Breaking News

Tag Archives: minister

राज्यातील शिधावाटप दुकानांमध्ये उपलब्ध होणार बँकींग सेवा

केंद्राच्या इंडिया पोस्ट पेमेंटस बॅंक या संकल्पनेच्या धर्तीवर आता राज्यातील ५० हजार रास्त शिधावाटप दुकानांमध्ये राष्ट्रीयकृत बँका, इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक, टपाल विभाग, संचार मंत्रालय, भारत सरकार व खाजगी बँका आदी नागरी सेवा पुरविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्वात सुलभ, परवडणारी, आणि विश्वासार्ह बॅंक …

Read More »

राज्यातील युवतींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेक वर्षानिमित्त राज्यात ३ लाख ५० हजार शाळकरी, महाविद्यालयीन युवतींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महिला व बालविकास विभाग आणि राज्यातील सर्व विद्यापीठे व स्वयंसेवी संस्थेच्या सहाय्याने गुरूपौर्णिमेचे औचित्य साधून ३ ते १५ जुलै दरम्यान तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे अशी …

Read More »

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात २५ टक्क्यांनी वाढ मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वांत मोठा विभाग आहे. या विभागाच्या महसूलात गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. राज्याला विकासाच्या वाटेवर कायम ठेवण्यासाठी महसूल वाढविण्यासोबतच अवैध मद्य निर्मिती व वाहतूक आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने थांबवणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. …

Read More »

प्रसारमाध्यमातील जाहिरात कोणी दिली? शंभूराज देसाई म्हणाले, तो अज्ञानी…अज्ञात आहे…

राज्यातील बहुतांश वर्तमान पत्रांमध्ये आज मंगळवारी १३ जून रोजी देवेंद्र फडणवीस यांच्या पेक्षा मुख्यमंत्री म्हणून विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अधिक पसंती असल्याची भली मोठी जाहिरात पाहून भाजपामधील अनेक नेत्यांना धक्का बसला. त्यातच ही पसंतीची आकडेवारी एका सर्व्हेद्वारे मिळाली असल्याचा दावाही या जाहिरातीमध्ये करण्यात आली. मात्र या जाहिरातीच्या माध्यमातून करण्यात …

Read More »

राज्यातील ६० हजारांहून अधिक बालकांना मिळणार या योजनेचा लाभ

महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणा-या बालसंगोपन योजनेच्या नावात बदल करण्यात आला असून महिला व बाल विकास विभागांतर्गत काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या ६० हजारांहून जास्त बालकांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेसाठी यापूर्वी विभागाच्या असलेल्या वेगवेगळया मार्गदर्शक सूचनांमध्ये एकसूत्रता यावी यासाठी सर्वसमावेशक शासननिर्णय काढला असून या योजनेला ‘क्रांतिज्योती …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे आवाहनः या व्हॉट्सअॅप नंबरवर तक्रार करा अन् ८ तासात रिझर्ल्ट बघा ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाइन'चा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ'

नालेसफाई पाठोपाठ मुंबईकरांना कचरा आणि डेब्रिजच्या तक्रारीसाठी विशेष क्रमांकाची सुविधा देण्यात आली असून ‘मुख्यमंत्री स्वच्छ मुंबई व्हॉटस्अप हेल्पलाईन’चा (8169681697) शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. मुंबईकरांनी तक्रार केल्यानंतर तातडीने कचरा आणि डेब्रिज उचलला गेला पाहिजे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने यंत्रणा सतर्क ठेवावी. प्रभावीपणे या यंत्रणेचा वापर करून मुंबईतील रस्ते …

Read More »

मंत्री मंगलप्रभात लोढा यांचे आदेश, बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिरात १३२ तक्रारींचे निराकरण

बेस्टची बस सेवा नवी मुंबई ते कफ परेड सुरू करावी अशी मागणी लक्षात घेता याबाबत स्थानिक प्रशासनाने कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिले. फोर्ट येथील मुंबई महापालिकेच्या ए वॉर्ड येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिबिर (सरकार आपल्या दारी) कार्यक्रमात महिला व बालविकास मंत्री …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, संजय राठोड यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करा संजय राठोडांच्या मंत्रालयातील कार्यालयातून पैशांच्या मागणीचा प्रकार गंभीर

अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या मंत्रालयातील कार्यालयातूनच पैशांची मागणी केली जात असल्याचा आरोप अत्यंत गंभीर आहे. राठोड यांच्या कार्यालयात कामासाठी दाद मागितल्यानंतर त्यांच्या कार्यालयातील अधिकारी मोठ्या रकमेची मागणी करतात, हा औषध विक्रेता संघटनेचा आरोप आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाची दखल घेत संजय राठोड यांच्यावरील आरोपांची …

Read More »

पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण करण्यास शासनाची प्राथमिकता सहकार मंत्री अतुल सावे यांची ग्वाही

“राज्यातील सहकार चळवळ अधिक बळकट करण्यासाठी पतसंस्थामधील ठेवीदारांच्या हिताचे संरक्षण करणे आणि ठेवीदारांची विश्वासार्हता वृद्धिंगत करण्यास शासनाची प्राथमिकता आहे. यासाठी स्थिरीकरण व तरलता सहाय्य निधी योजना राज्य शासनाने प्रस्तावित केली आहे,” अशी माहिती सहकार मंत्री अतुल सावे यांनी दिली. मंत्रालयात नुकतीच याबाबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत …

Read More »

भर उन्हात कार्यक्रम कोणाच्या सांगण्यावरून? उदय सामंत म्हणाले, त्यांच्याशी चर्चा करूनच वेळ ठरविली… कार्यक्रमाची वेळ हुकूमशाही पध्दतीने ठरविली नव्हती

अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु असताना २०२२ सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार श्री परिवाराचे प्रमुख डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना जाहिर करण्यात आला. त्यानंतर लगोलग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेवदंडा येथील डॉ आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान केला. त्यानंतर पुन्हा ऐन उन्हाळा सुरु झालेला असताना खारघर येथे पुरस्कार …

Read More »