Breaking News

Tag Archives: विरोधी पक्षनेते

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, समृध्दीसाठी वर्षातच २४०० कोटी पुन्हा निविदा ?

राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना २०१४ साली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फायद्यात असणाऱ्या एसआरए आणि म्हाडाच्या ठेव रकमेतील पैशांचा आणि बँकांकडून ५० हजार कोटींचे कर्ज उभारत मुंबई ते नागपूर असा ८०० किमीहून अधिक लांब असलेल्या समृध्दी महामार्गाची उभारणी केली. तसेच या महामार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनी तत्कालीन नगरविकास …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, अंतरीम अर्थसंकल्पातून कंत्राटदारांना पोसण्याचं काम

पाच दिवसीय अंतरिम अर्थसंकल्पात कंत्राटदारांना पोसण्याचं काम या सरकारने केलं आहे. जनतेच्या हाती केवळ भोपळा देण्याचं काम सरकारने केल्याची टीका विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत सरकारवर विविध विषयांवर जोरदार हल्ला चढविला. अर्थसंकल्पिय अधिवेशानंतर आयोजित पत्रकार परिषदेत अंबादास दानवे बोलत होते. अंबादास दानवे म्हणाले की, सरकारने आणलेला सहकार विधेयक हे …

Read More »

अंबादास दानवे यांचा आरोप, अंतरिम अर्थसंकल्पातून राज्यातील तिजोरीची लूट

बेरोजगार, गोरगरीब, शेतकरी व सर्वसामान्यांवर अर्थसंकल्पातून अन्याय करणारा असून सरकारने सादर केलेला अंतरिम अर्थसंकल्प हा राज्याची तिजोरी लुटणारा असल्याचा आरोप विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी करत हा अंतरिम अर्थसंकल्प बेरोजगार, गोरगरीब, शेतकरी व सर्वसामान्यांना न्याय न देणारा असल्याचा आरोप केला. तसेच जनतेच्या हितविरोधी असलेल्या या अर्थसंकल्पाचा निषेध करत युती …

Read More »

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. कोरोनाच्या नव्या …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीसांवर हल्लाबोल

मुख्यमंत्री स्वतःला शेतकऱ्याचा मुलगा म्हणवतात मात्र शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना त्यांनी शेतकऱ्याच्या मुलासारखं उत्तर दिले नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न धसास लागतील अशी अपेक्षा होती. संत्रा, धान, कापूस, सोयाबीन कांदा उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने दिलासा दिला नाही. १९४ तालुक्यांना केंद्राकडून मदत मिळेल अशी अपेक्षा होती, पण तिथेही अपेक्षाभंग झाला आहे. एनडीआरएफ व एसडीआरएफच्या मदतीपासून …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा आरोप, दुष्काळ जाहीर करतानाही सरकारचे राजकारण… ४० पैकी ३५ तालुके सत्ताधारी आमदारांचे

राज्यात चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु हा दुष्काळ जाहीर करत असताना सरकार राजकारण करत असल्याचे निदर्शनास आले आहे. दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यापैकी जवळपास ३३ ते ३५ तालुक्यांचे आमदार हे सत्ताधारी पक्षाचे असून त्यात काही मंत्र्यांचेही तालुके आहेत. विरोधी पक्षातील आमदारांच्या फक्त चार ते पाच तालुक्यांचा दुष्काळी …

Read More »

विजय वडेट्टीवार यांचा सवाल, खाली केलेले खोके पुन्हा भरण्यासाठी पेपर फुटले ? पदभरतीतील घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करा

तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून पेपर फुटले आहेत तरीही सरकार ही नोकर भरती रेटून नेण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच मुंबई पोलीस भरती आणि वन विभाग भरतीचा सुध्दा पेपर फुटला आहे.सत्ताप्राप्तीसाठी खाली केलेले खोके भरण्यासाठी पेपर फुटले का असा खोचक सवाल करत या सर्व घोटाळ्यांची एसआयटी मार्फत चौकशी करून घोटाळा …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, त्यांचा नाना करू नका…. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार याची निवडीनंतर अभिनंदनपर भाषणा दरम्यान मुख्यमंत्र्यांची टोलेबाजी

सध्याचे सुरु असलेले पावसाळी अधिवेशन विरोधी पक्षनेते विना पार पडणार की काय अशी? शक्यता वाटत होती. त्यामुळे मी प्रत्येक वेळी त्यांना विचारयाचो की कधी येणार कधी येणार ? मी काही माझ्याकडच्या लोकांना नाही तर समोरच्या बाकावर बसलेल्या फ्रंटलाईनला बसणाऱ्या नेत्यांना विचारत होतो. विजय वडेट्टीवार हे मुळचे शिवसैनिक आहेत. त्यामुळे ते …

Read More »

फडणवीसांनी उल्लेख केलेल्या शिंदे सरकारला लिहिलेल्या विरोधकांच्या पत्रात आहे तरी काय? वाचा तर मग या कारणामुळे चहापनावर टाकला बहिष्कार

राज्यातील भाजपा प्रणित शिंदे-फडणवीस सरकारला अजित पवार यांच्या रूपाने तिसरे इंजिन लागलेले असतानाही वेगवान निर्णय गतिमान सरकार या घोषणेची प्रत्यक्ष अंमलबजाणी होताना दिसत नाही. तसेच मागील एक वर्षाच्या कालावधीत शिंदे-फडणवीस-पवार सरकारने वारेमाप घोषणा केल्या. मात्र त्या घोषणांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्याचबरोबर राज्यातील कायदा-सुव्यवस्था आदींसह शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विरोधी पक्षनेते अंबादास …

Read More »

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून कामकाजाचे १५ दिवस चालणार

राज्य विधिमंडळाचे सन २०२३ चे पावसाळी अधिवेशन १७ जुलै ते ४ ऑगस्ट २०२३ या कालावधीत मुंबई येथे होणार आहे. याबाबतची घोषणा विधानसभा कामकाज सल्लागार समितीच्या आज झालेल्या बैठकीत विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी, तर विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधानभवनात पार पडलेल्या …

Read More »