Breaking News

उध्दव ठाकरे यांचा सवाल, …मग सत्ता स्थापन झाली त्यावेळी तुम्ही काय सोडलं होतं? उध्दव ठाकरे यांचा शिंदेंबरोबर अमित शाहंवर घणाघात, तर सत्तेसाठी मिदें गटाचे काय चाटत आहात?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजीनगर येथील ‘वज्रमूठ’ सभेतून भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधताना म्हणाले आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादी बरोबर गेलो म्हणून हिंदूत्व सोडल्याचा आरोप केला जातो. मग याच दोन पक्षांबरोबर सत्ता स्थापन केली त्यावेळी मग तुम्ही काय सोडलं होतं असा खोचक सवाल करत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही टीकास्र सोडलं. सत्तेसाठी मी काँग्रेस राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो, तर तुम्ही आता मिंध्यांचे काय चाटत आहात? असा थेट सवाल उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना विचारला आहे.

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले, आपण छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेतो आणि पाठीत वार करतो? बरं ठीक आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी सत्तेसाठी एकत्र आलो होतो. हो आलो होतो. पण आता सत्ता गेल्यानंतरही आम्ही एकत्र आहोत. उलट आता आम्ही अधिक घट्ट आहोत.

मध्यंतरी अमित शाह पुण्यात येऊन गेले. त्यांनी माझ्यावर आरोप केले. मी सत्तेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तळवे चाटले, असं ते म्हणाले. मला शिवसेना प्रमुखांची भाषा येत नाही, असं नाहीये. पण मला आवरावं लागतं. काही शब्द, भाषा बाळासाहेब ठाकरे यांच्या तोंडीच शोभणारी आहे. मला ती भाषा शोभणारी नाही. पण मी त्यांना (अमित शाह) फक्त एवढंच म्हणालो की, आम्ही सत्तेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीचे तळवे चाटत होतो. तर तुम्ही सत्तेसाठी मिंध्यांचं काय चाटत आहात? असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला.

बिहारमध्ये आधी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार होतं. आता तेच सरकार पुन्हा स्थापन झालंय. चांगली चाललेली सरकारं फोडायची, हा किती भयानक प्रकार आहे. पण त्यावेळी नितीशकुमार आणि लालू प्रसाद यादव यांचं सरकार पाडून तुम्ही नितीशकुमार यांचं काय चाटत होतात? हा माझा सवाल आहे. आता तुम्ही संगमांसोबत सत्तेत आहात. पण त्याच संगमांवर तुम्ही भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. मग संगमांनी हिसका दाखवल्यानंतर आता तुम्ही संगमांचं काय चाटत आहात? असंही उध्दव ठाकरे यांनी सवाल केला.

केंद्रात शेतकरी कायदा आणल्यावर उत्तरेतील शेतकरी रस्त्यावर आले होते. अद्यापही लोकशाहीतील दम गेलेला नाही. शिवसेना प्रमुखांनी जय जवान, जय किसान, जय कामगार हा नारा दिला होता. तुमच्या कष्टावर आणि घामावर देश उभा आहे. तुम्ही म्हणाल, तर आम्ही राज्यकर्ते आहोत. राजकर्त्यांनी देशाला आणि राज्याला दिशा देण्याचं काम करायला हवं. पण, ती दिशा चुकून दुर्दशेकडे जात असेल, तर आम्हाला तुम्हाला घरी पाठवण्याचं काम करावं लागेल, असा इशारा शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला दिला आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडीची वज्रमूठ ही सभा पार पडली. मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर पार पडलेल्या या सभेला विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि महाविकास आघाडीचे अन्य नेते उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे.

अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूरमध्ये आलो होतो. शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली की, नाही माहिती नाही. आता अवकाळी आणि गारपीटीमध्ये सर्व पीके सुफडासाफ झाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न होता. या सरकारने पीकविम्यासाठी फक्त १ रुपया भरा, बाकी पैसे आम्ही देऊ असं सांगितलं. काय दानशूर सरकार आहे. मात्र, जेव्हा शेतकरी पीकविम्याने पैसे मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्या हातावर १० रुपयांचं चेक देण्यात येतो, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

अतिवृष्टी झाल्यानंतर गंगापूरमध्ये आलो होतो. शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई मिळाली की, नाही माहिती नाही. आता अवकाळी आणि गारपीटीमध्ये सर्व पीके सुफडासाफ झाली. महाविकास आघाडीचं सरकार असताना बीड पॅटर्न आणण्याचा प्रयत्न होता. या सरकारने पीकविम्यासाठी फक्त १ रुपया भरा, बाकी पैसे आम्ही देऊ असं सांगितलं. काय दानशूर सरकार आहे. मात्र, जेव्हा शेतकरी पीकविम्याने पैसे मागण्यासाठी जातात, तेव्हा त्यांच्या हातावर १० रुपयांचं चेक देण्यात येतो,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

शेतकरी एवढे हफ्ते भरतात, ती पीकविमा कंपनी कोणाची आहे? अडाणींची आहे… सर्वकाही तुम्ही मित्रासाठी करत आहात… मग शेतकऱ्यांच्या पदरात काय टाकत आहात? आम्ही फसवा-फसवीचं धंदे केले नाहीत आणि करणारही नाही. जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार आलं, तेव्हा २ लाख रुपयांचं पीक कर्ज माफ केलं होतं, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं आहे.

Check Also

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *