Breaking News

अजित पवार यांची स्पष्टोक्ती, हे गणित आहे, म्हणून आता आपण मोठा भाऊ… महाविकास आघाडीतील जागा वाटपाच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचे वक्तव्य

कर्नाटक राज्याचा निकाल लागल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणूकांना आणखी वर्षभराचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना पुढील रणनीती ठरविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडली. तसेच आगामी निवडणूकांची पूर्वतयारी म्हणून जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी समितीही स्थापन करण्यात आली. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील या गणितामुळे आता आपण मोठा भाऊ असल्याचे वक्तव्य केल्याने राजकिय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
कोल्हापूरात एका कार्यक्रमासाठी अजित पवार आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अजित पवार पुढे म्हणाले की, आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल असेही स्पष्ट केले.

तसेच मोठा भाऊ असल्यामागचे गणित सांगताना अजित पवार पुढे म्हणाले की, याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि आपणाकडे ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे असेही सांगितले.

तसेच कर्नाटकच्या निवडणूक निकालाबाबत बोलत असताना अजित पवार म्हणाले की, कर्नाटक निवडणुकीत भाजपाला वाटलं होतं की आम्हीच जिंकू. मात्र तसं घडलं नाही. लोकांनी मतदान करुन काँग्रेसला निवडलं. भाजपाला वाटलंही नव्हतं की काँग्रेसच्या इतक्या जागा येतील. बजरंग दलावर बंदीची मागणी झाल्यानंतर बजरंग बली हा प्रचाराचा मुद्दा करण्यात आला. आजवर तुम्ही कधी ऐकलं होतं का? की बजरंग बली हा प्रचाराचा मुद्दा झाला आहे? लोकांना भावनिक करण्याचा प्रयत्न कर्नाटकमध्ये झाला. मात्र कर्नाटकमध्ये जनतेने दाखवून दिलं की ते काय करु शकतात, असे सूचक वक्तव्यही केले.

शिंदे गटावर टीका करताना अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरेंच्या वडिलांनी जो पक्ष स्थापन केला तो पक्षच या लोकांनी घेतला. निवडणूक आयोगाने यांना चिन्ह आणि पक्षाचं नाव दिलं आहे. मात्र जनतेला ते पटलं आहे का? आज यांना पाहिलं की गद्दार हा शब्द जनतेला आठवतो तसंच ५० खोके हा शब्दही आठवतो असं सांगत शिंदे गटावर टीका केली.

Check Also

इराणच्या राजदूताचे आश्वासन, जहाजावरील भारतीय क्रु मेंबर्संना लवकरच सोडू

इराणचे भारतातील राजदूत इराज इलाही यांनी मंगळवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले की, इराणच्या सैन्याने ताब्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *