Breaking News

Tag Archives: minister

सुप्रिया सुळे संतापल्या, …महिलांबाबतचा तात्काळ तो निर्णय मागे घ्या पती गमाविलेल्या महिलांसाठी 'गंगा भागिरथी' हा निर्णय घाईघाईत

पती गमाविलेल्या महिलांना त्यांचा आत्मसन्मान मिळवून देण्यासाठी राज्यातील अनेक गावांमध्ये प्रयत्न सुरू असताना, सरकार ‘गंगा भागिरथी’ हा जो काही वेगळा विचार करीत आहे, तो घाईघाईने घेतलेला निर्णय वाटतो त्यामुळे तो तात्काळ मागे घ्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करुन केली. महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात …

Read More »

तळीरामांमुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या इतिहासात पहिल्यांदाच विक्रमी महसूल यंदाच्या वर्षी २१ हजार कोटींचा महसूल मिळाला

राज्य शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग असलेल्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या महसूलात सरत्या आर्थिक वर्षात २५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सन २०२१-२२ या आर्थिक वर्षात १७,५०० कोटी रुपये इतका महसूल उत्पादन शुल्क विभागाने मिळवला होता. तर आता, सन २०२२-२३ या सरत्या आर्थिक वर्षात विभागाने २१,५०० कोटी रुपये …

Read More »

महाजनांच्या टीकेवर इम्तियाज जलील यांचा टोला, उच्च शिक्षित आहेत थोडी अक्कल असेल पण… छ्त्रपती संभाजीनगर किराडपुरा भागातील राड्यावरील आरोपाला प्रत्युत्तर

छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात काल रात्री राडा झाला. यावेळी दंगलखोरांनी पोलिसांची वाहनं जाळली, सामान्य नागरिकांची वाहनं जाळली, अनेक वाहनांची तोडफोडही केली. पोलीस ठाण्यावर दगडफेक केली. यामुळे कालपासून किराडपुरात तणावाची परिस्थिती आहे. दरम्यान, या सर्व प्रकाराला खासदार इम्तियाज जलील कारणीभूत आहेत, असा आरोप भाजपा आमदार गिरीश महाजन यांनी केला. गिरीश महाजन …

Read More »

शंभूराज देसाई यांची मोठी घोषणा, अवैध दारू दुकानांवर आता ड्रोन मार्फत नजर अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली आणणार

राज्यातील अवैध मद्य निर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी ट्रॅक आणि ट्रेसिंग कार्यप्रणाली लवकरच आणणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले. सदस्य अभिमन्यू पवार यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी विधानसभा सदस्य ॲड. आकाश फुंडकर, डॉ. देवराव होळी, पंकज भोयर यांनीही प्रश्न उपस्थित केले. मंत्री देसाई …

Read More »

तिल्लोरी कुणबी जात प्रमाणपत्राबाबत मंत्री अतुल सावे यांचे विधानसभेत आश्वासन १५ दिवसात बैठक घेऊन निर्णय घेणार

विद्यार्थ्यांना नोकरी आणि शिक्षणासाठी आवश्यक असणारे जात प्रमाणपत्र वेळेत सादर करणे आवश्यक असते. तिल्लोरी कुणबी समाजाच्या विद्यार्थ्यांना आवश्यक असणारे प्रमाणपत्र वेळेत दिले जाण्याबाबतची सूचना संबंधित जिल्हाधिकारी यांना करण्यात येईल आणि येत्या १५ दिवसात याबाबत विस्तृत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री अतुल सावे यांनी विधानसभेत सांगितले. कोकणातील तिल्लोरी कुणबी समाजाच्या लोकांना …

Read More »

उध्दवजी तुम्ही खतं देण्याऐवजी भलतंच दिलत, सुधीर मुनगंटीवारांची उध्दव ठाकरेंना साद उध्दव ठाकरेंनी मात्र तुम्ही निरमा टाकलात असे उत्तर

भाजपा आणि शिवसेना यांची युती तुटली आणि २०१९ साली महाविकास आघाडीसारखा न भूतो न भविष्यती असा प्रयोग महाराष्ट्रात झाला. अडीच वर्षं हे सरकार सत्तेत राहिल्यानंतर शिवसेनेत बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरेंचं सरकार पडलं. या राजकीय घडामोडींचे संदर्भ महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सातत्याने येत असतात. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गुरुवारी त्याचेच पडसाद …

Read More »

लव्ह जिहाद प्रकरणी अबु आझमी यांनी दाखल केला मंत्री लोंढांच्या विरोधात हक्कभंग चार महिन्यांत एकही प्रकरण नाही खोटारड्या लोढांना मंत्रिपदावरून हटवा!

राज्यात लव्ह जिहादच्या एक लाख प्रकरणांची नोंद झाल्याची माहिती महिला व बाल विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधानसभेत दिली. मात्र त्यांच्याच विभागाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या डिसेंबरपासून लव्ह जिहादचे एकही प्रकरण घडलेले नाही. त्यामुळे लोढा हे खोटे बोलत असल्याचे सिध्द झाले असून त्यांना तातडीने मंत्रिपदावरून हटवण्यात यावे अशी मागणी समाजवादी पार्टीचे …

Read More »

आता चंद्रकांत पाटील यांच्याकडूनही बावनकुळेंच्या वक्तव्याची री…आमची तयारी विधानसभेसाठी २८८ तर लोकसभेच्या ४८ जागांची भाजपाकडून तयारी

राज्यातील सत्तासंघर्षावरील याचिकांवरील अंतिम सुनावणी कधी लागेल याबाबतचा कोणताही अंदाज स्पष्टपणे दिसून येत नाही. तसेच राज्यातील लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांही अद्याप लांब असतानाच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला फक्त ४७ जागा विधानसभेच्या निवडणूकीत देणार असल्याचे सांगत २४० जागांवर भाजपाची तयारी असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले. त्यावरून …

Read More »

एसटी बस चालक-वाहकांसाठी खुषखबरः रात्रीच्या वस्ती भत्त्यात वाढ होणार बस स्थानकांवरील विश्रांतीगृहांसह स्वच्छतागृहांची- सुधारणासह स्वच्छता करणार-मंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

महाराष्ट्र राज्य परिवहन (एस. टी) महामंडळाच्या राज्यातील विविध बसस्थानकांवर बस चालक आणि वाहकांसाठी असलेल्या विश्रांतीगृहांमध्ये स्वच्छता आणि सुधारणा करण्याबाबत तातडीने संबंधितांना सूचना देण्यात येतील, अशी माहिती मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. विधान परिषदेत आज प्रश्नोत्तराच्या तासाला सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मंत्री भुसे म्हणाले की, एस. टी.च्या …

Read More »

मंत्री शंभूराज देसाईंची मोठी घोषणा, मॉर्फींग व्हिडिओप्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी सर्वपक्षियांच्या मागणीवर शिंदे-फडणवीस सरकारचा तात्काळ निर्णय

दहिसरचे आमदार प्रकाश सुर्वे आणि शिवसेनेच्या शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांचा एक आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सदरचा व्हिडिओ हा मॉर्फ असल्याचा आरोप शीतल म्हात्रे यांनी करत यामागे ठाकरे गटाच्या शिवसेनेचे कार्यकर्त्ये असल्याचा आरोपही केला. त्यानंतर या घटनेचे पडसाद आज विधानसभेत उमटले. आज सकाळी शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव, …

Read More »