Breaking News

शरद पवार म्हणाले, राष्ट्रवादीच्या १० नेत्यांची चौकशी झाली पण…. २ हजार रूपयांच्या नोटेचा निर्णय एखाद्या लहरी व्यक्तीने घेतल्या सारखा

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील निकालामुळे आगामी निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी सोमवारी येथे व्यक्त केली. यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, राज्यातील निवडणुका कधी होतील, हे सांगता येणार नाही तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या ईडी चौकशीवरून भाजपवर टीका केली. चलनातून दोन हजारांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय म्हणजे एखाद्या लहरी माणसाने निर्णय घ्यावा, या प्रकारातील आहे, अशी खोचक टीकाही केंद्रातील भाजपा सरकारवर केली.

प्रा. राम ताकवले यांच्या श्रद्धांजली सभेनंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. महाविकास आघाडीतील जागा वाटप, नोटबंदी, ईडीची कारवाई आणि तपास यंत्रणांचा गैरवापर आदी बाबत पवार यांनी भाष्य केले.

पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ईडी चौकशी करण्यात आली. देशातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दहा नेत्यांची चौकशी करण्यात आली. मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही. अनिल देशमुख यांच्यावर अतिरंजित आरोप करण्यात आले. सध्या चुकीचे काम करणाऱ्यांना संरक्षण दिले जात असून चांगले काम करणाऱ्यांना त्रास देण्याचा प्रकार होत आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली. एनसीबीचे अधिकारी समीर वानखडे यांच्यावर नवाब मलिक यांनी आरोप मलिकांना त्याची किंमत चुकवावी लागली असेही पवार यांनी आवर्जून सांगितले.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन हजारांची नोट चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात बोलताना शरद पवार म्हणाले की, निर्णय घ्यायचे आणि त्यानंतर त्याचे दायित्व स्वीकारयाचे नाही, हे चुकीचे आहे. निर्णय घेतल्यानंतर ज्यांनी गुंतवणूक आहे, त्यांना बदल करून देण्याची जबाबदारी स्वीकारली जात नाही, हे यापूर्वीच्या नोटबंदीच्या निर्णयावरून दिसून आले आहे. एखाद्या लहरी माणासाने निर्णय घ्यावा, असा हा प्रकार आहे. नोटबंदीच्या काळात अनेक बँका अडचणीत आल्या. नोटबंदीमुळे चमत्कार होईल, असा दावा करण्यात आला आणि आता दुसरा चमत्कार करण्यात आला आहे. या निर्णयाचे परिणामही आता काही दिवसांत दिसतील.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत जागा वाटपाबाबत तिन्ही पक्षांकडून दावे-प्रतिदावे केले जात आहेत. मात्र महाविकास आघाडीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही असे शरद पवार यांनी स्पष्ट करत म्हणाले, आगामी निवडणुका एकत्रित लढविण्याचे निश्चित झाले आहे. तिन्ही पक्षांचे प्रत्येकी दोन-दोन सदस्य जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत. त्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यास उद्धव ठाकरे, मी आणि मल्लिकार्जुन खर्गे चर्चा करणार आहोत, असे सांगितले.

महाविकास आगाडीत मतभेत नाहीत. आघाडीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष कोण आणि दुसऱ्या क्रमांकाचा कोण, याला महत्त्व नाही तर सगळेच पक्ष महत्त्वाचे आहेत, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *