Breaking News

Tag Archives: pm narendra modi

राज्यात या तारखेपासून होणार कोरोना लसीकरणाला सुरुवात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे निर्देश

मुंबईः प्रतिनिधी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाची मोठी मोहीम सुरू होत असून महाराष्ट्रात ही मोहीम यशस्वीरीत्या राबवावी व सर्व संबंधीत यंत्रणांनी एकमेकांशी समन्वयाने केंद्राच्या निर्देशाप्रमाणे लसीकरण करावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिल्या. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लसीकरण कार्यक्रमासंदर्भात माहिती दिली, त्यानंतर आरोग्य विभाग, टास्क फोर्सच्या …

Read More »

कृषी कायदे मागे घ्या नाहीतर…सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला दट्या शेतकरी आंदोलन हाताळण्याच्या केंद्राच्या पध्दतीवर नाराज

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्यांना शेतकऱ्यांकडून होत असलेला विरोध कायम आहे. केंद्रानं दुरूस्ती करण्याची तयारी दर्शवली असली, तरी शेतकरी मात्र कायदे रद्द करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे मागील महिनाभरापासून दिल्लीत चर्चेचं गुऱ्हाळ सुरू आहे. दरम्यान, शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेल्या आहेत. त्या याचिकांवर सुनावणी …

Read More »

मराठा आरक्षणप्रश्नी आता केंद्रातील भाजपानेही सहकार्य करावे मंत्री अशोक चव्हाण यांचे आवाहन

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मराठा आरक्षण प्रकरणी आता भाजपाच्या केंद्र सरकारनेही मदत करावी अशी अपेक्षा व्यक्त सर्वोच्च न्यायालयात जर केंद्राने मदत केली तर हा प्रश्न निश्चितच मदत होईल अशी अपेक्षा मराठा आरक्षण प्रश्नी नियुक्त मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी आज व्यक्त करत भाजपालाही यात सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. मंत्रालयातील …

Read More »

सीबीआय काही करू शकत नसल्याने ईडीचा वापर गृहमंत्री अनिल देशमुख यांची भाजपावर टीका

मुंबई: प्रतिनिधी भाजप नेत्यांच्या विरोधात किंवा धोरणाविरोधात बोलल्यावर लगेच ईडीची नोटीस पाठवण्यात येते. हेच काम सुरुवातीला सीबीआय करत होते. परंतु राज्यात चौकशी करायची असेल तर राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल असा निर्णय राज्य सरकारने घेतल्याने  सीबीआयबाबत आता केंद्र काही करु शकत नसल्याची टीका राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज केली. …

Read More »

… मोदींनी तर आपल्या न्हाव्यालाही रोजगार दिला नाही रावणाचा प्राण जसा नाभीत होता तसाच भाजपाच्या यशाचा आत्मा ईव्हीएममध्ये!: सचिन सावंत.

मुंबई : प्रतिनिधी विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव बॅलट पेपरमधील गडबडीमुळे झाल्याची शंका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी घेतली आहे. त्यांची ही शंका एका अर्थाने ईव्हीएममधील गडबडीला दुजोरा देणारीच असून ईव्हीएमने मतदान झाले तरच भाजपा विजयी होऊ शकतो असा आहे. रावणाचा प्राण जसा त्याच्या नाभीत होता तसाच …

Read More »

शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी मित्र असल्याचे दाखवण्यासाठीची इव्हेंटजबाजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष तथा मंत्री बाळासाहेब थोरात यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाताळच्या दिवशी इव्हेंटबाजी करत ९ कोटी शेतकऱ्यांना १८ हजार कोटी रुपये दिल्याचा मोठ्या थाटात गवगवा केला. दिल्लीत कडाक्याच्या थंडीत एक महिन्यापासून हजारो शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून बसलेले आहेत. नवीन कृषी कायदे रद्द करावेत ही त्यांची मागणी आहे परंतु त्या शेतकऱ्यांशी चर्चा करण्याऐवजी आपण …

Read More »

मुख्यमंत्री म्हणाले, होय मी विकासासाठी अहंकारी, पण कद्रुपणा करण्यापेक्षा चर्चेला या शेतकऱ्यांवर थंड पाण्याचे फरावे मारणे म्हणजे लोकशाही नसल्याचा विरोधकांना टोला

मुंबई : विशेष प्रतिनिधी विरोधकांकडून सातत्याने करण्यात येत असलेल्या अंहकारी या शब्दाचा धागा पकडत होय मी मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या कामात अंहकारी असून जे जनतेच्या भल्यासाठी असेल तेच करणार आहे. त्यामुळे विकासकामात आडवाआडवीपणा करण्याचा कद्रुपणा दाखविण्यापेक्षा थेट चर्चेला या बसा असे विरोधकांना आव्हान देत केंद्राच्या बुलेट प्रकल्पालाही विरोध होत असल्याचा …

Read More »

सर्वोच्च न्यायालय म्हणाले, शेतकऱ्यांशी बोला… कायद्याला स्थगिती द्या केंद्र सरकारला केली सूचना

नवी दिल्लीः प्रतिनिधी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनाकडून करण्यात येत असलेल्या आंदोलकांशी पहिल्यांदा केंद्र सरकारने बोलावे आणि अंतिम मार्ग निघत नाही तो पर्यंत कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्यावी अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एस.ए.बोबडे यांनी आज केंद्राला केली. कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे सुरु …

Read More »

संसदेचे अधिवेशनच रद्द करणाऱ्या मोदींना कितवे आश्चर्य म्हणणार ? आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हणणारा भाजपा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष

मुंबईः प्रतिनिधी राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाचा कालावधी दोन दिवसांचा ठेवल्यावरून भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारविरोधात बोंब ठोकत महाविकास आघाडी सरकारला आठवे आश्चर्य म्हटले. अधिवेशनाच्या कालावधीवरून महाविकास आघाडी सरकारला हिणवणारा भाजपा हा जगातील सर्वात दांभिक आणि ढोंगी पक्ष आहे. दोन दिवसांच्या अधिवेशनावर टीका करणारे हेच भाजपा नेते आता कोविडमुळे …

Read More »

पीएम वायफाय म्हणजे एका विशिष्ट कंपनीच्या एकाधिकारशाहीसाठी केंद्राची पावले राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी टेलिकॉम सेक्टरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांच्या सर्व्हिसेसमध्ये अडथळे निर्माण होत आहेत. ही सगळी व्यवस्था देशात निर्माण होत चालली असून सर्व टेलिकॉम सेक्टरमध्ये एकाधिकारशाही निर्माण करण्याच्यादृष्टीने केंद्रसरकारची पावले पडत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला. टेलिफोन बुथसारखी वायफाय सेंटर उघडण्याची …

Read More »