Breaking News

Tag Archives: एकनाथ शिंदे

हिंदूत्ववादी राजकारणात भिजलेल्या राज्य सरकारची जनता जानेवारीतच तहानली

मागील काही महिन्यांपासून राज्यातील हिंदूत्वावादी राजकारणाला आणि हिंदूत्ववादी राजकारणाच्या नावाखाली देवळांच्या सुशोभिकरणासह, पर्यटन क्षेत्रे निर्माण करणे आणि आधीच तहानलेल्या जनतेच्या तोंडात पाण्याचा थेंब टाकण्याऐवजी देवळांच्या स्वच्छतेसाठी लाखो लीटर पाणी वाया घालविण्याचा नवा फंडा सध्या राज्य सरकार दरबारी सुरु आहे. या सगळ्या पार्श्वभूमीर हिंदूत्ववादी राजकारणाच्या अखंड डोहात बुडालेल्या आणि भिजलेल्या जनतेला …

Read More »

महाराष्ट्रात निप्पॉन स्टील सोबत ४० हजार कोटींचा सामंजस्य करार

औद्योगिक गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र जगभरातील उद्योजकांचे पसंतीचे राज्य ठरत असून दावोस मधील सामंजस्य करारानंतर आज महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी राज्यात सहा एमटीपीए क्षमतेचा एकात्मिक पोलाद प्रकल्प उभारण्याकरीता अर्सेलर मित्तल निप्पोन स्टील इंडिया कंपनी सोबत ४० हजार कोटी गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला असून यामुळे २० हजार प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष …

Read More »

राज्य सरकारकडून हरित हायड्रोजन निर्मितीसाठी सात कंपन्यांसमवेत सामंजस्य करार

हरित हायड्रोजन काळाची गरज असून त्यासाठी महाराष्ट्रात २ लाख ७६ हजार ३०० कोटी रुपये एवढी आर्थिक गुंतवणूक करणारे सात प्रकल्पांसाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. यामाध्यमातून ६४ हजार रोजगार निर्मिती होणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, संभाजी भिडे यांचा संकल्प सगळे मिळून साकार करू

छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा आणि उर्जा घेऊन राज्य शासन कार्य करत आहे. प्रतापगड हा महाराजांच्या शौर्याचे प्रतिक आहे. किल्ले प्रतापगडाच्या संवर्धनासाठी १०० कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यापैकी १३ कोटी रुपये उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रतापगडाच्या संवर्धनासाठी शासन कमी पडणार नाही. अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »

राज ठाकरे यांचा सल्ला, जरांगे पाटील अभिनंदन; आता आरक्षण कधी, विचारा….

राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्या राज्य सरकारने मान्य करत मनोज जरांगे पाटील यांनी सूचविल्याप्रमाणे मराठा समाजातील सग्या सोयऱ्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देण्याची मागणीही राज्य सरकारने मान्य केली. शिवाय मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सोडविण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यानंतरच …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा..!

मराठी भाषा ही आपली संस्कृती, परंपरा आणि इतिहास आहे. मराठी माणसाची धडाडी, संघर्ष सर्वांना ठाऊक आहे. त्यातूनच मराठी माणूस मोठा होतो. या मराठी विश्व संमेलन-२०२४ च्या माध्यमातून जगभरातील मराठी माणसांना एकत्रित येता आले आहे. म्हणूनच मराठी भाषा सर्वांना एकत्रित ठेवणारा समान धागा आहे, असे उद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, शिंदे-भाजपा-अजित पवार सरकारने कोणाला फसविले…

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आंदोलन संपले आहे पण यातून अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मराठा समाजाची मागणी सरकारने पूर्ण केलेलीच नाही. कोणाच्याही आरक्षणला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याची सरकारची भूमिका होती. सरकारने जर मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी मान्य …

Read More »

छगन भुजबळ यांची स्पष्टोक्ती, सगे सोयरे कायद्याच्या कसोटीत टिकणार नाही

मराठा आरक्षण अध्यादेश मसुद्याचे पत्र काढून मराठा समाजाचा विजय झाला असे म्हटले जात असले तरी मला काय तस वाटत नाही. झुंडशाहीने अशा प्रकारचे कायदे आणि नियम बदलता येत नाही. आम्ही सुद्धा शपथ घेताना कुठल्याही दबावाला बळी न पडता आम्ही निर्णय घेऊ अशी शपथ आम्ही सर्व मंत्रीमंडळानी घेतली आहे. मात्र ओबीसींना …

Read More »

मनोज जरांगे पाटील गुलाल उधळत म्हणाले, अध्यादेश टिकवण्याची जबाबदारी…

राज्यातील मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे या मागणीकरीता सुरु करण्यात आलेले मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेले आंदोलन अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सगसोयऱ्यांसंदर्भात दुरूस्ती केलेल्या अध्यादेशाचा मसुदा सुपुर्द केला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाने केलेली मागणी राज्य सरकारने पूर्ण केली असल्याने मराठा समाजाचे आंदोलन मागे घेत असल्याचे …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी घेतलेली जाहीर शपथ…

मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देण्यासाठी जाहिरपणे घेतलेली छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ पूर्ण करत असल्याची ग्वाही देतानाच सर्वसामान्य, शेतकरी, कष्टकऱ्यांसाठी घेतलेले निर्णय हे मतासाठी नाही तर सर्व घटकांच्या हितासाठी घेतल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नवी मुंबई येथे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील …

Read More »