Breaking News

Tag Archives: ncp

बार्टीचे हे ९ विद्यार्थी यंदाच्या यूपीएससी परीक्षेत यशस्वी प्रशिक्षण प्राप्त यूपीएससीतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी लॉकडाऊन मधला ऑनलाईन पॅटर्न आत्मसात करत डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणे या  संस्थेच्या वतीने  प्रशिक्षण प्राप्त केलेल्या, अनुसूचित जातीतील ९ विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. या सर्व यशस्वी  विद्यार्थ्यांचे  सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे व बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी अभिनंदन केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर …

Read More »

भाजपाने आरक्षणाचा खेळखंडोबा मांडलाय राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची टीका

जालना: प्रतिनिधी ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये ही राष्ट्रवादी पक्षाची भूमिका नेहमी राहिली आहे. केंद्र सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी लोकसंख्येला धक्का बसला आहे. इम्पिरियल डाटा देण्यास केंद्राने नकार दिला. मात्र असे असतानाही राज्य सरकारने घेतलेल्या काही निर्णयामुळे ओबीसींच्या जागा सुरक्षित झाल्या हे आपल्या सरकारचे श्रेय आहे हेही आवर्जून सांगतानाच ओबीसी …

Read More »

नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून राज्यातील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळे उघडणार आरोग्याच्या नियमांचे मात्र काटेकोर पालन व्हावे-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्रतिनिधी नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजे ७ ऑक्टोबरपासून राज्यातील सर्वधर्मियांची प्रार्थनास्थळे आरोग्याचे नियम पाळून भक्तांसाठी खुली करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, दुसऱ्या लाटेचा मुकाबला केल्यानंतर आता संभाव्य तिसऱ्या लाटेशी लढण्याचे आपण नियोजन केले आहे. मात्र हळूहळू सर्व प्रकारची काळजी घेत बऱ्याच बाबतीत निर्बंध शिथिल …

Read More »

निवडणूक आयोगाने कळवले मविआ सरकारला, “विनंती स्विकारू शकत नाही” सर्वोच्च न्यायालयाने सांगितले तरच निवडणूक थांबविणार

मुंबई : प्रतिनिधी ओबीसींचे राजकिय आरक्षण वाचविण्यासाठी म्हणून राज्य सरकारने सुधारीत अध्यादेश काढण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची मंजुरी घेतली. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील रिक्त ओबीसींच्या जागांच्या निवडणूका घेण्यात याव्यात अशी मागणी राज्य सरकारने राज्य निवडणूक आयोगाकडे केली. परंतु या नव्या अध्यादेशानुसार निवडणूका घेण्यास असमर्थता दर्शवित महाविकास आघाडीची विनंती राज्य निवडणूक …

Read More »

नितीन गडकरी म्हणाले, “दादा तुमच्यामध्ये ती ताकद आहे….” पुण्यातील कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत गडकरींचे विधान

पुणे: प्रतिनिधी पुण्यातील रिंगरोडचे काम हाती घेण्याचा प्रस्ताव होता. त्यासाठी आम्ही जमिन अधिग्रहणाच्या अनुषंगाने या संबधीची विचारणा आम्ही शेतकऱ्यांकडे केली. शेतकऱ्यांनीही जमिनी द्यायची तयारी दर्शविली. मात्र त्याची किंमत जास्त सांगितली. त्यामुळे फक्त जमिन अधिग्रहणाच्या कामाची किंमत १८ हजार कोटी रूपयांवर जात असल्याने आमच्या अधिकाऱ्यांनी हे काम करू शकत नसल्याचे स्पष्ट …

Read More »

राज्यपालांच्या सहीने आनंद तर केंद्राच्या भूमिकेने नुकसान आम्ही आमची न्यायालयीन आणि राजकीय लढाई सुरुच ठेवू-भुजबळ

नाशिकः प्रतिनिधी आज सर्वोच्च न्यायालयात केंद्रसरकारने इंपिरिकल डाटा देण्यास असमर्थता दर्शवली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने या याचिकेवर सुनावणीसाठी आता चार आठवड्याची वेळ दिली आहे. ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात हात वर करण्याचं काम केंद्राने केले आहे. केंद्राने इंपिरिकल डाटा दिल्यास सर्वच प्रश्न मार्गी लागू शकतात, मात्र केंद्राची नकारात्मक भूमिका ओबीसींना अडचणीत आणणारी असल्याचे …

Read More »

आरोग्य विभागाच्या गट क आणि ड वर्गासाठी या तारखेला परिक्षा उमेदवारांनी अफवांवर विश्वास ठेवू नये- सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागातील भरती प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्ध आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडली जात आहे. या परीक्षेसाठी आरोग्य विभागाच्या वतीने सर्व तयारी पूर्ण झाली आहे. परीक्षार्थींनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले. आरोग्य विभागाच्या गट क संवर्गातील पदासाठी २५ …

Read More »

अल्पसंख्याक उमेदवारांना मिळणार भरतीपूर्व निवासी पोलिस प्रशिक्षण राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी अल्पसंख्याक उमेदवारांना निवासी पोलीस शिपाई भरतीपूर्व परीक्षा प्रशिक्षण देण्यासाठी योजनेत बदल करून प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. योजनेच्या निकष व स्वरुपात आणि अटी व शर्तीमध्ये बदल करुन तीन महिन्यांच्या कालावधीचे निवासी प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्याबाबतची योजना …

Read More »

“ठाकरे सरकारला झुकावं लागेल”, असे म्हणत सोमय्या कोल्हापूरकडे पोलिसांच्या विरोधानंतरही सीएसटीएमहून महालक्ष्मी एक्सप्रेसने प्रवास सुरू

मुंबई : प्रतिनिधी कायदा व सुव्यवस्थेचे कारण देत कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना जिल्हाबंदी केली. त्या आधारे मुंबई पोलिसांनी सोमय्या यांना स्थानबद्ध करत रोखण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी कायदेशीर मार्गाने मला मुंबईत रोखता येत नाही रोखायचे असेल तर ते कोल्हापूरच्या वेशीवर असे सांगत ठाकरे सरकारला झुकावं लागेल …

Read More »

दिल्लीत मुजरा करू देत नसल्याने सोमय्यांचा गल्लीत गोंधळ काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी दिल्लीतील नेते मुजरा करू देत नाहीत म्हणून किरीट सोमय्या यांचा गल्लीत गोंधळ सुरु आहे. केवळ स्वत:कडे लक्ष वेधण्यासाठी त्यांची जी काही नौटंकी सुरु आहे त्याला मनोरंजनात्क मुल्य आहे अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी करत जर महाराष्ट्राचे यामुळे मनोरंजन होत असेल तर ते कोण कशाला थांबवेल अशी …

Read More »