाल बैस बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री …

Read More »

जर्मनीला कुशल मनुष्यबळाची गरज भागविण्यासाठी महाराष्ट्राकडून अपेक्षा नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांची माहिती

जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी युवा लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्राकडून जर्मनीला मोठी अपेक्षा असल्याचे जर्मनीचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत एकिम फॅबिग यांनी आज येथे सांगितले. यापूर्वी चेन्नई येथे वाणिज्यदूत म्हणून काम केलेल्या एकिम फॅबिग यांची जर्मनीच्या मुंबईतील वाणिज्यदूत पदी नियुक्ती झाली …

Read More »

रमेश बैस महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल; मराठीतून घेतली राज्यपाल पदाची शपथ राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या समारंभात घेतली शपथ

मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती संजय वि. गंगापुरवाला यांनी रमेश बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. बैस हे २० वे राज्यपाल असून त्यांनी मराठीमधून पदाची शपथ घेतली. शपथविधीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपालांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे अभिनंदन केले. राजभवनातील दरबार हॉलमध्ये झालेल्या या समारंभास राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, …

Read More »