Breaking News

Tag Archives: bhagatsingh koshyari

सरन्यायाधीश लळीत म्हणाले, राज्याच्या वतीने झालेला सन्मान हा विठ्ठलाच्या पूजेसारखा

आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्याच्या वतीने विठ्ठलाची पूजा होते, तोच सन्मान आज मानपत्राच्या रूपाने मला मिळाल्याची भावना सरन्यायाधीश उदय लळीत यांनी व्यक्त केली. निवृत्तीनंतरही न्याय प्रक्रियेत आवश्यकता असेल तेथे नक्की सहभाग घेऊ असे त्यांनी सांगितले. उदय उमेश लळीत यांची भारताचे ४९ वे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते …

Read More »

राज्यातील आंधळे, मुके, बहिरे शिंदे-फडणवीस सरकार बरखास्त करा

राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार मागील तीन महिन्यात शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार, तरुण, विद्यार्थी महिला, सर्वसामान्य नागरिकांसह कोणत्याही घटकाला दिलासा देऊ शकले नाही. या सरकारच्या गलथानपणामुळे राज्य अधोगतीला गेले असून जनतेमध्ये प्रचंड संताप आणि निराशा आहे. राज्यातील जनतेला दिलासा देण्यासाठी आंधळे, मुके, बहिरे ईडी सरकार बरखास्त करावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने केली असल्याचे …

Read More »

राज्य मंत्रिमंडळाने निर्णय फिरवताच राज्यपालांकडून निवड समिती स्थापन

महाविकास आघाडी सरकारच्या काळात विद्यापीठ कुलगुरू निवडीचे अधिकार राज्यपालांऐवजी उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांना बहाल करण्यात आले. तसेच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री जी नावे सुचवतील त्यातील एका नावास पसंती देण्याचा पर्यायही राज्यपालांना देण्यात आला होता. मात्र राज्यात सत्तांतर होत शिंदे-फडणवीस सरकार सत्तेवर स्थानापन्न झाले. नुकत्यात झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंत्र्यांना कुलगुरू …

Read More »

राज्यपालांचे कुलगुरू निवडीचे अधिकार अबाधित, शिंदे-फडणवीस सरकारने घेतला हा निर्णय विद्यापीठ अधिनियमातील सुधारणा विधेयक मागे घेण्याचा निर्णय

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ सुधारणा विधेयक क्र. ३५ (तिसरी सुधारणा) २०२१ मागे घेण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयामुळे आता राज्यपालांना असलेले विद्यापीठ कुलगुरू नियुक्तीचे अधिकार पुन्हा पूर्वी सारखे राहणार होते. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २००६ मध्ये सुधारणा करण्यासाठी १९ …

Read More »

मोदींचे सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचा मुंबई दौरा, नेमके कारण काय? राज्यपाल कोश्यारी, मुख्यमंत्री शिंदे यांच्या भेटीनंतर पोलिस अधिकाऱ्यांसोबत बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुरक्षा विषयक सल्लागार अजित डोवल हे आज पहिल्यांदाच मुंबई दौऱ्यावर आले. तसेच मुंबईत आल्या आल्या त्यांनी राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची सर्वात आधी भेट घेतली. त्यानंतर वर्षा या निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. विशेष म्हणजे राज्यात सत्तांतर झाल्यानंतर आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या …

Read More »

राज्यपालांनी या १८ नवनियुक्त मंत्र्यांना दिली पद व गोपनीयतेची शपथ भाजपाच्या जून्या तर काही नव्यांची मंत्रीपदावर वर्णी

सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आज राजभवनातील दरबार हॉलमध्ये पार पडला. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी १८ जणांना पद व गोपनियतेची शपथ दिली. मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या मंत्र्यांनी सर्वात आधी शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गटाच्या मंत्र्यांनी शपथ घेतली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपातील …

Read More »

राज्यपालांच्या आदेशानुसार रखडलेले पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सहा दिवस कामकाज होणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्यावरील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेले नियोजित १७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. त्यातच शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची एकमेकांच्या विरोधात सुरु असलेली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुरु आहे. त्यावर अंतिम निकाल …

Read More »

अमोल मिटकरी यांची टीका, राज्यपाल भाजपाचे एजंट अन् संघाचे… त्यांना त्यांच्या राज्यात लवकरात लवकर पाठवा

राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे सातत्याने आपल्या वादग्रस्त विधानामुळे सतत चर्चेत रहात असतात. नुकतेच त्यांनी मुंबई, ठाणेतून राजस्थानी आणि गुजराती लोक बाजूला काढले तर पैसाच शिल्लक राहणार नाही. तसेच मुंबईला आर्थिक राजधानी म्हणून कोणी म्हणणार नसल्याचे वक्तव्य केले. राज्यपालांच्या या वक्तव्यावरून सर्वच राजकिय पक्षांनी टीकेचे आसूड ओढले. भाजपाने राज्यपाल कोश्यारी …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेकडे मागितली माफी राज्यपाल कोश्यारी यांनी क्षमा करण्याची राज्यातील जनतेला विनंती

दोनच दिवसांपूर्वी अंधेरी येथील रस्त्याचे नामकरण सोहळ्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुंबई आणि ठाणे येथून गुजराती-राजस्थानी बाहेर काढले तर इथे पैसाच राहणार नाही. तसेच मुंबईला देशाची आर्थिक राजधानी म्हणणार नाही असे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर भाजपा आणि बंडखोर एकनाथ शिंदे गट वगळता सर्वच राजकिय पक्षांनी तीव्र शब्दात राज्यपालांच्या या वक्तव्याचा …

Read More »

अखेर राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून दिलगिरी व्यक्त न करता दिले ‘हे’ स्पष्टीकरण महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केलेल्या वक्तव्यावरून राज्याच्या राजकारणात पडसाद उमटल्यानंतर अखेर राजभवनाकडून भगतसिंग कोश्यारी यांचे एक निवेदन जारी करण्यात आले. या निवेदनात त्यांनी कालच्या वक्तव्याबाबतचे फक्त स्पष्टीकरण दिले. तसेच त्या वक्तव्याबाबत कोणतीही दिलगिरी व्यक्त केली नाही. अंधेरी मुंबई येथे२९ जुलै २०२२ रोजी चौकाच्या नामकरणाच्या वेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी …

Read More »