Breaking News

Tag Archives: राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)

शरद पवार यांचा हल्लाबोल, विधानसभा अध्यक्षांचा निवाडा न्यायालयीन नव्हे तर….

विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना पक्ष कोणाचा, हा निर्णय दिला. मात्र हा न्यायालयीन निवाडा नसून राजकीय निवाडा आहे असे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी शिवसेना आमदार अपात्र प्रकरणावर आलेल्या निकालानंतर पुण्यात प्रसार माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार पुढे बोलताना म्हणाले की, दोन-तीन महिन्यात लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि …

Read More »

शरद पवार यांची स्पष्टोक्ती, अयोध्येतील त्या गर्दीत जाणार नाही

पक्ष सोडून जाण्याचा ज्यांनी निर्णय घेतला त्यांना परत पक्षात जागा नाही. ३० वर्षांपासून आम्ही हा पक्ष चालवत आहोत, त्यात इन्फो कंपोज याची जबाबदारी ही अजित पवारांवरच होती तेव्हा त्यांनी आपल्या कामावर जबाबदारीवर कधी लक्ष दिले नाही; आज देत आहे तर ठीक आहे अशी उपरोधिक टीकाही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार …

Read More »

शरद पवार यांचे सूचक वक्तव्य, विधानसभाध्यक्ष जर मुख्यमंत्र्यांच्या घरी जात…

मागील दिड वर्षापासून ठाकरे गटाने दाखल केलेल्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असताना त्यावर विधानसभाध्यक्षांनी वेळकाढू पणा केल्याचे दिसून येत आहे. तसेच लोकशाहीच्या प्रथेनुसार विधानसभा अध्यक्ष हे कधीही मुख्यमंत्री पदावर असलेल्या व्यक्तीच्या घरी जात नाहीत. एखादे काम असेल किंवा काही आदेश द्यायचे असतील तर विधानसभा अध्यक्ष मुख्यमंत्र्यांना पाचारण …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, राज्यात अनेक गंभीर समस्या, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्या

राज्यात पाणीटंचाई निर्माण होत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ३ डिसेंबर २०२३ पासून प्रत्येक शनिवारी-रविवारी संपूर्ण स्वच्छता मोहीमेच्या नावाखाली पाण्याचा अपव्यय करत आहेत. याव्यतिरिक्त राज्यात अनेक गंभीर समस्या आहेत, त्या सोडवण्याकडे जरा लक्ष द्यावे असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावला. जयंत …

Read More »

रश्मी शुक्ला यांची पोलीस महासंचालक पदावरील नियमबाह्य नियुक्ती रद्द करा

महाराष्ट्र पोलीस महासंचालक पदी वरिष्ठ अधिकारी रश्मी शुक्ला यांची नियुक्ती राज्य सरकारकडून करण्यात आली आहे. मात्र केंद्रीय आयोगाच्या निष्कर्शानुसार रश्मी शुक्ला यांची नियुक्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ही नियमबाह्य नियुक्ती रद्द करण्यात यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या विद्याताई चव्हाण यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केली आहे. विद्या चव्हाण म्हणाल्या …

Read More »

वंचित बहुजन आघाडी म्हणते, आमची शिवसेनेशी युती, मविआने जागावाटप…

जवळपास सहा महिन्यापासून वंचित बहुजन आघाडीकडून महाविकास आघाडीत सहभागी करून घ्यावे यावरून शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच वंचितने काँग्रेसला पत्र पाठवून सहभागी करून घेण्याबाबत पत्रही लिहिले. त्यास काँग्रेसकडून अद्याप कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यातच शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी वंचित बहुजन आघाडीचा …

Read More »

रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कार्यालयांवर ईडीची छापेमारी

देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेससह शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस आणि इतर पुरोगामी विचारांच्या राजकिय पक्षाच्या नेत्यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांचे नातू आणि आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या कृषीविषयक कंपनीने आर्थिक घोटाळा केल्याच्या आरोपावरून ईडीने ही …

Read More »

शरद पवार यांचा हल्लाबोल, देशात सध्या गाय, गोमुत्र, गोळवळकर हेच दिसतय…

मागच्या काही दिवसांपासून पक्षातील कार्यकर्ता अस्वस्थ होता. त्यांच्या मनात पक्षाचा विचार पक्का करावा यासाठी शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. देशातील चित्रं वेगळं आहे. भाजपच्या हातात सत्ता आहे. त्याशिवाय आक्रमक प्रचार यंत्रणा त्यांनी उभी केली आहे. जर्मनीत जशी हिटलरची प्रचार यंत्रणा होती असं काम भाजपाच्या वतीने सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय …

Read More »

जयंत पाटील यांचा टोला, ….डोक्यात फक्त सत्ताच राहिली विचार नाही

आगामी लोकसभा निवडणूकीला आता काही महिन्यांचा अवधी शिल्लक राहिलेला आहे. यापार्श्वभूमीवर आपापल्या पक्षाचे राजकिय पक्षाचे धोरण ठरविण्यासाठी कार्यकर्त्यांचे शिबिर आयोजित करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचेही शिर्डी येथे कार्यकर्त्यांचे आजपासून दोन दिवसीय शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबीरात उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील म्हणाले, …

Read More »

डॉ अमोल कोल्हे यांचा हल्लाबोल, सरकार मध्ये एक फूल, दोन डाउनफूल…

मागील काही दिवसांपासून केंद्रातील भाजपा सरकार मोठमोठ्या उद्योगपतींचे कर्ज माफ करत आहे. तर सातत्याने दुष्काळी परिस्थिती आणि सततच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. याप्रश्नावरून शरद पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी हल्लाबोल केला. राज्यातील शेतकरी आणि महिला, बेरोजगारी या मुद्यावर आयोजित राष्ट्रवादीचे खासदार …

Read More »