Breaking News

Tag Archives: minister

राज्यात प्रो-कबड्डीच्या धर्तीवर ३१ ऑगस्टला प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री संजय बनसोडे यांची माहिती

स्टेडियममध्ये ३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत प्रो-गोविंदा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुक्तागिरी या शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पत्रकार परिषदेला बंदरे युवक व क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महाराष्ट्र ऑलिंपिक असोसिएशनचे सचिव नामदेव शिरगावकर, दहीहंडी समन्वय …

Read More »

भिक्षेकरी यांनाही मिळणार कौशल्य विकासाचे प्रशिक्षण महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

चेंबूर येथील शासकीय पुरुष आणि महिला भिक्षेकरीगृह आणि मानखुर्द येथील दि चिल्ड्रेन्स एड होम, मुले तसेच मुलींचे नवीन बालगृह , गतिमंद मुलांसाठीचे बालगृह, चिल्ड्रेन्स एड सोसायटीची प्राथमिक व माध्यमिक शाळा यांना, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी अलीकडेच भेट देऊन तिथे देण्यात येणाऱ्या वैद्यकीय सुविधा, अन्न-धान्याची गुणवत्ता, स्वयंपाकाच्या ठिकाणी …

Read More »

मुंबई गोवा रस्त्याच्या सिंगल लेनचे काम पूर्ण मंत्री रविंद्र चव्हाण यांची माहिती

मुंबई गोवा महामार्गावरील पनवेल ते कासू व कासू ते इंदापूर या दोन टप्प्यांपैकी पहिल्या ४२ किलोमीटरच्या टप्प्यापैकी २३ किलोमीटरचे सिंगल लेनचे काम पूर्ण झालेले आहे. या टप्प्यातील उर्वरित काम तसेच कासू ते इंदापूर या दुसऱ्या टप्प्यातील काम नवीन मशिनरींच्या साह्याने जोमाने सुरू आहे हे सिंगल लेनचे काम गणपतीपूर्वी शंभर टक्के …

Read More »

महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाची उलाढाल दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे कृषी विभागाच्या भूखंडांवर शेतकरी व ग्राहक उपयोगी उपक्रम राबवणार-कृषी मंत्री धनंजय मुंडे

शेतकऱ्यांना लागणारी खते, कीटकनाशक, कृषी अवजारे तसेच शेतीमध्ये उत्पादित होणाऱ्या मालावरील प्रक्रिया उद्योग यामधील नाविन्यता शोधून महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळाची उलाढाल पुढील वर्षापर्यंत दुप्पट करण्याचे उद्दिष्ट ठेवावे, असे निर्देश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित या महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या अधिनस्त असलेला महामंडळाच्या आढावा …

Read More »

उरण येथील सिडको प्रकल्पग्रस्तांना ६ महिन्यांत भूखंड वाटपाची कार्यवाही पूर्ण करणार मंत्री उदय सामंत यांची विधान परिषदेत माहिती

रायगड जिल्ह्यातील उरण येथील प्रकल्पासाठी सिडकोने २८ गावांमधील ४५८४ हेक्टर जागा संपादित करण्याचा निर्णय घेतला. यापैकी १३४ हेक्टर जागा प्रकल्पग्रस्तांना देणे आवश्यक होते. १०४३ प्रकल्पग्रस्तांना १०२.९२ हेक्टर जागेचे वाटप करण्यात असून साडेबारा टक्के योजनेतंर्गत ५७५ प्रकल्पग्रस्तांना ३२.४२ हेक्टर जागेचे वाटप होणे बाकी आहे. अशा भूखंड वाटपाच्या प्रतिक्षेत असलेल्या प्रकल्पग्रस्तांना साडेबारा …

Read More »

अतुल लोंढे यांचा टोला, देश कसा चालवायचा हे दीपक केसरकरांनी काँग्रेसला शिकवू नये केसरकरजी, कर्नाटकात ५५ दिवसांनंतरही विरोधी पक्षनेता नाही

काँग्रेसला विरोधी पक्षनेता निवडता येत नाही ते देश काय चालवणार? हे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकरांचे विधान बालिश व अत्यंत हास्यास्पद आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देश चालवता येत नाही व एकनाथ शिंदेंना महाराष्ट्र चालवत येत नाही हे जनतेला समजले आहे. काँग्रेसने ६० वर्षांपेक्षा जास्त केंद्रातील व विविध राज्यात सरकारे चालवली …

Read More »

नाना पटोले यांची मागणी, सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची होणारी लूट थांबवा सेतू कार्यालये अद्ययावत करण्यासाठी शासनाचे धोरण काय?

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे दाखले सेतू कार्यालयातून घ्यावे लागतात. ही सेतू कार्यालये जनतेच्या सुविधांसाठी आहेत परंतु या सेतू कार्यालयातून सामान्य जनतेची सर्रास लूट केली जात आहे. १५ ते २० रुपयांच्या दाखल्यासाठी २०० ते ३०० रुपये घेतले जातात, जनतेची होणारी ही लूट सरकारने थांबवावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष …

Read More »

देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन, फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिकेला डिजीटली जोडणार पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेणार

घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजीटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी ज्या महानगरपालिकांची आर्थिक स्थिती चांगली आहे, अशा महानगरपालिकांनी सॅटेलाईटद्वारे छायाचित्रे मिळवण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री …

Read More »

परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेंतर्गत विद्यार्थ्यांची संख्या वाढविणार पण… मंत्री शंभूराज देसाई यांची माहिती

इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील एकूण ५० विद्यार्थ्यांना परदेश शिष्यवृत्ती योजनेचा लाभ देण्यात येतो. विद्यार्थ्यांची संख्या वाढविण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले. सदस्य अभिजित वंजारी यांनी याबाबतचा …

Read More »

बार्टीच्या प्रश्नावरून भाजपा आणि पवार गटाच्या नेत्यांनी धरले शिंदे गटाच्या मंत्र्याला कोंडीत अखेर मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले आश्वासन उत्तर सुधारून देण्याचा प्रयत्न

मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ‘बार्टी’मार्फत राबविण्यात येणाऱ्या कौशल्य प्रशिक्षण केंद्र सुलभपणे सुरु करण्याबाबत आणि त्यावरुन विचारलेल्या प्रश्नांना समाधानकारक उत्तर न दिल्याने भाजपा आमदार आशिष शेलार आणि राष्ट्रवादीच्या पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी मंत्री शंभुराज देसाई यांना चांगलेच कोंडीत पकडल्याचे विधानसभेत दिसून आले. समाधानकारक उत्तर न देणाऱ्या शंभूराज देसाई यांना धारेवर धरत …

Read More »