Breaking News

Tag Archives: chief minister

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, नुकसानीचे पंचनामे तात्काळ करून त्याचे प्रस्ताव सादर करा पूराचा धोका लक्षात घेता नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी उपाययोजना करा

पावसामुळे वारंवार येणा-या पुराचा धोका लक्षात घेता पूर नियंत्रणाचा भाग म्हणून नदीपात्रातील वाळू व गाळ काढण्यासाठी शास्त्रशुध्द कार्यक्रम जलसंपदा विभागाने आखण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मंत्रालयातील समिती कक्षात राज्यातील गडचिरोली, वर्धा, यवतमाळ व चंद्रपूर येथील पूरग्रस्त भागात झालेल्या नुकसानीबाबत आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी मुख्य सचिव …

Read More »

मुख्यमंत्री शिंदेचे आदेश; ‘या’ दोन गोष्टींसाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करा खड्डे बुजविण्याचे काम अहोरात्र सुरु राहणार

मुंबई महानगर क्षेत्रातील रस्ते खड्डे व वाहतूक कोंडी मुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात यावेत. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी एमएमआरडीए आणि एमएसआरडीसी यांनी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. ही यंत्रणा खड्डे बुजवण्याचे काम अहोरात्र  करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ठाणे जिल्हा आणि परिसरातील वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवरील खड्ड्यांसंदर्भात आज …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश : ठाण्यातील ‘या’ महानगरपालिकांना अतिरिक्त पाणी द्या दिवा, कल्याण-डोंबिवली, मीरा-भाईंदर, ठाणे जिल्हा व शहर

ठाणे शहराला पाण्याचा वाढीव पुरवठा व्हावा यासाठी भातसा आणि बारवी धरणातून प्रत्येकी ५० दशलक्ष लिटर आणि मुंबई महापालिकेच्या कोटय़ातील २० दशलक्ष लिटर प्रक्रिया केलेले पाणी कोपरी आणि वागळे इस्टेट परिसर तसेच दिवा परिसरासाठी साडेसहा दशलक्ष लिटर अतिरीक्त पाणी देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात ठाणे जिल्ह्यातील पाणीप्रश्नांची आढावा …

Read More »

एमएमआरडीएला ६० हजार कोटींचे कर्ज, राज्य सरकारने दिली हमी ठाणे कोस्टल रोड, भुयारी मार्ग, शिवडी वरळी कनेक्टर प्रकल्पासाठी कर्ज

एमएमआरडीएला मुंबई महानगर क्षेत्रात विविध प्रकल्प राबविण्यासाठी ६० हजार कोटींपर्यंतचे कर्ज उभारण्यास तसेच शासन हमीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या कर्जापैकी पहिल्या टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या १२ हजार कोटी रकमेची शासन हमी देण्यास आणि शासन हमीवरील मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय घेण्यात …

Read More »

औरंगाबाद-उस्मानाबादच्या नामांतरावर शिंदे-फडणवीस सरकारकडून शिक्कामोर्तब औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबई विमानतळाचे नामांतर

अल्पमतात आलेल्या उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने आपल्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगबादचे नामांतर संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि नवी मुंबईतील विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. मात्र राज्यात नव्याने स्थानापन्न झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकारच्या त्या निर्णयाला स्थगिती दिली. मात्र या स्थगितीवरून सर्वचस्थरातून टीका व्हायला लागल्यानंतर …

Read More »

नव्या सत्ताधाऱ्यांचे नऊ दिवस संपेना, आधी माईक, नंतर चिठ्ठी आणि आता कानात कुसफुस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री शिंदेच्या कानात बोलत करून दिली आठवण एमएमआरडीएची

राज्यातील महाविकास आघाडी सरकारला घरचा रस्ता दाखवून देत नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारला आता जवळपास १५ दिवसांचा कालावधी झाला. मात्र या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेच राज्य मंत्रिमंडळाचा कारभार हाकत आहेत. मात्र या सरकारच्या नव्याचे नऊ दिवस काही केल्या संपत नसल्याचे दिसून येत असून मुख्यमंत्री एकनाथ …

Read More »

छगन भुजबळ यांचा टोला; सरपंच-नगराध्यक्ष थेट लोकांमधून पण मुख्यमंत्री तर फुटीर गटातून ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे

देशात ओबीसींची लोकसंख्या ही ५४ टक्के असून ओबीसींच्या हक्काचे २७ टक्के आरक्षण ओबीसींना मिळालेच पाहिजे. त्यामुळे ओबीसींचे राजकीय आरक्षण कमी होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्यावर आहे. कोरोनामुळे अद्यापही देशात जनगणना होऊ शकली नाही. आता देशात जनगणना सुरु करून त्यात ओबीसींची जातनिहाय जनगणना करून घ्यावी अशी …

Read More »

मुख्यमंत्र्यांनंतर उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ते संकेताला धरून नव्हते पण… नामांतरप्रश्नी केली भूमिका स्पष्ट

महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी नामांतर करण्याचा घेतलेला निर्णय नव्याने स्थापन झालेल्या शिंद-फडणवीस सरकारने स्थगित केला. त्यावरून शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर चांगलीच टीका केली. या टीकेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आम्हाला नामांतर करायचे असून तो बेकायदा निर्णय कायदेशीर ठरविण्यासाठी उद्या सकाळी मंत्रिमंडळाची बैठक घेवून निर्णय घेणार …

Read More »

संजय राऊतांच्या टीकेनंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, केवळ ‘त्या’ गोष्टीसाठी उद्या शिक्कामोर्तब नामांतराचा निर्णय बेकायदेशीर होता मात्र आता तो कायदेशीर होणार

शिवसेनेत झालेल्या बंडाळीमुळे शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार अल्पमतात आले. मात्र राज्य सरकारच्या शेवटच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उध्दव ठाकरे यांनी औरंगाबाद, उस्मानाबाद आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर नव्याने स्थापन झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या …

Read More »

“त्या” निर्णयावर संजय राऊत यांचा सवाल, औरंगजेब अचानक नातेवाईक कसा झाला? तर हे हिंदूत्व आणि महाराष्ट्र द्रोही सरकार

राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारने पहिल्यांदाच राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेत महाविकास आघाडी सरकारने औरंगाबाद, उस्मानाबाद शहरांचे नामांतर आणि नवी मुंबईतील दि.बा. पाटील यांचे नाव देण्याच्या निर्णयासह पाच निर्णयांना स्थगिती दिल्यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकेची झोड उठविली आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …

Read More »