Breaking News

Tag Archives: aurangabad

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे मोठे निर्णयः औरंगाबाद, उस्मानाबादचे नामांतर आणि… तर विमानतळाला पाटील यांचे नाव, सरकारी वसाहतीत शासकिय कर्मचाऱ्यांना भूखंड

२०१४ साली राज्यात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपा-शिवसेनेच्या सरकारपासून रखडलेल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराचा प्रश्न आज अखेर शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने सोडवित अखेर करून दाखविले. आज बुधवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर तर उस्मानाबादचे नामांतर धाराशीव असे करण्यात आले. त्याचबरोबर बहुचर्चित नवी …

Read More »

राज्यातील वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरेंनी केली केंद्राकडे ‘ही’ मागणी अतिरक्त दोन इको बटालियनची केंद्राकडे मागणी

राष्ट्रीय वन नीतीनुसार एकुण भौगोलिक क्षेत्राच्या ३३ टक्के क्षेत्र वृक्षाच्छादित असणे आवश्यक असून महाराष्ट्रात आजघडीला हे प्रमाण २० टक्के आहे. ज्या जिल्ह्यात आणि विभागात वृक्षाच्छादन कमी आहे तिथे इको बटालियनच्या सहकार्यातून वृक्षलागवड करून हरित क्षेत्र वाढवण्याचे प्रयत्न करण्याच्यादृष्टीने औरंगाबाद येथील पहिल्या इको बटालियन कंपनीस आणखी पाच वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी …

Read More »

मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावरून फडणवीसांचा टोला, दगडाला सोन्याची नाणी समजा… औरंगाबादेतील जलआक्रोश मोर्चात सोडले टीकास्त्र

काही दिवसांपूर्वी मुंबईतील बीकेसीच्या मैदानात आयोजित सभेत बोलताना मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी संभाजीनगरचे नांमातर करण्याची गरज काय मी म्हणतोय ना असे वक्तव्य केले होते. त्या वक्तव्याचा धागा पकडत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांकडे पाणी मागण्यासाठी गेलं तर काय उत्तर मिळू शकतं? उद्धव ठाकरेंचा शब्द …

Read More »

राज ठाकरेंच्या सभेविरोधात याचिका दाखल करणाऱ्यास एक लाखाचा दंड औरंगाबाद उच्च न्यायालयाने याचिका लावली फेटाळून

हनुमान जयंती दिवशी पुण्यात हनुमान मंदिरात जावून महाआरती केल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त औरंगाबादेत जाहिर सभा घेणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर विविध राजकिय पक्षांकडून सामाजिक संघटनांकडून राज ठाकरे यांच्या सभेला विरोध करत सभेला परवानगी देवू नका अशी मागणी केली. राज ठाकरे यांच्या सभेला दिलेली परवानगी रद्द करावी …

Read More »

मुंबई, कोकणसह राज्यातील या जिल्ह्यात ५ दिवस पावसाची हजेरी हवामान खात्याचा इशारा

मुंबई: प्रतिनिधी पश्चिम बंगालचा समुद्र आणि लगतच्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मुंबई, कोकणसह महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यात आजपासून १५ जून पर्यंत पाऊस कोसळणार असल्याचा इशारा देत मुंबई कोकणसह पुणे, परभणी, सातारा, हिंगोली उस्मानाबाद, नांदे़ड लातूर भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. मुंबई, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग …

Read More »

राज्यातल्या या नऊ जिल्ह्यांबाबत केंद्राने व्यक्त केली चिंता कोरोनाच्या वाढत्या संख्येबाबत लॉकडाऊन लागण्याची शक्यता

नवी दिल्ली-मुंबईः प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना संख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्याबाबत चिंता व्यक्त केली असून या जिल्ह्यामध्ये सातत्याने कोरोनाची संख्या वाढत असल्याबाबत राज्य सरकारने ठोस उपाय योजना कराव्यात अशी अपेक्षा केंद्रीय आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण यांनी व्यक्त केली. देशातील कोरोनाचा आढावा घेतला. त्यानंतर नवी दिल्लीत आयोजित पत्रकार …

Read More »

कोविड सेंटरमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी लागू उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील कोविड सेंटरमध्ये महिलांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी ३१ मार्चपर्यंत एसओपी (मानक कार्यप्रणाली) तयार करुन लागू करण्यात येईल. ही एसओपी राज्यातील सर्व कोविड सेंटरसाठी बंधनकारक असेल अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरूवारी विधानसभेत केली. औरंगाबाद शहरातल्या रुग्णालयात डॉक्टरकडून महिलेचा विनयभंग झाल्याचा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आला त्यावेळी उपमुख्यमंत्री …

Read More »

वीज बील माफीप्रश्नी राज ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट, अदानी पवारांच्या घरी भेटीनंतरच वीज बील माफीवरून सरकारचे घुमजाव

ठाणे : प्रतिनिधी लॉकडाऊनमधील भरमसाठ वाढीव वीजबिल माफ करण्याचा निर्णय राज्य सरकारने जाहिर केला. नंतर मात्र बिल माफ करणार नसल्याचे जाहिर केले. परंतु ज्यावेळी हा निर्णय जाहिर केला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरी गौतम अदानी हे येवून गेल्याने वीज बील माफ करणार नसल्याचे सरकारने जाहिर केल्याचा गौप्यस्फोट …

Read More »

मुंबई समिश्र तर राज्यात भारत बंदला चांगला प्रतिसाद भाजपा वगळता सर्वपक्षियांचा सहभाग

मुंबईः प्रतिनिधी केंद्राच्या शेती कायद्याविरोधात पुकारलेल्या भारत बंदला भाजपातेर सर्व पक्षियांनी संपूर्ण पाठिंबा देत मुंबईसह राज्यातील अनेक भागात आंदोलन करत शेतकऱ्यांना पाठिंबा दिला. या बंदला पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यातील अनेक रिक्षा संघटनांनी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत आपला व्यवसाय बंद ठेवून बंदमध्ये सहभागी होत शेतकऱ्यांच्या बंदला पाठिंबा दिला. विशेषतः …

Read More »

या तारखेपासून रखडलेली अकरावी प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु शिक्षण विभागाकडून वेळापत्रक जाहीर

मुंबईः प्रतिनिधी ११वी ची रखडलेली प्रवेश प्रक्रिया आता सुरु करण्यात येत असून त्याविषयीचे वेळापत्रक लवकरच शिक्षण विभागाकडून नुकतेच जारी करण्यात आली. मात्र ही प्रवेश प्रक्रिया पार पाडताना मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी आरक्षित जागा देवून प्रवेश देण्यात येणार आहे. त्यामुळे न्यायालयात जरी याचिका प्रलंबित असली तरी मराठा समाजातील मुलांना आरक्षणाचा लाभ मिळणार …

Read More »