Breaking News

Tag Archives: nawab malik

पालकमंत्री मलिक म्हणाले, परभणीकरांनो कोरोनामुक्त झाल्याबद्दल अभिनंदन पुढेही कोरोनामुक्तच राहिल असा विश्वास

परभणी: प्रतिनिधी कोरोना बाधित रुग्णाचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने परभणी जिल्हा अखेर कोरोनामुक्त झाला आहे. यासाठी मेहनत घेणार्‍या सर्व यंत्रणांचे अल्पसंख्याक मंत्री आणि परभणी जिल्हयाचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी आभार मानतानाच यंत्रणेने घेतलेल्या मेहनतीचे कौतुक केले आहे. सुरुवातीपासूनच परभणी जिल्हा कोरोनामुक्त होता मात्र एक कुटुंब पुण्यातून आल्यावर त्यातील एकाचा अहवाल …

Read More »

सोमय्या ना, त्यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नाही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे बेजबाबदार वक्तव्य करण्यासाठी प्रसिध्द असल्यानेच मागील लोकसभा निवडणुकीत त्यांच्याच पक्षाने त्यांचे तिकीट कापले, त्यामुळे किरीट सोमय्या यांच्या वक्तव्याला गंभीरतेने घेण्याची गरज नसल्याची उपरोधिक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत वाधवान प्रकरणी योग्य ती चौकशी होणार …

Read More »

८ एप्रिलला मुस्लिम बांधवानों घरातूनच नमाज अदा करा तर १४ एप्रिलला डॉ.आंबेडकरांची जयंती साजरी करण्यात बदल करण्याचे शरद पवारांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी दिल्लीच्या निजामुद्दीन येथे तब्लिगीने मरकजचे आयोजन केले होते. यामध्ये राज्यातील हजारो लोक सहभागी झाले, काही लोकांनी कदाचित कोरोना रोगाला बरोबर घेवून प्रवास केल्याचे नाकारता येत नसल्याने हा रोग फैलावतो की काय असे चित्र दिसत आहे. यापार्श्वभूमीवर ८ एप्रिल २०२० रोजी मुस्लिम समुदायाने हयात नसलेल्यांना कब्रस्तानमध्ये जावून स्मरण न …

Read More »

४ तारखेला कोरेगांव-भीमा आयोगासमोर शरद पवार हजर राहणार अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी दोन वर्षापूर्वी कोरेगांव भिमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या कोरेगांव भिमा चौकशी आयोगासमोर साक्ष देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे हजर राहणार आहेत. चार तारखेला ते साक्ष देण्यासाठी आयोगासमोर हजर राहणार असल्याचे यापूर्वीच आयोगाला कळविण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री …

Read More »

राष्ट्रवादी- शिवसेना म्हणाली, दूषित वातावरण होतेय भाजपाने बोलू नये एनपीआर, सीएएच्या कायद्यावरून विधानसभेत रणकंदन

मुंबईः विशेष प्रतिनिधी केंद्र सरकारने मंजूर केलेल्या एनपीआर आणि सीएए कायद्यामुळे राज्यातील कोणाचेही नागरिकत्व जाणार नाही. मात्र याबाबतच्या अफवा राज्याच्या मंत्र्यांकडूनच पसरविल्या जात असल्याने याप्रश्नी गृह विभागाने लक्ष घालण्याची मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्यात माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दोन मंत्र्यांच्या नावाचा उल्लेख करून त्यांना बोलू न …

Read More »

नादीरशहानंतर अमित शाहंची नोंद होईल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची टीका

मुंबईः प्रतिनिधी इतिहासात नादिरशहाने दिल्ली जाळल्याची नोंद आहे. त्यामुळे आता नादिरशहानंतर अमित शाह यांचे नाव दिल्ली जळीत प्रकरणामध्ये निश्चितपणे नोंदले जाईल अशी खोचक टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. दिल्ली जळत असताना पोलिसांनी हिंसा करणाऱ्यांवर कारवाई केली नाही. पोलिस ‘मूक दर्शक’ बनून राहिले. …

Read More »

मुस्लिम आरक्षणामुळे मराठा, ओबीसी आरक्षणावर परिणाम होणार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा इशारा

मुंबईः प्रतिनिधी राज्यातील मुस्लिम समुदायाला पुन्हा आरक्षण देण्याचा निर्णय अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर करताच भाजपा नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या आरक्षणामुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणावर परिणाम होईल असा इशारा दिला. विधान परिषदेत मलिक यांनी घोषणा केल्यानंतर देवेंद्र फडणवीस हे विधानभवन परिसरात पत्रकारांशी बोलत होते. …

Read More »

फडणवीसांनी रद्द केलेले मुस्लिम आरक्षण महाविकास आघाडी देणार विधान परिषदेत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची घोषणा

मुंबईः विशेष प्रतिनिधी भाजपाचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने रद्दबातल ठरविलेले मुस्लिम समाजाचे आरक्षण विद्यमान महाविकास आघाडी पुन्हा बहाल करणार आहे. पूर्वीच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारने मुस्लिम समाजाला सच्चर समितीच्या शिफारसीनुसार ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र त्यास भाजपा सरकारने ब्रेक लावला. परंतु विद्यमान महाविकास आघाडीकडून मुस्लिम समाजाला …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसचे मिशन २०२२ मुंबई १ मार्चपासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबईः प्रतिनिधी आगामी मुंबई महानगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीकोनातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून मिशन मुंबई २०२२ चे आयोजन करण्यात आले आहे. या मिशनच्या निमित्ताने १ मार्च रोजी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता मार्गदर्शन शिबिर सोमय्या मैदान चुनाभट्टी येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत …

Read More »

सीएए आमच्या अखत्यारीत नसताना आम्ही का राबवावा ? राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचा सवाल

मुंबईः प्रतिनिधी सीएए अंमलबजावणी राज्य सरकारच्या अखत्यारीत नाही. सर्व अधिकार केंद्राकडे आहे. आमच्या अखत्यारित नसताना का राबवावा असा सवाल करतानाच एनआरसी लागू होवू देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी जाहीर केले. एनआरसी आणणार नाही असे सांगून आपली भूमिका भाजपने बदलली. मात्र याबाबत सरकारने …

Read More »