Breaking News

Tag Archives: chandrakant patil

राज्यातील साडेचार लाख विद्यार्थ्यांची ईबीसी सवलतीची निम्मी फी भरली ६५० कोटीची रक्कम जमा केल्याची महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

कोल्हापूर : प्रतिनिधी राज्य शासनाने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी ईबीसी सवलत योजनेची उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये केल्याने गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे शक्य झाले आहे. या योजनेनुसार गेल्या वर्षी राज्य शासनाने राज्यातील ४ लाख ५६ हजार विद्यार्थ्यांची निम्मी म्हणजे ५६० कोटीची फी भरल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे …

Read More »

मातंग समाजासाठी १ लाख घरे अण्णाभाऊवर चित्रपट आणि स्मारकाचे काम लवकर पूर्ण करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या विचार व साहित्यातून वंचितांचा आवाज मांडला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त वंचितांसाठीच्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवून त्यांचा सर्वतोपरी विकास करण्यासाठी शासन प्रयत्नशील असून मातंग समाजासाठी एक लाख घरे देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ …

Read More »

आधी नेत्यांना नाही तर त्यांच्या मुलांना पक्षात घेतलं नेते आपोआप आले मुख्यमंत्री फडणवीस यांचा पवारांच्या वक्तव्यावर खुलासा

मुंबईः प्रतिनिधी आम्ही युतीमध्ये निवडणूक लढवू, पुन्हा युतीचंच सरकार येणार, आता फक्त बहुमताचा विक्रम मोडीत काढायचा आहे. धाक किंवा प्रलोभनं दाखवून भाजपमध्ये प्रवेश दिलेले नाहीत असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावत आम्ही आधी राधाकृष्ण विखेंना भाजपमध्ये घेतलं नाही, आधी सुजय विखेंना घेतलं, तसंच आधी वैभव पिचडांना घेतल्याने …

Read More »

अखेर राजे, पिचड, नाईक आणि कोळंबकर भाजपात मुख्यमंत्री फडणवीस, अध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत प्रवेश

मुंबई : प्रतिनिधी आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेवून स्वतःचे राजकिय भवितव्य टिकविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवेंद्रराजे भोसले, वैभव पिचड, संदीप नाईक आणि काँग्रेसचे कालिदास कोळंबकर या माजी आमदारांसह राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह नवी मुंबईतील काही नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि …

Read More »

राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांच्या भेटीने इच्छुकांच्या आशा पल्लवित मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेला पुन्हा उधाण

मुंबईः प्रतिनिधी लोकसभा निवडणूकीतील विजयाने भाजपमध्ये एकच उत्साह वाढला. त्यातच काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक आमदार भाजपच्या वाटेवर असल्याने या सर्वांना खुष करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर कोणतीच हालचाल झाली नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दुपारी राज्यपाल सी.विद्यासागर यांची भेट घेतल्याने इच्छुकांच्या आशा पल्लवित …

Read More »

कमी पाऊस होऊनही शेतीतील गुंतवणुकीमुळे उत्पादकता वाढली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दावा

मुंबई : प्रतिनिधी राज्यात गेल्या वर्षी पाऊस कमी होऊन देखील उत्पादकता ११५ लाख मेट्रिक टन झाली. शेतीतील गेल्या साडेचार वर्षातील गुंतवणूक आणि जलसंधारणाच्या कामांचे हे यश आहे. या वर्षीच्या खरीप हंगामासाठी आवश्यकतेपेक्षा अधिक बि-बियाणे आणि खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. शेतकऱ्यांना वेळेवर आणि पुरेसा पीक कर्ज पुरवठा करण्याच्या सूचना बँकांना …

Read More »

बापटांच्या सांसदीय खात्याचा कार्यभार तावडेंकडे पुण्याचे पालक मंत्री पद चंद्रकांत पाटलांकडे

मुंबईः प्रतिनिधी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरिष बापट हे लोकसभा निवडणूकीत खासदार झाल्याने त्यांच्याकडील सांसदीय कार्यमंत्री पदाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपविण्यात आला. तसेच अन्न व नागरी पुरवठा विभागाचा कार्यभार पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मांटुंगा येथील षण्मुखानंद हॉल येथे झालेल्या …

Read More »

१६% आणि १०% आरक्षण हे वेगवेगळे विषय मेजर जनरल सिन्हो यांचा अहवाल महत्वाचा ठरेल

औरंगाबाद: जगदीश कस्तुरे केंद्र सरकारने आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गांना दिलेले दहा टक्के आरक्षण यंदा लागू करता येणार नाही, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमातील खुल्या प्रवर्गाची प्रवेश प्रक्रिया नव्याने राबविण्यात येणार आहे. राज्यात यंदा याआधी जी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली होती ती आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गात दहा …

Read More »

आपत्ती घडू नये यासाठी सर्व यंत्रणांनी सतर्क रहावे मुख्यमंत्र्यांनी घेतला मान्सूनपूर्व तयारीचा आढावा

मुंबई : प्रतिनिधी पावसाळ्यात पूर, इमारत पडणे, पाणी साचणे अशा घटना घडू नयेत, यासाठी संबंधित यंत्रणांनी योग्य ते नियोजन करावे. तसेच आपत्कालीन नियंत्रण कक्षात मनुष्यबळाने सतर्क राहून सर्व संपर्क क्रमांक सुरू असतील, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथिगृहात झालेल्या राज्यस्तरीय मान्सूनपूर्व तयारीच्या …

Read More »

राज्याच्या ४ लाख २४ हजार २९ कोटी रुपयांच्या पतपुरवठा आराखड्यास मंजुरी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत झालेल्या निर्णयांची बॅंकांनी अंमलबजावणी करणे अपेक्ष‍ित आहे. ही बैठक केवळ औपचारिकता नाही याची जाणीव ठेवावी. शेती घटक कमकुवत झाल्यास त्याचा जीडीपीवर परिणाम होतो. म्हणून शेती आणि शेतकऱ्यांबद्दल संवेदनशीलता दाखवत बॅंकांनी पत पुरवठा करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यस्तरीय बॅंकर्स समितीच्या बैठकीत …

Read More »