Breaking News

राष्ट्रवादीचे मोठे पाऊल, अजित पवार आणि त्यांच्या सोबतच्या आमदारांच्या विरोधात तक्रार दाखल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे शिस्तभंगाच्या कारवाईची मागणी

राज्यात राजकीय उलथापालथ झाली असून अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड पुकारले आहे. त्यामुळे शिवसेनेप्रमाणे आता राष्ट्रवादीतही दोन गट निर्माण झाले आहेत. अजित पवार गट आणि शरद पवार गट असे दोन गट राष्ट्रवादीत पडले असून पवारांनी आता बंडखोर आमदारांविरोधात बडगा उगारला आहे. अजित पवारांसह नऊ आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने अधिकृत पत्रकावरून यासंदर्भातील माहिती दिली. पक्षविरोधी कृत्यांचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनजंय मुंडे, धर्मराव आत्रम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील या आमदारांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली आहे. तसंच, यांना विधानसभेत अपात्र करावे, अशी मागणीही विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे आता विधानसभेचे अध्यक्ष काय निर्णय घेतात यावर या नऊ आमदारांचं भवितव्य अवलंबून आहे.

दरम्यान, काल (२ जुलै) अजित पवारांसह शपथविधीच्या कार्यक्रमात दिसणारे अनेक आमदारांनी आज तटस्थ भूमिका घेतली आहे. तर, अमोल कोल्हे यांनी शरद पवारांच्या बाजूनेच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे ५ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रवादीच्या बैठकीत अजित पवारांसोबत किती आमदार आहेत हे स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, या संदर्भात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यासह ९ आमदारांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मात्र अद्याप ती मी वाचली नाही. ती वाचल्यानंतर त्याबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले.

Check Also

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन दिवसात सहा सभा

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी राज्यात येत्या दोन दिवसांत २९ व ३० एप्रिल रोजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *