राज्याची आर्थिक परिस्थिती नसताना २०१४ साली माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फायद्यात असणाऱ्या एसआरए आणि म्हाडाच्या ठेव रकमेतील पैशांचा आणि बँकांकडून ५० हजार कोटींचे कर्ज उभारत मुंबई ते नागपूर असा ८०० किमीहून अधिक लांब असलेल्या समृध्दी महामार्गाची उभारणी केली. तसेच या महामार्गासाठी लागणाऱ्या आवश्यक जमिनी तत्कालीन नगरविकास मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपलब्ध करून दिल्या. या समृध्दी महामार्गाचे काम अर्थवटस्थितीत असतानाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अर्धवट अवस्थेतील समृध्दी महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. या मार्गाच्या उद्घाटनाला अद्याप एक वर्ष पूर्ण होण्या आधीच राज्य सरकारकडून पुन्हा एकदा २४०० कोटी रूपयांची निविदा नुकतीच प्रसिध्द केली. त्यावरून राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी चांगलाच निशाणा साधला आहे.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या समृध्दी महामार्गाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.
मागील १० वर्षात जगातील इतर देशांनी किती प्रगती केली. इकडे भाजपाचं सरकार साधं रस्त्याचं काम ही चांगलं करू शकत नाही. हजारो कोटी खर्चून तयार करण्यात आलेल्या ह्या महामार्गाचे काम इतके निकृष्ट दर्जाचे आहे की आज या रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहे. निकृष्ट बांधकामामुळे अनेक अपघात समृध्दी महामार्गावर आता पर्यंत झाले असल्याची टीकाही केली.
पुढे बोलताना विजय वडेट्टीवार म्हणाले की, समृध्दी महामार्ग विकासाच्या नावाखाली फक्त हजारो कोटींची कंत्राटे काढल्या गेली. ते देण्याच्या बदल्यात कंत्राटदारांकडून शेकडो कोटींचे कमीशन सत्ताधाऱ्यांनी आपल्या खिशात गोळा केले. इतके कमीशन वसूल करून पोट भरणार ते महायुतीचे सरकार आणि मंत्री कसले? अजूनही कमीशन ची भूक बाकीचं आहे. म्हणूनच समृध्दी महामार्गावर विकासाच्या नावाखाली आणखी २४०० कोटींचा कंत्राट या सरकारने काढला असल्याचा आरोप यावेळी केला.
दरम्यान, काल शिंदे गटाचे मंत्री दादाजी भुसे आणि रायगडच्या कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या विधानसभा आमदारांच्या लॉबीतच एकमेकांना धक्काबुक्की केली. त्यावरून विधानसभेत विरोधकांनी राज्य सरकारच्या विरोधात टीकाही केली. सभागृहात मात्र मंत्री दादाजी भुसे यांनी असा कोणताही प्रकार झाला नसल्याचा खुलासा केला. मात्र तर उलट महेंद्र थोरवे यांनी दादाजी भुसे यांच्याबरोबर बाचाबाची झाल्याचे विधानसभेच्या बाहेर बोलताना प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितले. त्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी पुन्हा एकदा समृध्दी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी पुन्हा एकदा २४ कोटींचे टेंडर काढल्याची माहिती दिली. त्यावरून मंत्री दादाजी भुसे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यातील वादीवादामागे हे तर कारण नव्हे ना अशी चर्चा राजकि वर्तुळात सुरु आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना बोलावून गाजावाजा करत उद्घाटन केलेल्या समृध्दी महामार्गाचा पूर्ण बोजवारा उडाला आहे.
मागील १० वर्षात जगातील इतर देशांनी किती प्रगती केली. इकडे भाजपचं सरकार साधं रस्त्याचं काम ही चांगलं करू शकत नाही. हजारो कोटी खर्चून तयार करण्यात आलेल्या ह्या महामार्गाचे… pic.twitter.com/cBKids5xVv
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) March 2, 2024