Breaking News

भाजपा आणि काँग्रेसचे पहिल्यांदा एकमत, रिट्विट करत दाखविली सहमती

क्रिकेट वर्ल्ड कपचा अंतिम क्रिकेट सामना भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया या दोन संघांत गुजरात मधील नरेंद्र मोदी स्टेडियम मध्ये होत आहे. तसेच या सामन्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडेएऊ हे दोघे उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर देशाच्या राजकारणात एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या भाजपाने केलेले ट्विट काँग्रेसने रिट्विट करत त्या ट्विटमधील वाक्यावर आज पहिल्यांदाच एकमत झाल्याचे दाखवून दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाकडून सातत्याने काँग्रेसच्या कार्यकाळावर आणि सध्याच्या राजकिय परिस्थितीबद्दल काँग्रेसला जबाबदार धरत टीका करण्याची संधी सोडत नाहीत. तर दुसऱ्याबाजूला देशातील हिंदूत्ववादी धार्मिक राजकारणावर, आर्थिक धोरणावर, कोरोना काळात घेतलेले निर्णय, देशात वाढलेली बेरोजगारी, महागाई आदी प्रश्नी काँग्रेसकडूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका करत प्रत्युत्तर देत असते.

त्यातच आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणूका आणि पाच राज्यात होत असलेल्या विधानसभेच्या निवडणूका या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या पुढाकाराने सर्व विरोधी पक्षांची इंडिया नावाची आघाडी स्थापन केली. तर भाजपाने २०१४ पासून डब्यात टाकलेली रालोआ अर्थात एनडीए आघाडीचे पुनरूजीवन करत जीवंत करण्याचा प्रयत्न केला. तसेच विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीचा प्रचार होऊ नये या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे इंग्रजीतील इंडिया या नावाऐवजी भारत हे नाव वापरण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे तर जी-२० या जागतिक परिषदे दरम्यान, तसे नोटीफिकेश काढत सर्वांना भारत देश असे संबोधण्यास भाग पाडले.

या सगळ्या घडामोडीत सध्या सुरु असलेल्या क्रिकेट विश्वकप स्पर्धेच्या निमित्ताने पुन्हा एकदा विश्वचषक स्पर्धा जिंकावी म्हणून आणि भारतीय क्रिकेट संघाचा उस्ताह वाढावा या उद्देशाने भाजपाने नेमके इंडिया नावाने ट्विट केले. आणि काँग्रेसने त्यांच्या ट्विटरखात्यावर तेच ट्विट रिट्विट करत एकप्रकारे जो राजकिय संदेश द्यायचा तो दिला.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

ऐन दिवाळीच्या धामधुमीत बारामतीत शरद पवार-अजित पवार आणि दिल्लीत ?

राज्यातील राजकिय वजनदार घराणं म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पवार कुटुंबात सध्या काय सुरु आहे याची भणकच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *