Breaking News

अखेर शरद पवार यांनी केली या नेत्यांची हकालपट्टी सुप्रिया सुळे यांनी केली होती मागणी

भाजपाच्या भ च्या चार शब्दांच्या राजकिय वापराचा दुसरे बळी ठरलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी केली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतले अनेक आमदार, खासदार, नेते अजित पवारांबरोबर आहेत. अजित पवार आणि त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसमधील नऊ आमदारांनी भाजपाशी हातमिळवणी करत (राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून) महायुतीत प्रवेश केला. तसेच मंत्रीपदाची शपथही घेतली. यावेळी शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू समजले जाणारे माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल आणि सुनिल तटकरे हे देखील अजित पवारांबरोबर दिसले. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या दिल्ली कार्यालयाचे कायमस्वरूपी सचिव एस.आर.कोहली यांची हकालपट्टी करण्यात येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी ट्विटरद्वारे जारी केले.

प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीचे सदस्य होते. या दोन्ही नेत्यांना अलिकडेच पक्षात केंद्रीय नेतृत्वात मोठी पदं देण्यात आली होती. परंतु या दोन्ही नेत्यांनी बंडखोरी केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्यावर आता कारवाई केली आहे. या दोन्ही नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
शरद पवार यांनी ट्वीट केलं आहे की, मी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्य नोंदणीतून काढून टाकण्याचे आदेश देत आहे. तसेच दिल्लीतील पक्ष कार्यालयाचे सचिव एस.आर.कोहली यांनी निलंबित पदाधिकारी प्रफुल पटेल यांना पक्षविरोधी कारवायांमध्ये मदत केली म्हणून कोहली यांचीही शरद पवार यांनी हकालपट्टी केली.

सुनील तटकरे हे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव होते तसेच त्यांना ओडिशा, पश्चिम बंगालची जबाबदारी देण्यात आली होती. राष्ट्रीय स्तरावरील समितींच्या बैठका, संसद अधिवेशन, निवडणूक आयोग, अल्पसंख्याक विषयक मुद्दे त्यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

प्रफुल पटेल हे पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष होते. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. तसेच, राज्यसभेतील पक्षाचे कामकाज आणि आर्थिक घडामोडी यांसारखे मुद्दे पटेल यांच्याकडे सोपवण्यात आले होते.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *