Breaking News

Tag Archives: aam adami party

मनिष सिसोदीयांची कवितेतून जनतेला साद तर मोदींवर टीकास्त्र,… तो चौथी पास राजा का,… समाज माध्यमातून भरलेच व्हायरल

दिल्लीच्या दारू धोरणातील कथित घोटाळ्याप्रकरणी राजधानी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते मनीष सिसोदिया सध्या तुरुंगात आहेत. मनिष सिसोदिया यांनी तुरुंगातूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शैक्षणिक पात्रतेवर पुन्हा एकदा हल्ला चढवला आहे. एका चौथी पास राजाच्या राजमहलचा (राजमहाल) पाया हादरत आहे असा खोचक टोला त्यांनी एका कवितेतून लगावला आहे. …

Read More »

आदित्य ठाकरे यांनी घेतली अरविंद केजरीवाल यांची भेट दोनदा झाली भेट, संभाव्य राजकिय आघाडीबाबत चर्चा झाल्याची माहिती

कर्नाटकातील निवडणूकीत भाजपाचा दारूण पराभव झाल्यानंतर विरोधकांचा आत्मविश्वास वाढला आहे. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे युवा नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे आणि आम आदमी पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांची आज पुन्हा भेट झाली. २४ फेब्रुवारीला अरविंद केजरीवाल मुंबई दौऱ्यावर आले होते. तेव्हाही त्यांनी ठाकरे कुटुंबियांची भेट घेतली होती. त्यानंतर, लागलीच तीन, …

Read More »

सर्वोच्च न्यायालयः अखेर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे प्रशासकिय अधिकार, पण फक्त तीन गोष्टींचे अधिकार नायब राज्यपालांकडे

दिल्लीतील नोकरशाहीवर कोणाचे नियंत्रण असावे, याबाबत सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. मागील अनेक दिवसांपासून याच विषयावर दिल्लीचे सरकार आणि नायब राज्यपाल यांच्यात वाद चालला होता. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या पाचसदस्यीय खंडपीठाने दिल्ली सरकारच्या बाजूने निकाल दिला आहे. राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील (एनसीटी) सर्व नोकरशाहांवर दिल्ली सरकारचे नियंत्रण असेल, असे कोर्टाने म्हटले …

Read More »

अरविंद केजरीवाल यांचा आरोप, सीबीआय आणि ईडीची न्यायालयात खोटी प्रतिज्ञापत्र १४ फोन नष्ट केले तर ४ फोन त्यांच्याकडे कसे

कथित उत्पादन शुक्ल घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावले आहे. सीबीआयने केजरीवाल यांना रविवारी १६ एप्रिल रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, या समन्सवरून अरविंद केजरीवाल यांनी आज पत्रकार परिषद घेत मोदी सरकारवर टीका केली. अरविंद केजरीवाल म्हणाले, गेल्या वर्षभरापासून …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या डिग्रीची माहिती मागितली म्हणून न्यायालयाने ठोठावला केजरीवालांना दंड माहिती आयोगाचा आदेश गुजरात उच्च न्यायालयाने रद्द ठरवित दिला अजब निर्णय

मागील तीन-चार वर्षापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शिक्षणाचा मुद्दा राष्ट्रीय राजकारणात उपस्थित करण्यात आला होता. त्यावेळी भाजपाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी आणि पदविकेचे शिक्षण गुजरात विद्यापीठ आणि दिल्ली विद्यापाठातून झाल्याची माहिती देण्यात येत आली. त्यानंतर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी माहिती अधिकारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिग्रीची प्रत मिळावी …

Read More »

भाजपाने ६ मुख्यमंत्री, ७ खासदार, शेकडो नेते उतरवूनही हाती पराभव, मात्र आपची विजयी घौडदौड दिल्ली महापालिकेत आम आदमी पक्षाला १३४ तर भाजपाला १०४ जागा

मागील काही वर्षात भाजपाकडून प्रत्येक निवडणूक प्रतिष्ठेची करण्यात येत आहे. त्यानुसार मागील १५ वर्षापासून हाती राखलेल्या दिल्ली महापालिकेची निवडणूकही भाजपाने प्रतिष्ठीत करत भाजपाशासित ६ राज्यांचे मुख्यमंत्री, ७ खासदार आणि शेकडो पदाधिकारी दिल्ली महापालिकेच्या निवडणूकीत उतरविले. मात्र आप अर्थात आम आदमी पार्टीने आपल्या कामाच्या आणि प्रचाराच्या जोरावर भाजपाला १०४ जागांवर रोखत …

Read More »

नाना पटोलेंचा आरोपः नोटांना धार्मिक रंग देऊन बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लक्ष वळविण्याचा प्रयत्न

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून दोघेही राजकीय फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात. हे देशाने अनेकदा पाहिले आहे. नोटांवर देवी देवतांचे फोटो छापण्याची मागणी करून अरविंद केजरीवाल मोदींच्या मदतीला धावले असून बुडणा-या अर्थव्यवस्थेवरून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी नोटांना धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न …

Read More »

अरविंद केजरीवालांचे आता हिंदू कार्ड: नोटेवर लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो छापा

नवी दिल्ली पाठोपाठ पंजाबमधील विधानसभा निवडणूकीत डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग यांच्या विचारानुसार वाटचाल करणार असल्याची ग्वाही देत सत्ता काबीज केली. मात्र आता आगामी गुजरात आणि हिमाचल प्रदेशातील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीचे प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी रिझर्व्ह बँकेच्या नोटेवर गांधींच्या फोटोसोबतच लक्ष्मी आणि गणपती या …

Read More »

आपच्या दुसऱ्या मंत्र्याला ईडीकडून अटक पंजाबनंतर दिल्लीतील आरोग्य मंत्री जैन अटक केली

काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पहिल्यादाच सत्तेत आलेल्या एका मंत्र्याला लाच घेताना अटक केल्याचे उदाहरण ताजे असतानाच आज ई़डीने केलेल्या कारवाईत आम आदमी पार्टीच्या दिल्ली सरकारमधील आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक केली. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने अटक केली आहे. कोलकाता येथील एका कंपनीसोबत हवाला व्यवहार केल्याचा …

Read More »

मुख्यमंत्री पदाची सुत्रे घेतल्यानंतर भगवंत मान यांनी केली “ही” घोषणा भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी सुरु करणार हेल्पलाईन

शहीद भगतसिंग आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचा नारा देत पंजाबची सत्ता मिळविणाऱ्या आम आदमी पक्षाच्या सरकारचा काल शपथविधी पार पडला. शपथविधी झाल्याबरोबर राज्यातील जनतेला भ्रष्टाचारापासून मुक्ती देण्यासाठी भ्रष्टाचाराची तक्रार करण्यासाठी राज्यस्तरीय हेल्पलाईन सुरु करण्याची घोषणा मुख्यमंत्री मान यांनी केली. भगवंत मान यांनी पंजाबमध्ये २३ मार्च रोजी …

Read More »