Breaking News

अजित पवार यांचा सवाल, …तेव्हा दाकखीळ बसली होती का? हिमंत असेल तर आताच सावरकर यांना भारतरत्न जाहिर करा

छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होत आहे. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर ही सभा पार पडत आहे. तर, दुसरीकडे भाजपा आणि शिवसेनेच्या( शिंदे गट ) वतीने संभाजीनगरमध्ये वीर सावरकर गौरव यात्रा काढण्यात येत आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरकारवर टीकास्र डागलं आहे. यावेळी झालेल्या वज्रमुठ सभेत अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांच्या सावरकर गौरव यात्रेवरून हल्लाबोल करताना म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान झाल्यावर दातखीळ बसली होती का? असा सवाल केला.

यावेळी पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, तत्कालीन राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंचा अपमान केला. सरकारमधील मंत्री, प्रवक्ते आणि आमदारांनीही बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा अपमान करण्याचं काम केलं. तेव्हा दातखीळ बसली होती का? त्यावेळी का गौरव यात्रा काढण्यात आल्या नाहीत, असा खोचक सवालही केला.

अजित पवार यांनी पुढे सावरकर यांच्यावरून सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधताना म्हणाले, आम्हाला सर्व महापुरूषांबद्दल आदर आहे. सर्व महापुरुषांनी तेव्हा काम केलं, म्हणून आपण हे दिवस पाहतोय. त्यांच्यामुळे देशाला स्वातंत्र्य मिळालं. वीर सावरकर यांच्याबाबत काही वक्तव्य करण्यात आली. पण, काही वडिलधारी लोकांच्या मध्यस्तीने ते सुद्धा वातावरण शांत झालं. आज संभाजीनगरमध्ये सभा होत असताना, जाणीवपूर्वणक दोन केंद्रीय मंत्री आणि राज्यातील तीन मंत्री गौरव यात्रा काढत आहेत, असे सांगितले.

तसेच गौरव यात्रा काढण्यास आमचा विरोध नाही. पण, दुटप्पीपणा करण्यात येत असल्याचा आरोप करत अजित पवार म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा नाव घेऊन सरकारमध्ये आलात. छत्रपतींचा अपमान झाल्यावर राज्यपालांना कोण काही बोललं नाही. हे महाराष्ट्राने पाहिलं आहे. याचा विसर महाराष्ट्राला पडणार नाही, तुम्हाला सावरकर यांचा गौरवच करायचा आहे तर त्यांना आता तातडीने भारतरत्न पुरस्कार जाहीर करा असे आव्हानही सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारला दिले.

 

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *