Breaking News

विशेष बातमी

नुकसान सहन करत बिल्डरांच्या सोयीसाठी सरकार आणखी एक निर्णय घेण्याच्या पावित्र्यात मंत्र्याच्या उपस्थितीत बिल्डरांची झाली बैठक

मुंबईः विशेष प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या विकासकांना भराव्या लागणाऱ्या प्रिमियम शुल्कात नगर विकास विभागाने आधीच घट केलेली असताना त्या शुल्कात आणखी घट करण्याचा विचार राज्य सरकारकडून करण्यात येत असून यासंदर्भात बिल्डरांच्या आणि संबधित “बॉस” च्या उपस्थित आज मंगळवारी एक बैठक झाल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. लॉकडाऊन काळात …

Read More »

मनसे कार्यकर्त्याच्या आत्महत्येमुळे राज ठाकरे जेव्हा व्यथित होतात, तेव्हा… पुन्हा अशी श्रध्दांजली वाहण्याची वेळ येवू देवू नका असे भावनिक आवाहन

मुंबई: प्रतिनिधी नांदेडमधील मनसैनिकाने जात आणि पैशामुळे राजकारण करू शकत नसल्याचे कारण देत आपण सोडून जात असल्याचे सांगत आत्महत्या केल्याची घटना नुकतीच घडली. या घटनेमुळे व्यथीत झालेल्या मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी तुम्ही धीर सोडू नका, तुम्ही खचलात, उन्मळून पडलात तर सगळ्यात मलाच जास्त त्रास होईल असे सांगत जात आणि पैशाच्या …

Read More »

नागपूर मॅट कोर्टाच्या आदेशामुळे “गुच्छ” दिलेले अधिकारी झाले हवालदिल दिलेला परत मिळणार का? बदली रद्द झालेल्या अधिकाऱ्यांची विचारणा

मुंबई : विशेष प्रतिनिधी कोरोना लॉकडाऊनमध्ये वित्त विभागाने बदल्या करण्यास मनाई करणारा आदेश काढूनही महसूल विभागाने तहसीलदार, उपजिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या मोठ्या प्रमाणावर केल्या. या बदल्या करताना सदर अधिकाऱ्याचा तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला की नाही हे पाहताच केल्याने नागपूरच्या मॅटने महसूल विभागाने केलेल्या सर्व बदल्या रद्द करण्याचे आदेश दिले. मात्र या …

Read More »

इंडियन ऑईलचा इंडेन गॅस बुक करायचाय? मग हा नवा नंबर डायल करा ग्राहकांसाठी देशभरात आता एकच बुकिंग नंबर

मुंबई : प्रतिनिधी सणासुदीच्या दिवसात देशभरातील ग्राहकांच्या सोयीसाठी इंडियन ऑइल तर्फे आणखी एक पुढाकार घेत इंडेन घरगुती गॅस सिलिंडर बुकिंग साठी एक कॉमन नंबर जारी केला आहे. आता ग्राहक ७७१८९५५५५५  या नंबर वर गॅस सिलिंडर बूक करू शकतील. ग्राहकांसाठी ही सुविधा 24×7 उपलब्ध असेल. या क्रमांकावर SMS किंवा IVRS च्या माध्यमाने LPG सिलिंडर बूक करता येऊ …

Read More »

“जनराज्यपाल” या पुस्तकावरून शरद पवारांचा राज्यपाल कोश्यारींना टोला राज्यघटनेत जनराज्यपाल पदच नसल्याचे खोचक पत्र

मुंबईः प्रतिनिधी महाराष्ट्राचे राज्यपाल यांनी पद स्विकारल्यापासून केलेल्या कामाचा आढावा पुस्तक स्वरूपात “जनराज्यपाल ” नावाने प्रकाशित केले. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाविकास आघाडीचे प्रणेते शरद पवार यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना खोचक पत्र लिहिले. त्यामुळे राज्यात ठाकरे विरुद्ध राज्यपाल असा संघर्ष महाराष्ट्राने अनुभवत असतानाच भविष्यात पवार विरुद्ध …

Read More »

सर्वोच्च असो किंवा कोणतेही न्यायालय ६ महिन्यानंतर स्थगिती आदेश संपुष्टात येणार राज्य सरकारकडून शासन निर्णय जाहीर

Mantralay

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील एखाद्या क्रिमिनल किंवा दिवाणी प्रकरणात सर्वोच्च न्यायालयासह देशातील कोणत्याही न्यायालयाने स्थगिती दिली असेल मात्र त्यास ६ महिन्याचा कालावधी उलटून गेला असेल तर त्या स्थगितीचा आदेश आपोआप रद्दबातल होणार असल्याचा शासन निर्णय नुकताच राज्य सरकारने जाहीर केला. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने हे आदेश जारी करण्यात आल्याचे …

Read More »

महसूल मंत्री थोरातांच्या आदेशाने झालेल्या उपजिल्हाधिकारी- तहसीलदारांच्या बदल्याच बेकायदा नागपूर मॅट कोर्टाने ४० जणांच्या बदल्या बेकायदेशीर ठरविल्या

मुंबई : विशेष प्रतिनिधी लॉकडाऊन काळात वित्त विभागाने बदल्या करण्यावर निर्बंध घातलेले असतानाही महसूल विभागाने राज्यातील उपजिल्हाधिकारी आणि तहसीलदारांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या केल्या. तसेच या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर  “गुच्छ”चे आदान प्रदान झाल्याची चर्चा त्यावेळी महसूल विभागात रंगली होती. विशेष म्हणजे यासाठी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पुढाकार घेतल्याने नागपूरच्या मॅट …

Read More »

शेतकऱ्यांसाठी गेलेल्या मुख्यमंत्र्यांना मदतीसाठी आर्थिक धीर देणारा भेटला ‘आदर्श’ चिमुकल्याने दिले खाऊचे पैसे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी

मुंबई : प्रतिनिधी ‘आदर्श तू दिलेली ही प्रेमाची भेट आहे. यात या रक्कमे इतकीच भर घालून, ती मुख्यमंत्री सहायता निधीस देण्यात येईल,’ या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शब्दांनी आदर्श जाधव या चिमुकल्याच्या चेहऱ्यावर आनंद चमकला.  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे गुरूवारी उस्मानाबद जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात आदर्श जाधवने खाऊसाठी जमा केलेल्या …

Read More »

दौरा अतिवृष्टीग्रस्ताचा मात्र राजकारण रंगले फडणवीस-मुख्यमंत्री आणि पवार-राज्यपाल-पाटलांचे निम्म्या महाराष्ट्रावर संकट ओढावलं तरी राजकिय नेत्यांच्या टीका टिपण्या सुरूच

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्यातील पश्चिम महाराष्ट्रापासून ते मराठवाड्यापर्यत अनेक लहानमोठ्या गावात अतिवृष्टीमुळे घरे वाहून गेलीत तर काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला तर काही ठिकाणी शेत पिके जमिनीसकट वाहून गेल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे. त्यामुळे पुढील काही काळ शेतकरी आर्थिकदृष्ट्या उभा राहील का असा प्रश्न निर्माण झाला असतानाच या आपद्कालीन …

Read More »

उमेद अभियानांतर्गत असलेल्या कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी करणार नाही अफवा खोट्या माहितीवर विश्वास ठेवू नका -मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान तथा उमेद अभियानांतर्गत महिलांचे स्वयंसहाय्यता गट तसेच महिला सक्षमीकरणासाठी सध्या सुरु असलेल्या सर्व योजना केंद्र व राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असून त्या तशाच पुर्ववत सुरु राहणार आहेत. याबद्दल निर्माण करण्यात आलेले समज चुकीचे आहेत. महिला वर्गाने अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू  नये, असे आवाहन अभियानाचे …

Read More »