Breaking News

संजय राऊत यांची खोचक टीका, राज्यात तीन जनरल डायर मराठा आरक्षण आंदोलकांवर झालेल्या हल्यावरून संजय राऊत यांची शिंदे-फडणवीस-पवार यांच्यावर टीकास्त्र

जालन्यातील अंबड तालुक्यातील मराठा समाजाच्या आरक्षणप्रश्नी आंदोलन करत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी बेछूट लाठीमार केला. त्यात अनेक निष्पाप नागरिक गंभीररित्या जखमी झाले. मात्र त्यानंतरही राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सदर ठिकाणी भेट देण्याचे सोडा तेथील घटनेची माहिती घेण्याचेही टाळले. त्यातच पोलिसांना मुंबईतून फोन गेल्यानंतरच लाठीमार झाल्याची चर्चा राज्यभरात सुरु झाली. त्यानंतर याप्रश्नी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी राज्यात जनरल डायरचे राज्य असून एक नव्हे तर तीन-तीन डायर असल्याची टीका शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर केली.

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले, मुंबईतून आणि मंत्रालयातून फोन गेल्यानंतरच आंदोलकांवर लाठीमार झाला. हा फोन कोणाचा आणि कुठल्या केबिनमधून गेला, असा सवाल उपस्थित करत आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सरकारने प्रयत्न केल्याचा आरोप केला.

अचानक केलेल्या लाठीमारमुळे राज्यात राजकीय वातावरण चिघळल्याने राज्यभरात जाळपोळ, निदर्शने आणि आंदोलने सुरू आहेत. दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना (ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, शिंदे गट आणि भाजपच्या नेत्यांनी जालन्यातील आंदोलकांची भेट घेतली. मराठा आंदोलन चिरडण्यासाठी लाठिमार करण्यात आला. राज्य सरकार यात दोषी आहे. सरकारच्या आदेशाशिवाय लाठीमार होऊ शकत नाही. लाठीमार करण्यासाठी तो अदृश्य फोन कोणाचा होता. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री की गृहमंत्र्यांच्या कार्यालयातून होता याचा खुलासा व्हावा अशी मागणी करत या प्रकरणात पोलिसांना दोष देऊ नका. सक्तीच्या रजेवर पाठवून त्यांचा यात बळी घेऊ नका. हा संवेदनशील विषय असल्याचेही संजय राऊत म्हणाले,

संजय राऊत पुढे बोलताना सांगितले की, तसेच येथे होणारा शासन आपल्या दारी कार्यक्रमात आंदोलकांचा अडथळा नको. त्यामुळे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी लाठीमार केल्याचा आरोप केला. लोकायुक्तांच्या अधिकाराबाबतच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली राज्य सरकारच्या बाजूने निर्णय दिला. केंद्र सरकारने दिल्ली ताब्यात देण्यासाठी संसदेत घटनात्मक दुरुस्ती केली. नवीन विधेयक मांडून कायदा केला. विरोधकांना मात्र त्यावर बोलू दिले नाही. केंद्र सरकार विरोधकांची मुस्कटदाबी करत आहे, असा आरोपही केला.

Check Also

नाना पटोले यांची मागणी, हिम्मत असेल तर मुख्यमंत्री व जरांगे पाटील यांच्यातील चर्चा जाहीर करा

मराठा आरक्षण प्रश्नावर शिंदे फडणवीस पवार सरकारने फसवणूक केली आहे, आरक्षणाच्या नावाखाली महाराष्ट्र पेटवण्याचे पाप …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *