Breaking News

Tag Archives: cm uddhav thackeray

महाविकास आघाडीने पाठविलेल्या “त्या” १२ नावांची यादी राज्यपालांकडेच अनिल गलगली यांच्या आव्हान अपिलावर सुनावणीत पुढे आली माहिती

मुंबई: प्रतिनिधी विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ रिक्त जागांसाठी महाविकास आघाडीने पाठविलेल्या १२ जणांच्या नावाची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडेच असल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारातंर्गत झालेल्या सुणावनी दरम्यान पुढे आली. गतसरकारने नियुक्त केलेल्या राज्यपाल नियुक्त १२ जागांवरील विधान परिषद सदस्यांची मुदत पूर्ण झाली. त्यामुळे या रिक्त झालेल्या जागा भरण्यासाठी महाविकास …

Read More »

Learning Driving Licence हवाय, मग आरटीओत जाण्याची गरज नाही ई-गर्व्हनन्स कार्यप्रणालीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

मुंबई : प्रतिनिधी शिकाऊ वाहनचालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून भविष्यातही शासकीय विभागांना ज्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून देणे शक्य आहे  त्या उपलब्ध करून देण्यासाठी ई गव्हर्नन्सवर आधारित नवीन कार्यपद्धतीचा अवलंब …

Read More »

शिवकिल्यांच्या संवर्धनात खारीचा वाटा उचलायचाय? मग पाठवा सूचना राज्यातील दुर्गप्रेमी, गिर्यारोहकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील गडकिल्ल्यांचे पावित्र्य टिकवून त्यांचे टप्प्याटप्प्याने संवर्धन करण्यासंदर्भात आता पाऊले टाकण्यात येत असून राज्यातील दुर्गप्रेमी, दुर्ग संवर्धक, गिर्यारोहक यांनी यासंदर्भातील आपल्या सूचना व प्रस्ताव मुख्यमंत्री सचिवालयातील संकल्प कक्षास त्वरित पाठवाव्यात असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. किल्ल्यांच्या संवर्धनातील अडचणी दूर करण्यासाठी पुढे यावे व कामाला सुरुवात करावी असेही त्यांनी …

Read More »

मुख्यमंत्र्यांचे गौरवद्गार म्हणाले, सरपंचांच्या कामातूनच चांगली माहिती मिळाली गाव कोरोनामुक्त ठेवणारच सरपंचानी दिला मुख्यमंत्र्यांना विश्वास

मुंबई : प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांनी सर्व सरपंचांचा माझे सहकारी असा उल्लेख करून पुढे म्हणाले की, आपण सर्वांनी गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी अतिशय चांगले काम केले आहे, त्यासाठी खुप नावीन्यपूर्ण उपक्रम राबविले आहेत, मी तुम्हाला सुचना देण्यापेक्षा तुम्ही केलेल्या कामातूनच मला खुप चांगली माहिती मिळाली आहे. ज्याचा राज्यभरासाठी उपयोग करता येईल. आपण सर्वजण जनहितासाठी समाजमाध्यमांचाही खुप …

Read More »

राज्यात १६ दिवसात राज्यात ८ हजार जणांचा मृत्यू : रिक्नलेशनमधील माहिती कोरोना रुग्ण आणि मृत्यू संख्येबाबत कोणतीही आकडेवारी लपविण्यात येत नाही-आरोग्य विभागाची माहिती

मुंबई : प्रतिनिधी कोरोनाची रुग्णसंख्या, बरे होणारे रुग्ण, मृत्यू यांच्या माहितीची व्याप्ती प्रचंड मोठी आहे. त्यासाठी महाराष्ट्राची साथरोग सर्वेक्षण यंत्रणा पारदर्शकपणे काम करत असून कोणतीही आकडेवारी लपविण्याचा प्रश्नच येत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील यापूर्वीच अतिशय पारदर्शकपणे कोरोना रुग्णसंख्येची माहिती अद्ययावत करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार रिक्नस्लेशन अर्थात ताळमेळ प्रक्रियेत आणखी …

Read More »

चंद्रकांत पाटलांची शिवसेनेला पिंजऱ्यातील वाघाची उपमा वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया

पुणे: प्रतिनिधी आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होते. पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याबाहेर बाहेर होता तोपर्यंत दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यामध्ये आहे, अशी उपरोधिक उपमा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेविषयी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नामोल्लेख टाळत उत्तर दिले. मुंबईत बुधवारी पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचून लोकांचे प्रचंड हाल झाले. त्याविषयी …

Read More »

राज्यातील प्राचीन झाडे आणि वृक्षांच्या संरक्षणासाठी सरकारचे नवे धोरण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  राज्याच्या नागरी भागात ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या वृक्षांना हेरिटेज ट्री असे संबोधून त्यांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.  बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. यासाठी महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियमामध्ये सुधारणा करण्यात येईल.  “हेरिटेज ट्री” ही संकल्पना आणि त्यांच्या संरक्षणासाठीचा …

Read More »

नियमित परतफेड कऱणाऱ्या शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यतचे कर्ज शून्य टक्के व्याजाने राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: प्रतिनिधी  पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना आता तीन लाखांपर्यंतच्या कर्जासाठी शून्य टक्के दराने व्याज आकारणी केली जाईल. एक लाख ते तीन लाखांच्या कर्जमर्यादेत विहीत मुदतीत कर्जाची परतफेड केल्यास सध्याच्या एक टक्के व्याजदरात आणखी दोन टक्के व्याज दर सवलत देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मंत्रिमंडळ …

Read More »

राज्यात १६ जूनपर्यंत दृष्टी दिन सप्ताह : दोन्ही डोस घेतलेले ५० लाख नागरीक म्युकरमायकोसीसबाबत जनजागृती करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी राज्यात दर वर्षी १० जून रोजी दृष्टी दिन साजरा करण्यात येतो. यंदाही यानिमित्त आजपासून ते १६ जून पर्यंत दृष्टी दिन सप्ताह साजरा केला जाणार असून याकाळात कोरोनापश्चात होणाऱ्या म्युकरमायकोसीस आजाराबाबत जनजागृती करण्याचे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी केले असून गेल्या वर्षभरात कोरोनाकाळात देखील सुमारे २ लाख २८ हजार  मोतिबिंदु शस्त्रक्रिया करण्यात आल्याची …

Read More »

शरद पवारांच्या सूचनेनुसार शेतकऱ्यांच्या हिताचे कृषी विधेयक आणणार मंत्र्यांच्या शिष्टमंडळाने घेतली माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांची भेट

मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारने आणलेले तीन काळे कृषी कायदे हे शेतकरी विरोधी, व्यापारी वृत्तीचे समर्थन करणारे आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक महाराष्ट्र सरकार आणणार आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक आणले जाईल, अशी माहिती महसूलमंत्री तथा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पत्रकार परिषदेत दिली.  …

Read More »