Breaking News

Tag Archives: opposition leader vikhe patil

एल्गार मोर्चाचे विधानसभेत पडसाद भिडेला पाठीशी घालत असल्याचा विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी भिमा कोरेगांव प्रकरणी मिलिंद एकबोटे आणि संभाजी भिडे या दोघांची नावे एफआयआर मध्ये आहेत. त्यातील मिलिंद एकबोटे याला अटक करण्यास अडीच महिने लागतात. तर संभाजी भिडे सगळीकडे फिरत असून पत्रकार परिषदा घेवून वावरतो. मात्र राज्य सरकारला तो सापडत नाही. यावरून राज्य सरकार भिडे यास पाठीशी घालत असल्याचे …

Read More »

विश्वास दर्शक ठरावाच्या विरोधात विरोधकांची राज्यपालांकडे तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेकापच्या सदस्यांनी घेतली भेट

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडून विरोधी बाकावरील सदस्यांना सापत्नपणाची वागणूक दिली जाते. त्यांच्याविरोधात अविश्वासाचा ठराव आणलेला असताना तो ठराव चर्चेला न घेता राज्य सरकारकडून त्यांच्यावर विश्वास दाखविणारा ठराव मांडत लोकशाही मुल्याची मोडतोड केल्याची तक्रार काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानसभेतील आमदारांनी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेत केली. यावेळी काँग्रेसचे …

Read More »

अध्यक्षांवरील विश्वासदर्शक ठरावाच्या निमित्ताने सरकारकडून लोकशाहीचा खून विरोधकांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी विधानसभेत कामकाजाच्यावेळी अनेकदा मंत्री नसतात, प्रश्नांची उत्तरे दिली जात नाहीत. उत्तरे प्राप्त होत नाहीत. मंत्री नसल्याने उत्तरे, प्रश्न, लक्षवेधी पुढे ढकलायची पध्दत सर्रास सुरु होती. एककल्लीपणाने सभागृहाचे कामकाज चालविले जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी करत केवळ या कारणामुळे …

Read More »

राज्य सरकारने विरोधकांचे तोंड दाबले अध्यक्षांवरील विश्वास दर्शक ठरावावर विरोधकांना बोलण्याची संधी नाकारली

मुंबई: प्रतिनिधी विधानसभेत विरोधकांना गाफील ठेवत विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्यावर विश्वास दर्शक ठराव संमत केल्यावरून सभागृहात विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे सत्ताधारी भाजपच्या आमदारांसह मंत्र्यांनी विरोधकांना बोलूच न देण्याची भूमिका घेतल्याने सभागृहात सत्ताधारी पक्षांकडून विरोधकांचे तोंड दाबल्याचे चित्र पाह्यला मिळाले. सत्ताधारी भाजप-शिवसेनेकडून अध्यक्षांवरील ठराव मंजूर करण्यात …

Read More »

जनसामांन्याबरोबर विरोधकांचा आवाज दाबून टाकण्याचा प्रयत्न विरोधी पक्षनेते विखे-पाटील, मुंडे यांचा राज्य सरकारवर आरोप

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील अंगणवाडी सेविकांना मेस्मा कायद्याखाली आणत सर्वसामान्य जनतेचा आवाज रोखण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून सुरु आहे. त्यात आता भाजपबरोबर शिवसेनाही सहभागी झाली असून त्यांचे मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत शांत बसतात तर सभागृहात गोंधळ घालत आहेत. तसेच विरोधकांना बोलण्याची संधी देत नसल्याचे सांगत जनमानसाचा आवाज दाबून टाकायचा प्रयत्न सरकार करत …

Read More »

हिंमत असेल तर ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळात विरोध करून दाखवा शिवसेनेच्या नौटंकीवर विरोधकाचे टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांना ‘मेस्मा’ लावण्यासंदर्भात सरकारची भूमिका चुकीचीच आहे. हा निर्णय रद्द झालाच पाहिजे. पण शिवसेनेने यासंदर्भात सभागृहात गोंधळ घालून राजदंड उचलणे म्हणजे शुद्ध नौटंकी आहे. शिवसेना सरकारमध्ये सहभागी आहे. त्यामुळे हिंमत असेल तर त्यांनी ‘मेस्मा’ला मंत्रिमंडळाच्या बैठकीत विरोध करून दाखवावा, अशी तोफ विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी …

Read More »

रेल्वे अॅप्रेंटिस आंदोलनावरील लाठीमाराची चौकशी करा विधानसभेत विखे-पाटील तर विधान परिषदेत धनंजय मुंडे यांची मागणी

मुंबई :प्रतिनिधी रेल्वेमधील अॅप्रेंटिसच्या आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराची चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज विधानसभेत करत रोजगार निर्मितीत सरकार अपयशी ठरल्यानेच बेरोजगारांना रोज आंदोलने करावी लागत असल्याची टीका केली. तर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी हे सरकारचे अपयश असल्याची टीका करीत या विषयावर सरकारने …

Read More »

विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य विरोधी पक्षनेते विखे-पाटील यांच्याकडून माहीती उघडकीस

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या विधानभवनातील अग्निशमन यंत्रे कालबाह्य झाली असून, माझ्या दालनासह अनेक ठिकाणी रिफिलची मुदत संपलेलीच उपकरणे लावण्यात आल्याची धक्कादायक माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज सभागृहात दिली. विखे पाटील यांनी सोमवारी दुपारी पॉइंट ऑफ इन्फॉरमेशनच्या माध्यमातून या गंभीर प्रकाराकडे सभागृहाचे लक्ष वेधले. ते म्हणाले की, …

Read More »

शिवसैनिक फाळकेच्या आत्महत्येचे पडसाद जीएसटीमुळे आत्महत्या केल्याने शिवसेना भूमिकेत सुधारणा करणार का? काँग्रेसचा सवाल

मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारने देशात जीएसटी करप्रणाली लागू केल्यामुळे अडचणीत असलेल्या सर्वांना मदत करूनही केवळ लोकांनी फसविल्याने आत्महत्या करण्याची पाळी कराड येथील ३२ वर्षीय सराफ व्यापारी आणि शिवसेनेचे कार्यकर्त्ये राहुल फाळके यांनी रेल्वेखाली उडी मारून आत्महत्या केली. त्याचे पडसाद आज विधानसभेत उमटले. मात्र या आत्महत्येवरून विधानसभेत काँग्रेस व शिवसेनेत …

Read More »

औरंगाबादेतील कायदा व सुव्यवस्थेचा ‘कचरा’ केल्याने आयुक्त यादव घरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविले सक्तीच्या रजेवर: काँग्रेससह सर्व पक्षांनी कामकाज रोखून धरले

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद येथील कचरा डेपोच्या प्रश्नी नागरीकांनी विरोध करत आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर विरोध केला. तसेच आंदोलनकर्त्या नागरीकांवर अमानुष लाठीहल्ला केल्याच्या निषेधार्थ काँग्रेससह, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सदस्यांनी विधानसभेचे कामकाज रोखून धरत औरंगाबादचे पोलिस आयुक्त यशस्वी यादव यांना निलंबित करण्याची आग्रही मागणी केली. त्यावर अखेर …

Read More »