Breaking News

Tag Archives: central government

दिवाळी आधी स्वस्तात सोने खरेदीची संधी सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम लवकरच सुरू

मुंबई: प्रतिनिधी तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. आपल्याला आता स्वस्त दरात सोने खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. सॉवरेन गोल्ड बॉन्ड स्कीम २०२१-२२ ची सातवी सिरीज २५ ऑक्टोबर २०२१ पासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला स्वस्तात सोने खरेदी करता येणार आहे. ही योजना …

Read More »

१८ हजार कोटींना विकत घेतलेल्या एअर इंडियाचे इतक्या रकमेचे कर्ज फेडणार टाटा केंद्र सरकार घेणार २० हजार कोटींचे कर्ज

मुंबई : प्रतिनिधी सरकारी विमान कंपनी एअर इंडियाची आता पुन्हा घरवापसी झाली आहे. टाटा समूहाने १८,००० कोटी रुपयांना एअर इंडिया खरेदी केली. वित्त मंत्रालयाच्या गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभागाने (डीआयपीएएम) ही घोषणा केली. एअर इंडिया आणि एअर इंडिया एक्सप्रेसचे नेतृत्व टाटा करणार आहे. तसेच एअर इंडियाच्या डोक्यावर असलेल्या कर्जाचे जवळपास ५० टक्के कर्ज टाटाला फेडावे लागणार आहे. टाटा सन्सचे मानद अध्यक्ष रतन टाटा यांनी आपल्या ट्विटमध्ये टाटा समूहाने एअर इंडियाची बोली जिंकणे ही मोठी बातमी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, एअर इंडियाच्या पुनर्बांधणीसाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. पण त्यामुळे टाटा समूहाला विमान उद्योगात मोठ्या प्रमाणात व्यवसायाच्या संधी उपलब्ध होतील. काही उद्योग खासगी क्षेत्रासाठी उघडण्याच्या धोरणाबद्दल रतन टाटा यांनी सरकारचे कौतुक केले. स्पाइसजेटचे अध्यक्ष आणि कन्सोर्टियमचे नेते, एअर इंडियासाठी दुसऱ्या क्रमांकाची  सर्वाधिक बोली लावणारे अजय सिंह यांनी या करारासाठी टाटा समूह आणि सरकार दोघांचे अभिनंदन केले. एअर इंडियाच्या बोलीसाठी शॉर्टलिस्ट होणे ही त्यांच्यासाठी …

Read More »

परराष्ट्र मंत्रालयात इंटर्नशिप करण्याची संधी आंतरवासिता अर्थात इंटर्नशिप धोरण जाहीर

मुंबई : प्रतिनिधी परराष्ट्र मंत्रालयाने भारतातील सर्व राज्याकरिता आंतरवासिता धोरण जाहीर केले आहे. अलिकडेच ऑगस्ट २०१६ मध्ये मंत्रालयाच्या आंतरवासिता धोरणासंबंधी प्रकाशित नियमांचा व्यापक आढावा घेण्यात आला असून त्याचा मुख्य उद्देश म्हणजे एम ए ई वरती जास्त लक्ष केंद्रित करणे, आंतरवासितांना जास्त वाव मिळवून देणे, तसेच मंत्रालयाने आंतरवासितेसाठी (internship) निवडलेले उमेदवारांत …

Read More »

भुजबळ म्हणाले, शिवरायांच्या काळातला रायगड किल्ला उभारा पर्यटन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमांत मुख्यमंत्र्यांकडे केली मागणी

मुंबई: प्रतिनिधी रायगड किल्ला केंद्राकडून राज्याच्या ताब्यात घेऊन शिवरायांच्या काळात हा किल्ला जसा होता तसा तो पुन्हा बनविण्याची मागणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली. जागतिक पर्यटन दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या वर्षा शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमास महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, प्रधान सचिव वल्सा नायर–सिंह, पर्यटन …

Read More »

महाराष्ट्राच्या मुकुटात आणखी एक मानाचा तुरा राज्याला मिळाला ई पंचायतराज पुरस्कार

मुंबई : प्रतिनिधी आपले सरकार सेवा केंद्र प्रकल्पाच्या माध्यमातून ई-पंचायत क्षेत्रात महाराष्ट्र राज्याने दरवर्षी भरीव कामगिरी केली असून यावर्षी देखील ही उज्वल परंपरा पुढे चालू ठेवली आहे. याची पोचपावती म्हणून केंद्र शासनाने ई-पंचायत पुरस्कार – २०२०  चा तृतीय पुरस्कार देऊन महाराष्ट्र राज्याचा गौरव केला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ …

Read More »

मुंबईत जागतिक भागिदारी परिषद १२-१३ जानेवारीला

उपराष्ट्रपती यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत होणार उद्घाटन मुंबई : प्रतिनिधी येत्या १२ आणि १३ जानेवारी २०१९ रोजी मुंबईतील जे डब्ल्यू मेरियेट हॉटेलमध्ये जगातील सुमारे ४० देशातील उद्योजक एकत्र येणार आहेत. केंद्र शासन, राज्य शासन आणि कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री (सीआयआय) यांच्या संयुक्त विद्यमाने २५ वी जागतिक भागिदारी परिषद आयोजित …

Read More »

केंद्राकडे राज्य सरकार मागणार १६०० कोटी रूपयांची भरपाई अपेक्षेपेक्षा कमी कर तिजोरीत जमा

मुंबई : प्रतिनिधी एक देश एक करप्रणाली धोरणानुसार संपूर्ण देशभरात जीएसटी करप्रणाली लागू करण्यात आली. महाराष्ट्रातही या करप्रणालीची अंमलबजावणी करण्यात येत आहे. मात्र सप्टेंबर, नोव्हेंबर, डिसेंबर अपेक्षेपेक्षा जीएसटी कराची कमी वसूली झाल्याने राज्याला एक हजार ६४७ कोटी रूपयांची तूट आल्याने या तूटीची भरपाई केंद्र सरकारकडे मागण्यात येणार असल्याची माहिती राज्याच्या …

Read More »