Breaking News

Tag Archives: mahavikas aghadi

शरद पवार यांचे पुन्हा संभ्रमातित वक्तव्य; २०२४ ला मविआ म्हणून लढण्याचा निर्णय….. राजकिय वर्तुळात तर्त-वितर्कांना उधाण

राज्यातील विरोधकांकडून एकाबाजूला भाजपाला हरविण्यासाठी विविध पातळीवर मोट बांधण्याचे प्रयत्न सुरु असतानाच महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेस यांच्यात परस्पर विरोधी भूमिका असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या संभ्रमावस्था निर्माण झाल्याचे दिसून येत आहे. अदानीप्रकरणी जेपीसी काँग्रेसची भूमिका असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …

Read More »

अजित पवार यांच्या खोचक टोल्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर, मविआचे आम्ही चौकीदार…. जी भूमिका राष्ट्रवादीने घेतली होती तशीच आम्हीही घेतली

मागील तीन-चार दिवसांपासून अजित पवार भाजपात जाणार, पुन्हा एकदा राज्यात राजकीय भूकंप होणार या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून उधाण आलं होतं. परंतु या चर्चांना अजित पवार यांनी मंगळवारी १८ एप्रिल रोजी पूर्णविराम दिला. असल्या कुठल्याही बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच आपल्याबद्दल अफवा पसरवणाऱ्या नेत्यांचा अजित पवारांनी …

Read More »

मुंबई महापालिकेबाबत घेतलेला शिंदे-फडणवीस सरकारचा ‘हा’ निर्णय न्यायालयाने केला मान्य पालिकेच्या हद्दीत २२७ सच वार्ड

वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुंबईतील वार्ड संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्यातील महाविकास आघाडी सरकारने घेतला. मात्र त्यानंतर काही महिन्यातच राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस यांचे भाजपाचे सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारचा निर्णयात बदल करत मुंबई महापालिकेच्या वार्ड संख्येत केलेली वाढ पुन्हा रद्दबादल करत २३६ वरून २२७ इतकी करण्यात आली. या …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, संघाला असला कारभार चालतो का?… शेतकरी हवालदील अन हे रामभक्त म्हणून अयोध्येत

राज्यात आम्ही काँग्रेस, राष्ट्रवादीबरोबर गेलो म्हणून माझ्यावर हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. पण मी माझ्या वाड-वडिलांपासून सांगत आलोय की आमचं हिंदूत्व हे शेंडी-जाणव्याचं हिंदूत्व नाही. आमचं हिंदूत्व हे राष्ट्रीयत्वाशी जोडलेले आहे. पण भाजपाने एकदा जाहिर करावं कि त्याचं हिंदूत्व हे नेमकं कशाचं हिंदूत्व आहे ते कदाचीत त्याचं हिंदूत्व हे गोमूत्रधारी …

Read More »

नाना पटोले यांची स्पष्टोक्ती, मविआची राज्यभर वज्रमुठ…. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले

महाविकास आघाडी भक्कम असून आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. महाविकास आघाडीच्या राज्यभर वज्रमुठ सभा होत आहेत. छत्रपती संभाजीनगरच्या यशस्वी सभेनंतर आता १६ तारखेला नागपुरात सभा होत आहे त्यानंतर मुंबई व इतर ठिकाणी या सभा होणार आहेत. महाविकास आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे विरोधक धास्तावले आहेत त्यामुळेच विरोधकांकडून आघाडीत मतभेद असल्याचा अपप्रचार केला जात …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप, मराठवाड्याशी उध्दव ठाकरे यांनी बेईमानी केली हातातली सत्ता गेल्याची मळमळ संभाजीनगरच्या सभेत दिसली

भाजपाचा विश्वासघात करून मिळवलेली सत्ता हातातून निसटल्याची, मंत्रीपदे हातातून गेल्याची मळमळ उद्धव ठाकरे, अजित पवार, बाळासाहेब थोरात, धनंजय मुंडे या नेत्यांच्या संभाजीनगर येथील सभेत बाहेर पडली, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी नागपूर येथे पत्रकारांशी बोलताना केली. केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे – फडणवीस …

Read More »

उध्दव ठाकरे यांचा सवाल, …मग सत्ता स्थापन झाली त्यावेळी तुम्ही काय सोडलं होतं? उध्दव ठाकरे यांचा शिंदेंबरोबर अमित शाहंवर घणाघात, तर सत्तेसाठी मिदें गटाचे काय चाटत आहात?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणून हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. मग याच दोन पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली त्यावेळी मग तुम्ही काय सोडलं होतं असा खोचक …

Read More »

अजित पवार यांचा सवाल, …तेव्हा दाकखीळ बसली होती का? हिमंत असेल तर आताच सावरकर यांना भारतरत्न जाहिर करा

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा पार पडत आहे. तर, दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या( शिंदे गट ) वतीने संभाजीनगरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. यावेळी झालेल्या वज्रमुठ सभेत अजित …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, भाजपा आणि शिंदेंच्या शिवसेनेला सवय… मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रातलं चित्र बदलतय

महाविकास आघाडीची पहिलीच सभा छत्रपती संभाजीनगर येथे पार पडणार आहे. या सभेसाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिन्ही पक्षांचे लाखो कार्यकर्ते आज संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहेत. या सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. महाविकास आघाडीकडून या सभेला ‘वज्रमूठ’ असं नाव देण्यात आलं आहे. पण मविआची हीच वज्रमूठ …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितले महाविकास आघाडीच्या विजयाचे रहस्य, भाजपाची खरी ताकद… निष्ठावान शिवसैनिक भाजपा विरोधात

शिवसेना भाजपासोबत होती म्हणून महाराष्ट्रात भाजपाला यश मिळू शकले. तसे पाहिले तर भाजपाची खरी ताकद फार कमी आहे. आज शिवसेना संपवण्याचे काम भाजपाने केले. त्यामुळे खरे शिवसैनिक भाजपाविरोधात असल्याने आता महाविकास आघाडी मिळून भाजपाला पराभूत करू असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पारोळा येथे केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष …

Read More »