Breaking News

Tag Archives: ncp

भाजपामध्ये गेलेल्या लोकांना केंद्रीय एजन्सींचे संरक्षण आहे का?… राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचा खोचक सवाल

अहमदनगर: प्रतिनिधी भाजपामध्ये गेलेल्या लोकांना सीबीआय, ईडी आणि आयकर विभाग या एजन्सींचे संरक्षण आहे का? आम्ही अशा लोकांची यादी देतो त्यांच्यावर ईडी काय कारवाई करणार असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेसाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील अहमदनगर येथे आले …

Read More »

पिकाची मोळी घेवून व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्यास जयंत पाटील यांनी दिला धीर जलसंपदा मंत्री पाटील यांनी पूरपरिस्थितीची केली पाहणी, अधिकाऱ्यांशी फोनवरून साधतायेत संवाद

बीड: प्रतिनिधी जालना, परभणी व मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कालपासून मुसळधार पाऊस पडत असून अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान झाले असून जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आज सकाळी बीड येथे नुकसानग्रस्त भागात जाऊन पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी पावसाने हाती आलेले पीक वाया गेलेल्या पीकाची मोळी घेवून व्यथा मांडणाऱ्या शेतकऱ्याला जयंत …

Read More »

मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना काळजी करु नका धनंजय मुंडे घटनास्थळी, रात्रीतून वेगाने मदतकार्य झाल्याने जीवितहानी टळली

अंबाजोगाई: प्रतिनिधी “मी धनंजय बोलतोय, तुम्ही व्यवस्थित, सुरक्षित आहात ना? किती जण व कुठे अडकलेले आहात? बोट मदतीला आली आहे का? काळजी करू नका;” असे बोलून बीड जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथे मांजरा नदीच्या पुरात अडकलेल्या नागरिकांना धीर देत त्यांची विचारपूस केली. देवळा ता.अंबाजोगाई येथील ५१ जण मांजरा …

Read More »

मतदार यादीत नावं नोंदविण्याची व दुरुस्तीची संधी मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम-राज्य निवडणूक आयुक्त

मुंबई : प्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या दृष्टीने १ ते ३० नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पात्र नागरिकांना मतदार यादीत नावे नोंदविण्याची आणि मृत, दुबार अथवा स्थलांतरीतांची नावे वगळण्याची चांगली संधी आहे. त्याबाबत विधानसभा मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्तांनी समन्वयाने व्यापक व प्रभावी जनजागृती …

Read More »

आरोग्य विभागाच्या भरती परिक्षांच्या नव्या तारखा जाहिर, “त्या” क्लिपची चौकशी ९ दिवस पूर्वी परिक्षार्थींना मिळणार हॉल तिकीट-सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची घोषणा

मुंबई : प्रतिनिधी परीक्षा आयोजनातील प्रचंड गोंधळामुळे पुढे ढकलाव्या लागलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षांच्या नव्या तारखा सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी जाहीर केल्या. गट क संवर्गासाठी येत्या २४ ऑक्टोबरला तर गट ड संवर्गासाठी ३१ ऑक्टोबरला परीक्षा होणार आहेत. परंतु या परिक्षांच्या नव्याे तारखा जाहिर करण्यात आलेल्या असल्या तरी संपूर्ण …

Read More »

अजित पवार म्हणाले, आम्हाला कळायचंच नाही हे काय चाललंय… पर्यटन विभागाच्या बजेटचा सांगितला किस्सा

मुंबईः प्रतिनिधी अनेकजण देश-विदेशात फिरुन आलेले आहेत. परंतु अनेकांनी महाराष्ट्र अजून नीट बघितलेला नाही. जग फिरण्याआधी पहिल्यांदा आपला महाराष्ट्र फिरला पाहीजे. आपली पर्यटन स्थळ बघितली पाहीजे. त्यानंतर जग बघायला बाहेर पडा असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पर्यटन दिनाचे औचित्य साधत सह्याद्री अतिथीगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी …

Read More »

महाराष्ट्रातील राजकिय नेत्यांसाठी दिल्ली असुरक्षित बनतेय ? बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे थेट मुंबईकडे रवाना

नवी दिल्ली-मुंबई: विशेष प्रतिनिधी स्वातंत्र्यपूर्व काळापासून दिल्ली राजकिय घडामोडींचे प्रमुख केंद्र राहिलेलं आहे. मात्र या दिल्लीत राजकिय अस्थिरता नेहमीच अनेक राजकिय पक्षांनी अनुभवली असली तरी मागील काही वर्षांपासून देशातील राजकिय नेत्यांनाच आता दिल्ली असुरक्षित वाटू लागल्याची चर्चा अनेक महिन्यांपासून राजकिय वर्तुळात सातत्याने सुरु आहे. विशेषत: महाराष्ट्रातील भाजपेतर पक्षाच्या नेत्यांकडून दिल्लीत …

Read More »

संजय राऊतांनी अजित पवारांना मिश्किल विनंती करत दिला इशारा अजित पवार मुख्यमंत्र्यांचं ऐकतात आपण त्यांना सांगू

पुणे : प्रतिनिधी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी म्हणून निवडणूकांना सामोरे जायचं की स्वतंत्र जायचं याबाबत अद्याप काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे एकमत झालेले नाही. त्यामुळे कधी राष्ट्रवादी तर कधी काँग्रेसकडून एकला चलो चा नारा देण्यात येत आहे. त्यानिमित्ताने शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीबरोबरील …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, भाजपाचा सुर्य मावळणार नाही या भ्रमात होते पण… शेतकऱ्यांना 'साले' बोलणार्‍या शेतकरीविरोधी भाजपचं धोरण घराघरात पोचवा - जयंत पाटील

जालना-भोकरदन: प्रतिनिधी मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळेनासा झाला आहे. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे असा आरोप करतानाच याच मतदारसंघातील भाजपनेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना ‘साले’ बोलले होते हे विधान घराघरात पोचवा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले. …

Read More »

प्रविण दरेकरांचा आरोप आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेत महाघोटाळा आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांची सीबीआय, सीआयडी अथवा निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करा

मुंबई: प्रतिनिधी न्यास कम्युनिकेशन प्रा. लि. या एकमेव कंपनीला डोळ्यासमोर ठेवून आरोग्य विभागाच्या भरती परिक्षेचे कंत्राट देताना आपल्याच शासन निर्णयात वेळोवेळी सरकारने फेरबदल केले. न्यास कंपनीला काम मिळवुन देण्यासाठी अनेक वेळा शुध्दीपत्रक काढून निविदांमधील अटी व शर्थीमध्ये गैरलागू बदल केले, काही अटी शिथिल केल्या. महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या शासकीय भरतीतल्या महाघोटाळ्याचा …

Read More »