Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

शिवसेना खासदार-आमदार म्हणाले मुख्यमंत्रीजी “हा कायदा आपल्या राज्यात नको” केंद्राचा आदर्श भाडेकरू कायदा राज्यात नको

मुंबई: प्रतिनिधी भाडेकरू नियंत्रण कायदा हा राज्य सरकारच्या अखत्यारीत असताना केंद्र सरकारने त्यात हस्तक्षेप करण्याची गरज नव्हती. तसेच केंद्र सरकारचा हा भाडेकरू कायदा राज्यात लागू केला तर २५ लाखाहून अधिक नागरीक रस्त्यावर येतील अशी भीती शिवसेनेच्या आमदारांनी व्यक्त करत हा कायदा राज्यात लागू करू नका अशी मागणी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे …

Read More »

मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा भाजपा नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांची नालेसफाईवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका

मुंबई: प्रतिनिधी मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला. विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अॅड आशिष शेलार म्हणाले की, मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी १०७%..कधी १०४%… …

Read More »

मुंबई व परिसरातील पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा: ३ दिवस पावसाचा इशारा पाण्याचा निचरा आणि वाहतूक सुरळीत होईल असे पाहण्याचे यंत्रणांना निर्देश

मुंबई: प्रतिनिधी हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर  जिल्हाधिकारी यांच्याकडून परिस्थितीचा आढावा घेतला. हवामान विभागाने मान्सूनचे आगमन जाहीर केले असून पुढील तीन दिवस मध्यम ते तीव्र पावसाचा अंदाज व्यक्त केला. अतिवृष्टीची …

Read More »

राज्यातील बंद उद्योगांना ‘अभय’ पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना- सुभाष देसाई

मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या उद्योग विभागाने बंद उद्योगांसाठी विशेष अभय योजनेची तयारी केली आहे. सुक्ष्म, लघु, मध्यम वर्गवारीतील उत्पादक घटकांना ही योजना लागू असेल. या योजनेद्वारे बंद पडलेल्या उद्योगांचे पुनरुज्जीवन होऊन रोजगार वाढीला चालना मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी व्यक्त केला. स्तावित अभय योजनेसंबंधी उद्योगांच्या सूचना समजून घेण्यासाठी आज देसाई यांच्या …

Read More »

पंतप्रधान-मुख्यमंत्री भेटीवर देवेंद्र फडणवीस म्हणाले ‘केंद्राला भेटून फायदाच नाही’ महाराष्ट्राच्या हाती असलेल्या विषयांपेक्षा केंद्राकडे असलेल्या विषयांवर पाठपुरावा करणे केव्हाही चांगले!

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारकडून आवश्यक ती मदत महाराष्ट्राला मिळत असतेच. परंतु केंद्राच्या अखत्यारीत असलेल्या विषयांवर पाठपुरावा केला तर ते अधिक संयुक्तिक ठरले असते. ओबीसी आरक्षणाचा प्रश्न हा केवळ महाराष्ट्रापुरता आहे. देशातील अन्य राज्यात ते आरक्षण सुरक्षित आहे. त्यामुळे महाराष्ट्रालाच सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात नमूद केल्याप्रमाणे मागासवर्ग आयोग गठीत करून पुढील कारवाई …

Read More »

“नवाज शरीफला भेटायला गेलो नव्हतो” मुख्यमंत्री-पंतप्रधान खाजगी भेट मुख्य भेटी आधी ३० मिनिटांची खाजगी भेट

नवी दिल्ली: विशेष प्रतिनिधी राज्यातील विविध प्रश्नांची त़ड लावण्यासाठी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शिष्टमंडळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीला गेले होते. मात्र शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांची भेट घेण्याआधीच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात एक खाजगी बैठक पार झाली. …

Read More »

आरक्षणासाठी ५०% ची अट शिथील करून राज्याच्या हिश्शाचे थकीत हजार कोटी द्या पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण यांची पत्रकार परिषदेत माहिती

नवी दिल्ली: प्रतिनिधी राज्यातील मराठा समाजासह ओबीसी समाजाचे गेलेले आरक्षण आणि एससी-एसटी वर्गातील कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण मिळावे यासाठी केंद्र सरकारने सर्वसमावेशक धोरण तयार करण्याची मागणी करत कांजूर मार्ग मेट्रोसाठीची जमिन, मराठी भाषेला अभिजात दर्जा, जीएसटीसह वित्त आयोगाकडे असलेली २७ हजार कोटी रूपयांहून अधिकची थकीत रक्कम यासह १२ आमदारांच्या यादीला राज्यपालांनी …

Read More »

आधी तुम्ही पेट्रोल डिझेलवरील कर कमी करा, मग केंद्राकडे मागणी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे महाविकास आघाडीला आव्हान

पुणे : प्रतिनिधी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्ताधारी आघाडीने राज्यातील कर कमी करून पेट्रोल डिझेलच्या दरात कपात करावी आणि मग केंद्राकडे तशी मागणी करावी, असे आव्हान भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात पत्रकारांशी बोलताना महाविकास आघाडीला दिले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सरकारचे धोरण …

Read More »

शैक्षणिक संस्था, खाजगी शिकवणी, धार्मिकस्थळांसह याबाबत जिल्हापातळीवर निर्णय ‘ब्रेकिंग द चेनसाठी बंधनांचे विविध स्तर’ संदर्भात स्पष्टीकरण

मुंबई : प्रतिनिधी ‘ब्रेकिंग द चेन’साठी शासनाने ४ जून, २०२१ रोजी प्रसृत केलेल्या आदेशांबाबत आणखी स्पष्टीकरण करणारे एक परिपत्रक आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागातर्फे जारी करण्यात आले आहे. लोकल रेल्वेने प्रवास करण्यावर बंधने घालण्यासंदर्भात आणखी स्पष्टीकरण या परिपत्रकात देण्यात आले आहे. या बंधनांसंदर्भात प्रशासन आणि सामान्यांच्या मनातील शंकांचे प्रश्नोत्तराच्या स्वरूपात नऊ मुद्दयांचे स्पष्टीकरण …

Read More »

कुठेही गर्दी, आरोग्याचे नियम तोडलेले चालणार नाही अन्यथा मोठे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट सूचना

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या (लेव्हल्स) ठरविल्या आहेत. त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत. तसेच कोणत्याही लेव्हलमध्ये कोणत्याही परिस्थितीत सार्वजनिक कार्यक्रम, समारोह यासाठी गर्दी होणार नाही याची काटेकोर काळजी …

Read More »