एकाबाजूला पावसाने ओढ दिल्याने राज्यातील अनेक भागात दुष्काळग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच काही जिल्ह्यांमध्ये पावसाने बऱ्यापैकी हजरी लावली अशा भागात शेतकऱ्यांनी पेरणी केली. पण आता हाता तोंडाशी आलेला घास ऐन दिवाळीपासूनच्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले. त्यातच राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या सरकारने शेतकऱ्यांना अद्याप मदत जाहिर केली नाही. यापार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव ठाकरे गटाने यांच्या एक्स ट्विटर अकाऊंटवरून सत्ताधारी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यावर शब्दांचे आसूड ओढत शेतकऱ्यांना दिला आहे.
शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाने एक्स ट्विटवरून शेतकऱ्यांना धीर देताना म्हणाले की, अवकाळी हे तात्पुरते संकट आहे. तुम्ही चिंतेत आहात. अगदी पोटच्या पोराप्रमाणे काबाडकष्ट करून ह्या फळबागा, पिकं तुम्ही वाढवलीत. त्यासाठी अतोनात मेहनत घेतलीत. ती अशी मातीमोल होताना बघून तुम्हाला गहिवरून येणं, दुःख होणं साहजिक आहे. पण खचू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने शेतकऱ्यांना धीर देताना म्हणाले की, संकट आहेच. ते कुठं नसतं? पण ह्या संकटातही खंबीरपणे उभं राहण्याची ताकद तुम्हीच… बळीराजानंच तर आम्हाला दिलीय. अशा परिस्थितीत तुम्ही काही अविचार केला तर तुमच्यामागे असलेल्या तुमच्या कुटुंबाचं काय होईल? हा महाराष्ट्र तुमच्याकडे आशेनं पाहतोय. तुम्ही जगाचे अन्नदाते आहात. अशावेळी हा अन्नदाता हतबल झालेला आम्हाला पाहवेल का? कसं पाहवेल? नाहीच! अशा शब्दात धीर दिला.
एक्सवरून सत्ताधारी मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यावर टीका करताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाने आसूड ओढत म्हणाला की, सत्तेसाठी स्वतःच्या आईच्या पोटावर लाथ मारणाऱ्या ह्या निष्ठुर मिंधेंना काळ्या आईचं दुःख काय समजणार? पण तुमच्यासारखंच इमानाने जगणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांना आणि शिवसेनेला तुमची जाण आहे. अवकाळीचं हे संकट तात्पुरतं आहे. ह्या संकटावर मात करून खंबीरपणे जिद्दीनं उभं राहूया ! अशी स्पष्टोक्तीही दिली.
मायबापहो,
महाराष्ट्रावर 'अवकाळी'चं संकट आहे. तुम्ही चिंतेत आहात. अगदी पोटच्या पोराप्रमाणे काबाडकष्ट करून ह्या फळबागा, पिकं तुम्ही वाढवलीत. त्यासाठी अतोनात मेहनत घेतलीत. ती अशी मातीमोल होताना बघून तुम्हाला गहिवरून येणं, दुःख होणं साहजिक आहे. पण खचू नका. आम्ही तुमच्यासोबत आहोत.… pic.twitter.com/xo0Uil8YBG
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) December 2, 2023