Breaking News

Tag Archives: chandrashekhar bawankule

टोलप्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र आषाढी वारीनिमित्त टोल वसुली पुढे ढकला

महाराष्ट्राचे आराध्य दैवत पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुखमाईच्या दर्शनासाठी जाणाऱ्या वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केंद्रीय भूतल परिवहन मत्रीनितीन गडकरी यांना केली आहे. यावर्षी आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे.सुमारे सात लाख भाविक व त्यांची …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, महापुरुषांचा अपमान होत असताना भाजपाची तोंडे बंद का होती? भाजपाच्या राहुल गांधी यांच्यावरील टीकेला काँग्रेसचे प्रत्युत्तर

भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील, यांच्याबदद्ल भाजपाच्या मंत्र्यांनी केलेली विधाने जनता विसरलेली नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का? महापुरुषांचा अपमान करत असताना भाजपाची तोंडे …

Read More »

अजित पवार म्हणाले, अंगाशी आले की लोक जाणीवपूर्वक गप्प बसतात… डॉ प्रदीप कुरूलकर यांच्या अटकेवरून भाजपावर साधला निशाणा

‘हनी ट्रॅप’ प्रकरणी आणि देशातील संवेदनशील माहिती पाकिस्तानी यंत्रणेला दिल्याप्रकरणी डीआरडीओचे ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांना अटक करण्यात आली. डॉ कुरुलकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे; तसेच जलदगती न्यायालयात हा खटला चालवावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी कुरूलकर यांचे संबंध असल्याची …

Read More »

भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा, या नेत्यांना मिळाले स्थान नवीन कार्यकारिणीमध्ये १६ उपाध्यक्ष, ६ सरचिटणीस, १६ चिटणीसांचा समावेश

भारतीय जनता पार्टीच्या नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. नवीन प्रदेश कार्यकारिणीत १६ उपाध्यक्ष , ६ सरचिटणीस , १६ चिटणीस , ६४ कार्यकारिणी सदस्य, २६४ विशेष निमंत्रित सदस्य आणि ५१२ निमंत्रित सदस्यांचा समावेश आहे. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी, …

Read More »

बावनकुळेंच्या टीकेवर अजित पवार यांचा खोचक टोला, मी नागपूरला जाऊन टिप्स घेणार… त्यांच्याकडून माहिती घेऊन तसे काम करेन

राज्याचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी लोकसंख्येच्या मुद्द्यावरून जोरदार टोलेबाजी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं उदाहरण देत लोकसंख्येबाबत लोकांच्या वर्तनावर एक खंतही व्यक्त केली. त्याचबरोबर पुढील मुख्यमंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा होणार या जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर …

Read More »

त्या सगळ्या चर्चांवर भाजपा म्हणते, …त्यानंतर या बातम्यांना पेव फुटले अजित पवार यांच्या प्रतिमेला धक्का लागेल असे वक्तव्य करणार नाही

मागील चार-पाच दिवसाहून अधिक काळ अजित पवार हे पुन्हा एकदा भाजपाबरोबर जाणार असल्याच्या चर्चेने चांगलाच जोर पकडला. त्यावर शिंदे गटातील आमदार नेत्यांबरोबरच मंत्र्यांनीही अजित पवार यांच्या भाजपासोबत जाण्याच्या चर्चेवर संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी याप्रकरणी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधील सदरामधून काही संदर्भ देत अजित …

Read More »

सटाण्याच्या माजी नगराध्यक्षांसह नाशिक जिल्ह्यातील अनेक कार्यकर्ते भाजपामध्ये भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्वागत

मोदी सरकारच्या कल्याणकारी योजनांमुळे तसेच शिंदे-फडणवीस सरकारच्या लोकोपयोगी निर्णयांमुळे विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा भाजपाकडे ओढा वाढला आहे, असे प्रतिपादन भारतीय़ जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत बावनकुळे बोलते होते. खा.सुभाष भामरे, प्रदेश महामंत्री विक्रांत पाटील , मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आदी यावेळी उपस्थित …

Read More »

नाना पटोले यांचे प्रत्युत्तर, …दुसऱ्यांचे पक्ष फोडून पक्ष वाढवण्याचा ‘उद्योग’ राहुल गांधींना महाराष्ट्रात येण्यासाठी भाजपा किंवा बावनकुळेंच्या परवानगीची गरज नाही.

भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या कारभाराला कंटाळलेल्या जनतेने विधान परिषद, विधानसभा पोटनिवडणुक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांना जागा दाखवून दिली आहे. आपल्या पक्षाचे अस्तित्व …

Read More »

भाजपाचा काँग्रेस नेते राहुल गांधींना इशारा, …आधी माफी, मग पाय ठेवा सावरकर प्रश्नी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला इशारा

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यावरून अद्यापही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अलीकडे शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधींना वीर सावरकरांचा अपमान सहन करणार नाही, असा इशारा दिला होता. अशातच आता राहुल गांधी उद्धव ठाकरेंची ‘मातोश्री’वर येऊन भेट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. …

Read More »

भाजपा पार्टी स्थापना दिनी चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन, कार्यकर्त्यांनो हा संकल्प करा… लोकसभेच्या ४८ तर विधानसभेच्या २०० हून अधिक जागा जिंकण्याचा तयारी करा

पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युतीसह सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकण्याचा आणि विधानसभा निवडणुकीत २०० पेक्षा अधिक जागा मिळवण्याचा संकल्प करा, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी केले. भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिनानिमित्त भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बावनकुळे बोलत होते. भाजपाचे ज्येष्ठ …

Read More »