Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या १० नेत्यांची चौकशी झाली पण…. २ हजार रूपयांच्या नोटेचा निर्णय एखाद्या लहरी व्यक्तीने घेतल्या सारखा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील निवडणुका कधी होतील, हे सांगता येणार नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाजपवर टीका केली. चलनातून …

Read More »

महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका

सत्तेचा मलिदा चाखण्यासाठी एकत्र आलेल्या महाविकास आघाडीला सत्ता गेल्यामुळे घरघर लागली आहे. लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुकांआधी मोठा भाऊ कोण याचे दावे सुरु झाल्याने महाविकास आघाडीची वाटचाल विसर्जनाकडे सुरु झाली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी सोमवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते …

Read More »

सुप्रिया सुळे पहिल्यांदाच म्हणाल्या, मी वानखेडेंचा मुद्दा संसदेत मांडणार… एका बॉलीवूड स्टारच्या मुलाचे असे हाल तर सर्वसामान्यांचे काय

कॉर्डिलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला ताब्यात घेतल्यानंतर समीर वानखेडे चर्चेत आले होते. याच प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी समीर वानखेडेंनी २५ कोटी रुपयांची खंडणी शाहरुख खानकडे मागितली होती असा गंभीर आरोप करण्यात आला आहे. त्याच संदर्भात त्यांची सीबीआय चौकशी सुरु आहे. सीबीआय चौकशीचा आजचा दुसरा …

Read More »

डिएनए टेस्ट करावी लागेल, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर भाजपा-भाजपा युतीतही हा प्रश्न आला होता

कर्नाटक राज्याचा निकाल लागण्याच्या काही दिवस आधी राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा होत होत्या. या सभेच्यावेळी मविआतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून जी भूमिका मांडली जायची नेमक्या त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भूमिका मांडली जात होती. त्यामुळे आघाडीत बिघाडीत निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होण्यास सुरुवात झाली. मात्र कर्नाटक विधानसभेचा …

Read More »

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, हे गणित आहे, म्हणून आता आपण मोठा भाऊ… महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

कर्नाटक राज्याचा निकाल लागल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांना आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. तसेच आगामी निवडणूकांची पूर्वतयारी म्हणून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील या गणितामुळे …

Read More »

शरद पवार यांचा इशारा; एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये… कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवायचे काम मालकांचे

संपत्ती मिळवायची आणि ठेवायचा अधिकार फक्त आमचा आहे आणि कष्ट करणारी जमात ही तुमची आहे. कष्ट करण्याचे काम तुमचे आणि धनसंपत्ती ठेवयाचे काम मालकांचे. त्यामुळे एक शुद्र, अति शुद्र असे वातावरण समाजामध्ये करून आज काही लोक मालकांच्या नावाने एक वेगळा निकाल घेत आहेत. तो निकाल त्यांना घ्यायचा असेल तर माथाडी …

Read More »

जयंत पाटील यांची मागणी,… फक्त त्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पत्र लिहीत केली मागणी

फक्त तांत्रिक अडचणी आलेल्या उमेदवारांचीच कौशल्य चाचणी पुन्हा घ्या अशी मागणी करणारे पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना लिहिले आहे. जयंत पाटील म्हणाले, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून गट-क अंतर्गत सहाय्यक आणि लिपीक नि टंकलेखक या पदाकरीता परीक्षा घेण्यात आली होती. मात्र टंकलेखनाच्या ऑनलाइन चाचणी दरम्यान उमेदवारांना …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा दावा, राष्ट्रवादीत अजून दोन बॉम्ब फुटायचेत, त्यानंतर… शिवसेनेकडून दक्षिण मध्य मुंबईची जागा वंचितला देण्याची तयारी

नुकत्याच महाविकास आघाडीच्या बैठकीत मविआतील घटक पक्षांच्या मित्र पक्षांनाही आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा झाली. त्यामुळे ठाकरे गटासोबत असलेल्या वंचित बहुजन आघाडीला मविआत स्थान मिळणार असल्याची शक्यता वक्त करण्यात येत असताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेससंदर्भात खळबळजनक दावा केला. यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …

Read More »

जयंत पाटील यांनी सांगितला निर्णय, वाद निर्माण होण्याची शक्यता त्यामुळे…. राष्ट्रवादी काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीनंतर दिली माहिती

महिन्याच्या पहिल्या शनिवारी प्रत्येक गावात ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा कार्यक्रम घेण्यात येतो. यामध्ये गावप्रश्नापासून ते देशस्तरावरील प्रश्नांचा उहापोह होतो. त्यामुळे आजच्या कोअर कमिटीच्या बैठकीत ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ या कार्यक्रमावर अधिक भर द्यायचा असा निर्णय करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली. जयंत पाटील म्हणाले, बुथ …

Read More »

जयंत पाटील यांची सूचना,… खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत नवाब मलिकांनी समीर वानखेडेवर केलेले आरोप सीबीआय कारवाईनंतर खरे ठरत आहेत...

महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन गृहविभागाने पावले टाकावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना केली. महाराष्ट्रात जातीय दंगली गैरसमजातून अथवा जाणीवपूर्वक होत असतील तर याचा छडा लावायला हवा. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याची …

Read More »