Breaking News

Tag Archives: lumpy disease

सप्टेंबर २०२३ पर्यत लंपी आजाराची लस महाराष्ट्रात तयार होणार पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांची विधानपरिषदेत माहिती

राज्यातील ३३ जिल्ह्यात एक लाख ७८ हजार ७२ गोवर्गीय जनावरे लंपी चर्मरोगाने बाधित झाले होते. मात्र वेळेत १०० टक्के लसीकरण केल्याने पशुधनाचा मृत्यू कमी झाला आहे. सप्टेंबर २०२३ पर्यंत लसीकरणात महाराष्ट्र स्वयंपूर्ण होणार असून राज्यात ही लस तयार होणार असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी विधानपरिषदेत दिली. प्रश्नोत्तराच्या तासात …

Read More »

लम्पी रोगावरील सरकारच्या उपाययोजना तकलादू; हजारो पशुधनांचा अजूनही मृत्यू १०० टक्के लसीकरण होऊनही लम्पी रोगाची लागण सुरुच- नाना पटोले

लम्पी रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अपयश आले आहे. लम्पी रोगाची लागण वाढत असताना राज्य सरकारने मोफत लसीकरण मोहिम राबवून १०० टक्के लसीकरण केल्याचा दावा केला आहे. राज्यात १०० टक्के लसीकरण झाले असेल तर आजही जनावरांना लम्पी रोगाची लागण का होत आहे ? व हजारो जनावरे मृत्यूमुखी का …

Read More »

लम्पी रोगामुळे २,५५२ पशुपालकांना मिळाली नुकसान भरपाई

राज्यात आजपर्यंत लम्पी चर्मरोगामुळे मृत्युमुखी पडलेल्या गोवंशीय पशुधनाच्या २,५५२ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाईपोटी रु. ६.६७ कोटी रक्कम जमा करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली. सिंह म्हणाले, लम्पी चर्मरोगाच्या विषाणूच्या जनुकीय परीक्षणांतर्गत जिनोम क्रमवारीता तपासणीसाठी (Genome sequencing) आवश्यक नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था पुणे (National Institute of Virology …

Read More »

राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांची माहिती

राज्यामध्ये ३ ऑक्टोबर २०२२ अखेर ३१ जिल्ह्यांमधील २१५१ गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील ४८,९५४ बाधित पशुधनापैकी २४,७९७ म्हणजे सुमारे ५० टक्के पशुधन रोगमुक्त झाल्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह यांनी सांगितले. सिंह यांनी सांगितले की, राज्यातील बाधित पशुधनावर उपचार सुरु आहेत. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आज अखेर १०९.३१ …

Read More »

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये

लम्पी चर्मरोग हा केवळ गोवर्गीय जनावरांमध्ये होतो. आजपर्यंत म्हैस वर्गीय प्राण्यांमध्ये हा रोग आढळून आलेला नाही. हा रोग प्राण्यांपासून मानवास संक्रमित होत नसल्याने सदर रोग  होण्याची भीती नाही. त्यामुळे चिंता करण्याचे कारण नाही असे पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. शैलेश पेठे यांनी सांगितले. मागील आठवड्यात मुंबईत तीन गोवर्गीय जनावरांना लम्पी चर्म रोगाची …

Read More »

राधाकृष्ण विखे-पाटील म्हणाले, लम्पीमुळे मृत्यू पावलेल्या पशुधनाची मिळणार नुकसान भरपाई चर्म रोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार

राज्यात लम्पी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लम्पी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची ‘ड्रग्ज बँक’ देण्यात येईल, असे प्रतिपादन पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. पशुसंवर्धन आयुक्तालय येथे दूरदृश्‍य प्रणालीद्वारे आयोजित राज्यस्तरीय आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन विभागाचे प्रधान …

Read More »

पशुधनाला लम्पीची लागण झाली? मग मंत्रालयातील ‘या’ नंबरवर संपर्क साधा मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना- प्रधान सचिव जे. पी. गुप्ता

राज्यात लम्पी चर्मरोगाचा होत असलेला प्रादुर्भाव विचारात घेऊन या रोगावर तातडीने नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. राज्यातील शेतकरी पशुपालकांना लंपी रोगाविषयी संपर्क साधण्याकरिता मंत्रालयात समन्वय कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती पशुसंवर्धन विभागाचे प्रधान सचिव जे.पी.गुप्ता यांनी दिली. समन्वय कक्ष दूरध्वनी क्रमांक ०२२-२२८४५१३२ गुप्ता म्हणाले,राज्यात …

Read More »