Breaking News

सुधीर मुनगंटीवार यांची स्पष्टोक्ती, त्यांना बंडखोर मानत नाही ते १०० कॅरेट सोनं इतक्यात अविश्वास ठरावाची मागणी नाही -प्रदेश भाजपच्या कोअर कमिटीची झाली बैठक

एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असणारे आमदार बंडखोर असल्याचे आम्ही मानत नाही. तसेच ते १०० कॅरेट सोनं असल्याचे सांगत ते सर्वजण शिवसेनेतच आहेत. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे गटनेते आहेत. त्यांच्याकडून अद्याप भाजपाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही.भाजपा आजही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहे. पुढच्या दिवसांत ज्या काही घडामोडी घडतील त्यांच्यावर आमची नजर आहे, असे भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी स्पष्ट केले. विश्वासदर्शक ठरावाची मागणी करायची आज तरी गरज असल्याचे वाटत नसल्याचेही ते म्हणाले.

राज्यातील राजकीय घडामोडींबाबत गेले काही दिवस भाजपाने कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाही. हा शिवसेना तसेच आघाडीतील अंतर्गत प्रश्न असल्याचेच भाजपा नेते उघडपणे बोलत होते. मात्र आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर भाजपा सक्रिय झाली आहे. भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी पार पडली.

देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, राधाक़ष्ण विखे पाटील, मंगलप्रभात लोढा आदी नेते बैठकीला उपस्थित होते. ‘शिवसेनेतील दोन त़तीयांश आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत.आम्ही एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांना बंडखोर मानतच नाही. शिवसेनेच्या हिंदुत्वाचा विचारच ते पुढे घेवून चालले आहेत. ते चोवीस कॅरेट खरे शिवसैनिक आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आम्हाला कोणताही प्रस्ताव आलेला नाही. पुढच्या दिवसांत जर कोणते प्रस्ताव आले तर आम्ही त्यावर विचार करू’, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

राजभवनात प्रस्ताव नाही

सत्ता स्थापण्याबाबत किंवा अविश्वास ठरावाबाबत बंडखोर एकनादा शिंदे गट किंवा भाजपकडून प्रस्ताव आला नसल्याचे राजभवनातील सूत्रांनी सांगितले. अविश्वास ठराव मांडल्यास त्यात सहभागी होण्यासाठी गुहावटीत असलेल्या बंडखोर आमदारांना प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहावे लागेल. ऑनलाईन उपस्थिती चालणार नाही, असे राजभवनकडून सांगण्यात आले.

Check Also

संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उबाठा गटाचे कार्यकर्त्ये एकमेकांसमोर

लोकसभा निवडणूकीच्या चवथ्या टप्प्यासाठी १३ मे ला मतदान होत आहे. महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघातही मतदान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *