Breaking News

Tag Archives: politics

हल्लाबोल मोर्चाच्या निमित्ताने सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब? राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवारांच्या नावाऐवजी सुप्रियांच्या नावावर एकमत

नागपूर : प्रतिनिधी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेसकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नासह विविध प्रश्नी राज्य सरकारच्या विरोधात हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मात्र या मोर्चाच्या निमित्ताने राज्यातील पक्षाला हवे असलेले नवे नेतृत्व सुप्रिया सुळे यांच्या रूपाने स्थापित करण्याचा प्रयत्न होता अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात सुरु आहे. महाराष्ट्रात काँग्रेसबरोबर सत्तेत असताना सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी …

Read More »

मदत न करणाऱ्या सरकारची कोणतीही बीले भरू नका जनआक्रोश मोर्चाच्या सभेत शरद पवारांचे शेतकऱ्यांना आवाहन

नागपूर : प्रतिनिधी महाराष्ट्रासह देशभरातील शेतकऱ्यांच्या शेती मालाला हमी भाव देण्याची घोषणा देत सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तरी तातडीने मदत करावीशी वाटत नाही. कर्जमाफी दिल्याशिवाय राहणार नाही अशी घोषणा दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करूनही शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत असतानाही त्यांच्याकडून अद्याप कर्जमाफी दिलेली नाही. यांच्या हृदयाला पाझर कसा …

Read More »

आजच्या परिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार सिंचनापासून सर्व घोटाळे सभागृहात मांडण्याचा मुख्यमंत्र्याचा गर्भित इशारा

नागपूर : प्रतिनिधी हल्लाबोल आंदोलनाच्या माध्यमातून हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करीत कर्जमाफीतील घोटाळे जनतेसमोर आणण्याचे आव्हान दिले. विरोधकांच्या या आव्हानाची तात्काळ दखल घेत हल्लाबोल करणार्‍यांच्या डल्लामार यात्रेचे सविस्तर पुरावेच सभागृहात सादर करणार असून राज्याच्या सद्यपरिस्थितीला पूर्वीचे सत्ताधारी आणि आताचे विरोधकच जबाबदार आहेत. त्यामुळे ते सत्तेत …

Read More »

विरोधकांचा १२ डिसेंबरला विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद नेतृत्व करणार

नागपूर : प्रतिनिधी सरकारला नाकर्तेपणाचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार आणि राज्यसभेचे विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांच्या नेतृत्वाखाली १२ डिसेंबर २०१७ रोजी विधानभवनावर जनआक्रोश हल्लाबोल मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह शेकाप, समाजवादी पक्ष, रिपाई (कवाडे) आदी सहभागी होणार असल्याची माहिती माजी मंत्री …

Read More »

नाना पटोले काँग्रेसच्या वाटेवर पक्ष संघटनेत महत्वाचे स्थान मिळण्याची शक्यता

मुंबई: प्रतिनिधी गेले काही दिवस शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नावरून आणि राज्य व केंद्र सरकारच्या कारभारवरून भाजपचे खासदार नाना पटोले यांनी सातत्याने टीका सुरु केली होती. मात्र त्याची दखल भाजपश्रेष्ठींकडून घेण्यात न आल्याने अखेर त्यांनी कंटाळून भाजप सदस्यत्वाचा आणि खासदारकीचा राजीनामा देत घरवापसी अर्थात काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याच्या हालचाली सुरु केल्या असून …

Read More »

गुजरातची निवडणूक ठरविणार महाराष्ट्रातील राजकारण पुढील राजकिय वाटचालीच्या अनुषंगाने सर्वच राजकिय पक्षांकडून चाचपणी

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांचा बालेकिल्ला असलेल्या गुजरात विधानसभेच्या निवडणूकांची रणधुमाळी सुरु आहे. गुजरात विधानसभेचा निकाल १८ डिसेंबरला जरी लागणार असला तरी त्या निवडणूकीच्या निकालावर महाराष्ट्रातील राजकारणाची गणिते अवलंबून बदलणार असून शिवसेनेची भूमिका आणि विरोधातील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीचे भवितव्यही ठरणार आहे. प्रत्येक राजकिय पक्षाकडून …

Read More »

सरकार भाजपचे निर्देश मात्र शरद पवारांचे साखर कारखान्यांची वीज खरेदी करण्यासाठी पवारांचे सरकारला आदेश

मुंबई : गिरिराज सावंत राज्यातील सहकारी साखर कारखान्यांनी राज्य सरकारच्या अपांरपारीक ऊर्जा धोरणातंर्गत ऊसाच्या चिपाडापासून वीज निर्मिती सुरु केली. मात्र ही वीज खरेदी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निर्देश दिले असून या बैठकीला मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि वीज महामंडळाचे अधिकारी उपस्थित असल्याची माहीती …

Read More »