Breaking News

डिएनए टेस्ट करावी लागेल, अजित पवारांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊत यांचे प्रत्युत्तर भाजपा-भाजपा युतीतही हा प्रश्न आला होता

कर्नाटक राज्याचा निकाल लागण्याच्या काही दिवस आधी राज्यात महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभा होत होत्या. या सभेच्यावेळी मविआतील काँग्रेस आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्याकडून जी भूमिका मांडली जायची नेमक्या त्याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून भूमिका मांडली जात होती. त्यामुळे आघाडीत बिघाडीत निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होण्यास सुरुवात झाली. मात्र कर्नाटक विधानसभेचा निकाल जाहिर होताच राज्यात पुन्हा एकदा महाविकास आघाडीत आलबेल नसल्याचे दाखविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुढाकार घेत मविआच्या नेत्यांची बैठक घेत आगामी निवडणूकाच्यादृष्टीने रणनीती ठरविण्याचा निर्णय घेतला. त्यास अद्याप अंतिम स्वरूप आलेले नसतानाच अजित पवार यांनी मोठे विधान केले. त्यास तितक्याच जोरदारपणे शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.

अजित पवार म्हणाले होते की, जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे.
तसेच अजित पवार पुढे म्हणाले होते की, आपण महाविकास आघाडीचा घटक पक्ष आहोत. आघाडी आपल्याला मजबूत ठेवायची आहे. पण हे करत असताना लक्षात ठेवा की तुमची ताकद जास्त असेल तरच तु्म्हाला महाविकास आघाडीत महत्त्व दिलं जाईल. याआधीच्या प्रत्येक निवडणुकीत काँग्रेसच्या जागा जास्त असायच्या. जागा वाटप करताना आपल्याला लहान भाऊ म्हणून भूमिका घ्यावी लागायची. पण आता आपण काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत. कारण त्यांच्या ४४ जागा आहेत आणि ५४ जागा आहेत. उद्धव ठाकरेंकडे ५६ आमदार होते. हे गणित आहे असं सांगत संख्याबळाचं गणित सांगितले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच शिवसेनेतील फुटीमुळे लोकसभेच्या किती जागा ठाकरे गट लढविणार यावरून प्रश्न उपस्थित झाल्यानंतर संजय राऊत म्हणाले, पूर्वी जिंकलेल्या सर्व जागा ठाकरे गटाच्याच राहतील असे सूचक वक्तव्य केले होते.

तर अजित पवारांच्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, सगळ्यांची डीएनए टेस्ट करू आम्ही एकदा. हा विनोद समजून घ्या. लहान भाऊ, मोठा भाऊ हा विषय मधल्या काळात शिवसेना-भाजपा युतीमध्ये सुद्धा आला होता. तेव्हाही मी म्हणालो होतो की डीएनए टेस्ट करावी लागेल. महाविकास आघाडीत कोणत्याही प्रकारे अशाप्रकारचे मतभेद नाहीत. अजित दादा काय म्हणतात? आम्ही काय म्हणतो? याही पेक्षा प्रत्येकजण आपआपल्या पक्षाची भूमिका मांडत असतो. आपल्या कार्यकर्त्यांना बळ देण्याकरता अशा भूमिका घ्याव्या लागतात. लोकसभेच्या जागावाटपाची प्रक्रिया सुरू आहे. आधी लोकसभेची निवडणूक होईल, मग विधानसभेची होईल. लोकसभेच्या जागावाटपासंदर्भात प्रमुख पक्षांच्या बैठका सुरू आहेत. या बैठकीत काय ठरतंय हे मी तुम्हाला बाहेर सांगणार नाही, असंही स्पष्ट केले.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *