Breaking News

Tag Archives: nawab malik

मुंबईत १७ हजार जागांसाठी ६ जुलैपासून ऑनलाईन मेळावे एमएमआरडीए कंत्राटदारांकडील १७ हजार जागापैकी पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती

मुंबई: प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांतर्गत (एमएमआरडीए) विविध कामे करणाऱ्या कंत्राटदारांकडील सुमारे १७ हजार पदांच्या भरतीकरीता कौशल्य विकास विभागामार्फत पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात २ हजार ९२३ पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी ठाणे जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र …

Read More »

रोजगारविषयक मार्गदर्शन आणि ऑनलाईन कौन्सिलिंग आता प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील बेरोजगार तरुणांना रोजगारविषयक तर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना विविध रोजगारविषयक अभ्यासक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत आता ऑनलाईन कौन्सिलिंग सत्र आयोजित करण्यात येत असल्याची माहिती कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. दरम्यान प्रायोगिक तत्वावर २४ व २५ जून रोजी उस्मानाबाद व सातारा येथे ऑनलाईन कौन्सिलिंग सत्राचे आयोजन करण्यात …

Read More »

कौशल्य विभागाच्या त्या संकेतस्थळामुळे हजाराहून अधिकांना मिळाला रोजगार २५ हजार ४७ उमेदवार आणि ११५ उद्योगांचा सहभाग, ऑनलाईन रोजगार मेळावे- मलिक

मुंबई: प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला असून सध्याचा लॉकडाऊनचा कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेता येणे शक्य नसल्याने विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या मोहिमेंतर्गत राज्यात …

Read More »

या कॉर्पोरेट कंपन्या आणि देणगीदारांनी दिली ५२ कोटींहून अधिकची मदत कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी कौशल्य विकास विभागाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीने सीएसआर देणगी समन्वयाचे उत्कृष्ट काम करुन लाखो आपत्तीग्रस्तांना मोठी मदत मिळवून दिली. यासाठी सोसायटीमार्फत धैर्य मोहीम राबविण्यात आली. याअंतर्गत विविध कॉर्पोरेट्स आणि खाजगी देणगीदारांकडून ५२ कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या विविध प्रकारच्या मदत साहित्याची उभारणी आणि त्याचे गरजुंना …

Read More »

अर्थव्यवस्था अद्यापही पूर्वपदावर नाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी लॉकडाऊनच्या काळात राज्यातील सर्वच आर्थिक केंद्रे बंद असल्याने तिजोरीत फारसा महसूल जमा झाला नाही. तसेच विद्यमान परिस्थितीतही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने कामांसाठी लागणारा निधी कसा जमा केला जातोय याची माहिती आम्हालाच असल्याचे स्पष्टोक्ती राज्याचे उपमुख्यमुत्री अजित पवार यांनी दिली. जळगांव, सोलापूर यासह अन्य भागात जी काही रूग्णांची संख्या …

Read More »

खाजगी-सरकारी नोकरी पाहिजे, कामगार पाहिजे या संकेतस्थळावर नाव नोंदवा एका क्लिकवर रोजगार संधींची माहिती: कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील उद्योगांमधील उपलब्ध रोजगारसंधींची माहिती बेरोजगार तरुणांना आता संकेतस्थळावर मिळणार आहे. याशिवाय याच संकेतस्थळावर उद्योजकांनाही राज्याच्या विविध भागात उपलब्ध असलेल्या विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळाची माहिती मिळणार आहे. यासाठी कौशल्य विकास विभागाच्या माध्यमातून www.mahaswayam.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे. या संकेतस्थळाद्वारे उद्योजक आणि त्यांना आवश्यक असलेल्या कुशल …

Read More »

सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांचे प्रतित्तुर

मुंबई: प्रतिनिधी लोकशाही मार्गाने चालणार्‍या सरकारला सर्कस बोलणार्‍या राजनाथसिंह यांचे ‘अनुभवाचे बोल’ असल्याचे प्रतित्तुर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिले. केंद्रीय मंत्री राजनाथसिंह यांनी रिंगमास्टरच्या चाबूकने महाविकास आघाडी सरकार चालवले जात असल्याचे वक्तव्य केले होते. महाराष्ट्रामध्ये लोकशाही मार्गाने सरकारचे …

Read More »

कर्जबाजारी करण्याचा उद्योग केलेल्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये फडणवीस यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांचा टोला

मुंबई : प्रतिनिधी ज्यांनी राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये त्यांच्या सल्ल्याची आम्हाला गरज नाही. आम्ही राज्याची आर्थिक बाजू सांभाळण्यास सक्षम आहोत. त्यांना कर्ज काढण्याचा सल्ला द्यायचा असेल तर त्यांनी कंपनी खोलली पाहिजे अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्याक …

Read More »

राज्याच्या कौशल्य विकासचे विद्यार्थीही उतरले कोविडच्या युध्दात १५० उमेदवारांना हॉस्पीटलमध्ये मिळाली अप्रेंन्टीसशिप

मुंबई: प्रतिनिधी कोविड विरोधी लढ्यात नर्स, डॉक्टरांचा स्टाफ कमी पडत असल्याने कोरोना यौध्द्यांची भरती राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र तरीही संख्या कमी पडत असल्याने कौशल्य विकास विभागाच्या अंतर्गत असलेल्या प्रशिक्षण केंद्रातून नर्सिंग, लॅब टेक्निशियन, डायलेसिस टेक्निशिअन आणि पॅरा मेडिकल कोर्स केलेल्या विद्यार्थ्यांना आता मुंबई. ठाणे येथील रूग्णालयात अप्रेंटीशिप देण्यात येत …

Read More »

अर्थव्यवस्थेला चालना देणाऱ्या तज्ञगटाच्या अहवालावर मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनामुळे संकटात असलेल्या राज्य अर्थव्यवस्थेला रुळावर आणण्यासाठी नियुक्त तज्ज्ञगटाने त्यांचा अहवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीकडे आज मंत्रालयात सादर केला. तज्ञाच्या या अहवालात सुचवण्यात आलेल्या उपाययोजनांवर मंत्रिमंडळ उपसमिती बैठकीत आज विचारविमर्श करण्यात आला. उपसमिती सदस्यांनी सुचवलेल्या सूचना, शिफारशींसह हा अहवाल आता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरीसाठी …

Read More »