Breaking News

अंबादास दानवे यांची टीका, शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्राच्या घोषणा हवेतच विरल्या

गेल्या ४८ तासांत दुष्काळ, सततची नापिकी याने त्रस्त ६ शेतकऱ्यांनी यवतमाळ जिल्ह्यात आत्महत्या केल्या. सरकार सत्तेत आल्यापासून आत्महत्यामुक्त महाराष्ट्र करण्याच्या घोषणा करत आहेत. मात्र वाढत्या शेतकरी आत्महत्येच्या घटना पाहता सरकारने केलेल्या घोषणा या घोषणाच राहिल्या असून त्या हवेत विरल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली.

कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे ठाण्यात रुग्ण सापडले असून वाढती कोरोना रुग्णांची संख्या पाहता सरकारने यावर प्रतिबंधात्मक कोणत्याही उपाययोजना केल्या नाहीत, असा आरोपही अंबादास दानवे यांनी केला.

पुढे बोलताना अंबादास दानवे म्हणाले, अवकाळी पाऊसाच्या नुकसान भरपाईची मदत अद्याप शेतकऱ्यांना मिळाली नाही. सरकारने जाहिरातीद्वारे प्रसिध्द केलेले आकडे हे कागदावरच राहिले आहेत. मुख्यमंत्री यांच्या ठाणे जिल्ह्यात कुपोषणाचा दर उंचावला आहे. शासन आपल्या दारी की कंत्राटदार, उद्योगदारांच्या दारी असा खोचक टोला लगावत शेतकरी आत्महत्या, कुपोषण रोखण्यास हे सरकार अपयशी ठरल्याचा आरोप केला.

उद्योग विभागावर टीका करताना अंबादास दानवे म्हणाले, उद्योग विभागाने आज विविध वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरांती दिल्या. एखाद्या कंपनीसोबत करार केला म्हणजे गुंतवणूक झाली असं होतं नाही. विश्वगुरु म्हणून मिरवणारा भाजपा जनतेचे प्रश्न सोडविण्यात सपशेल अपयशी ठरला आहे, म्हणून सध्या ते राम मंदिराच्या मुद्द्यावर भावनिक फुंकर घालून राजकारण करत आहेत, असा आरोपही केला.

अंबादास दानवे म्हणाले, तर इंडिया आघाडी भ्रष्टाचार, बेरोजगारी, महागाई यावर निवडणूका लढणार असल्याचे सांगत शिंदे गटातील अनेक खासदार हे भाजपाच्या चिन्हावर लढणार आहेत. त्या उमेदवारांना भाजपा गिळून टाकणार असेही सांगितले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *