Breaking News

ऑस्ट्रेलियन नागरिकाचा विराट कोहलीला मैदानातच मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर जॉनने केला खुलासा

देशभरातील समस्थ नागरिकांचे लक्ष लागून राहिलेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होत असलेल्या विश्वचषक कपच्या क्रिकेट सामन्यात सामना सुरु असतानाच ऑस्ट्रेलियाचा नागरिकाने मैदानात धाव घेत विराट कोहलीला मिठ्ठी मारण्याचा प्रयत्न केला. परंतु मैदानावरील सुरक्षा रक्षकांनी लगेच त्या ऑस्ट्रेलियन नागरिकाला ताब्यात घेऊन पोलिसांकडे सोपविले.

दरम्यान, त्या नागरिकास पोलिसांनी गुजरातमधील चांदखेडा येथील पोलिस स्टेशन मध्ये नेत असताना काही प्रसारमाध्यमांना सांगताना म्हणाला की, मी जॉन ऑस्ट्रेलियन नागरिक असून पॅलेस्टाईनला पाठिंबा देण्यासाठी आणि इस्त्रायलने पॅलेस्टाईनवरील बॉम्ब हल्ले तात्काळ थांबवावे यासाठी आपण मैदानावर उतरल्याचे सांगितले.

तसेच अल्ट न्युज संकेतस्थळाचे प्रमुख मोहम्मद झुबैर यांनी सदर व्यक्तीचे फोटो ट्विट करत करत जॉनने त्याच्या अंगावर घातलेल्या टि-शर्टवर पॅलेस्टाईनवरील बॉम्ब हल्ले थांबवा, आणि पॅलेस्टाईन समर्थक असल्याचे लिहील्याचे सांगितले.

Check Also

ईव्हीएम मशिन्स बनविणाऱ्या कंपनीच्या संचालक मंडळावरच भाजपाचे पदाधिकारी नियुक्त

मागील काही दिवसांपासून चंदिगढ येथील महानगरपालिकेच्या निवडणूकीत भाजपा विचाराच्या निवडणूक अधिकाऱ्याने स्वतःच मतपत्रिकेवर खानाखुणा करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *