Breaking News

Tag Archives: मुख्यमंत्री

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना औरंगजेब म्हणणे हा देशद्रोह

देशाचा नावलौकिक जागतिक पातळीवर वाढविणारे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना औरंगजेबाशी करणे हा देशद्रोह आहे अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अयोध्येत राम मंदिर उभारणे आणि काश्मिरमधिल ३७० कलम रद्द करण्याचे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न मोदीजींनी पूर्ण केले. त्यांच्याबद्दल असे उद्गार काढणे हा देशाचा अपमान असून …

Read More »

नाना पटोले यांची टीका,… भाजपासह फुटीरसेनेची झोप उडाली

शिवाजी पार्कवरील भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या ऐतिहासिक सभेने एक नवा इतिहास रचला आहे. इंडिया आघाडीच्या देशभरातील नेत्यांच्या उपस्थितीत या सभेला ‘जनसागर’ लोटला होता. शिवाजी पार्कवरील सभेने भाजपाला आपला पराभव समोर दिसू लागला आहे त्यामुळे नैराश्येतून चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दरेकर यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री उदय सामंत सारख्यांना धडकी भरली …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांचे टीकास्त्र,… फॅमिली गॅदरींग झाल्यासारखी सभा होती

भारत जोडो यात्रेचा पहिला टप्पा पार पडल्यानंतर राहुल गांधी यांनी पहिल्या टप्प्यात पोहोचू शकले नसलेल्या राज्यातील जनतेची मते-भावना जाऊन घेण्यासाठी भारत जोडो न्याय यात्रेचा दुसरा टप्पा मणिपूर ते मुंबई असा काढण्यात आला. त्या यात्रेचा समारोप काल मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर पार पडला. यावेळी झालेल्या जाहिर सभेला इंडिया आघाडीतील सर्व राजकिय …

Read More »

दिव्यांगासाठीच्या पर्यावरणस्नेही व्हेईकल शॉप योजनेचा शुभारंभ

दिव्यांगाना स्वावलंबी होण्याच्या दृष्टीने पर्यावरणस्नेही व्हेईकल उपलब्ध करून देण्याच्या योजनेचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य मंत्री उपस्थित होते. सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे मंत्रीमंडळ बैठकीनंतर श्रीमती पुष्पा सागर कांबळे, माणिक रामचंद्र भेरे,धनाजी बळवंत दळवी, मधुकर हरी बोंद्रे, …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची माहिती, सगेसोयरे व्याख्येसंदर्भातील ४ लाख हरकतींची नोंद

राज्य शासनाने गेल्या पावणे दोन वर्षांत आतापर्यंत घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये शेतकरी, कामगार, महिला, युवा, ज्येष्ठ नागरिक असे सामान्य जनतेच्या हिताचे लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. आज घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देखील जनहिताचे निर्णय घेतले असून त्यामध्ये कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना भावांतर पद्धतीने लाभ देण्यासाठी ४ हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. सगेसोयरे …

Read More »

अरविंद केजरीवाल यांना अखेर न्यायालयाकडून जामीन

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे आता रद्द करण्यात आलेल्या दिल्ली अबकारी धोरण घोटाळ्यात चौकशीसाठी केंद्रीय एजन्सीच्या समन्सचे पालन न केल्याबद्दल ईडीच्या तक्रारीच्या संदर्भात १६ मार्च रोजी न्यायालयात हजर झाले. दरम्यान जवळपास ४ ते ५ वेळा ईडीने दिल्लीच्या कथित लिकर पॉलिसीत आर्थिक घोटाळ्याप्रकरणी चौकशीसाठी ईडी कार्यालयात राहण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल …

Read More »

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या अर्थसहाय्यात भरीव वाढ

राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांच्या सन्मान निधीत अकरा हजारांवरून वीस हजार रुपये अशी भरीव वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासंदर्भात अनेक पत्रकार आणि पत्रकार संघटनांनी केलेल्या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा निर्णय घेतला. वयोवृद्ध पत्रकारांची हेळसांड थांबविण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. यासंदर्भात गेल्या वर्षीच्या अधिवेशनात विधानपरिषदेत राज्य …

Read More »

आता अहमदनगर आणि मुंबईतील या रेल्वे स्थानकांच्या नामकरणाला मान्यता

आगामी लोकसभा निवडणूक राज्यातील सत्ताधारी तिन्ही पक्षांचे खासदार पराभवाच्या छायेत आल्याने मराठी भाषा आणि मराठी नावे पुन्हा एकदा चर्चेत आणण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बहुप्रतिक्षित अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी असे करण्याबरोबर मुंबईतील इंग्रज अधिकाऱ्यांच्या नावे असलेली रेल्वे स्थानकांची नावे आता मराठी नावे देण्याचा निर्णय आज झालेल्या राज्य …

Read More »

निवडणूक आचारसंहितेच्या भीतीने पुन्हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत २५ निर्णय

आगामी लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता कधीही जाहिर होऊ शकते. यापार्श्वभूमीवर सोमवारी बैठक राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्या बैठकीत राज्यातील विविध विभागांना खुष करण्यासाठी ३३ निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतले. त्यानंतर एका दिवसाच्या अंतराने आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत २५ निर्णय घेण्यात आले. या २५ निर्णयातील निर्णय हे मुंबई आणि महानगरातील जमिनीच्या …

Read More »

लता मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमीपूजन

भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाच्या इमारतीचे ऑनलाईन भूमीपूजन बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. मंत्रिमंडळ बैठकीनंतर झालेल्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, जे. जे महाविद्यालयाचे …

Read More »