Breaking News

आधी फाईली माझ्याकडं अन् नंतर मुख्यमंत्र्यांकडं अजित पवार यांचा वाढता हस्तक्षेप

अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री पदावर विराजमान झाल्यापासून बैठकींचा धडाकाल लावला आहे. तसेच त्यांचा प्रशासकीय कामाजात वाढता हस्तक्षेप पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज असल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजित पवारांकडून येणाऱ्या सर्व फाईल प्रथम उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून तपासल्या जातील. यानंतर मुख्यमंत्र्यांकडे येतील,असा महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर एक गट अजित पवार यांच्या सोबत शिंदे -फडणवीस सरकार सोबत सत्तेत सहभागी झाला. अजित पवार उपमुख्यमंत्री तर त्यांच्यासोबत आलेल्या ९ आमदारांना मंत्रीपद मिळाले. यामुळे शिंदे गटात मोठ्या प्रमाणात नाराजी असल्याच्या चर्चांना राजकीय वर्तुळात उधान आले होते. अजित पवारांनी उपमुख्यमंत्री झाल्यापासून वेगवेगळ्या विभागाच्या बैठका घेण्याचा धडाका त्यांनी लावला. यामुळेच मुख्यमंत्र्यांच्या कारभारात हस्तक्षेप होत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.

अजित पवार यांचे वर्चस्व असलेल्या पुणे जिल्ह्यात त्यांनी प्रशासकीय कामाच्या बैठका घेत पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना सुद्धा डावलून बैठका घेतात तर बैठकीत त्यांना बोलूही दिलं जात नाही. त्यामुळे पालकमंत्री नाराज असल्याची चर्चा आहे.

पुण्याच्या पालकमंत्री पदावरून बरीच चर्चा रंगली आहे. पुण्याचे पालकमंत्री भाजपचे नेते चंद्रकांत पाटील आहेत. पुण्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात अजित पवारांना माध्यमांनी प्रश्न केल्यावर ते म्हणाले, “तुझ्या तोंडात साखर पडो”, असे म्हणत पालकमंत्री होण्याची आपल्या मनातील तळमळ त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे पुन्हा एकदा पालकमंत्री पदाच्या चर्चा राजकीय वर्तुळता रंगलू लागल्या. या सगळ्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांना रोखण्यासाठी त्यांनी स्वाक्षरी केलेल्या फाईल्स यापुढे उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे जातील. यानंतर अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्र्यांकडे येतील असा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे.

Check Also

निर्मला सीतारामन यांची सॅम पित्रोदांच्या वर्णद्वेषी टिप्पणीवरून टीका

आंतरराष्ट्रीय ख्यातकिर्त विचारवंत शास्त्रज्ञ आणि काँग्रेस नेते सॅम पित्रोदा यांनी आज एक व्हिडिओ जारी करत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *